समानी व आकूति: समाना हृदयानि व: | गेल्या आठवड्यात युट्यूबवर एक लिंक पाहत होतो. जॉन विल्सन यांच्या वाद्यवृंदाने टाँम अँड जेरी मालिकेसाठी तयार केलेल्या सुरावटीचे सादरीकरण होते. सुरावट व त्याचे सादरीकरण उत्तम होतेच पण त्याबरोबरचं ते पाचपन्नास वादक ज्या एकतानतेने , सुसूत्रतेने काम करत होते ते देखिल पाहण्यासारखे होते. एखादा वादक जेव्हा वादन करतो तेव्हा तो त्याच्या शारीरिक , बौद्धिक , मानसिक क्रियेत जी सुसूत्रता लागते तीच सुसूत्रता ; तोच समन्वय सामुहिक सादरीकरणात असावा लागतो. जणू एक व्यक्ती एक शरीर काम करत आहे अशी एकजीवता वादकांत निर्माण झाल्याशिवाय उत्तम सादरीकरण प्रकट होणे शक्य नाही. पाश्चात्य वाद्यवृंदांचे ५०-५० व्हायोलीनचे सादरीकरण ही एकजीवता , एकरूपता , एकतानता , ते ऐक्य अनुभवण्यासाठी जरूर पाहावेत. असे समूहमन तयार होणे शक्य आहे ? ते कसे होते ? असे सम...
'अभ्यास देशस्थितीचा समतोल चलो' ज्ञान प्रबोधिनीच्या कामाच्या निमित्ताने झालेल्या प्रवासात शिक्षण विश्वाचे झालेले दर्शन व त्या निमित्ताने झालेला विचार मांडण्यासाठीचे लेखन