करोना महामारीच्या काळात शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहे. गेली अनेक वर्षे उपलब्ध असलेले तंत्रज्ञान कृतीरूप वापरण्याची गरज निर्माण झाली आणि त्याचा वापर शिक्षकांनी करायला सुरुवात केली. तंत्रज्ञानाची प्रचलित शिक्षण पद्धतीशी सांगड कशी घालता येईल, त्यासंदर्भात नवे शैक्षणिक प्रयोग, नवीन शैक्षणिक रचना कशा निर्माण कराव्या लागतील या संदर्भात काही विचार चिंतन या ब्लॉगच्या पेजवर उपलब्ध करून देत आहे.
प्रशांत दिवेकर
लेख १ : आशय, अध्यापन पद्धती आणि तंत्रज्ञानाची पेड गुंफताना
शिक्षक
प्रशिक्षणाच्या निमित्ताने शाळांशी आणि शिक्षकांशी जेव्हा संवाद होतो तेव्हा
त्यांना विषयज्ञान , अध्यापनशास्त्राचे
ज्ञान आणि तंत्रज्ञान या तीन विचार आणि कार्यक्षेत्रांचा समन्वय आणि समवाय साधताना अडचण येत असे लक्षात येते. या लेखात या तीनही क्षेत्रांचा
एकत्र विचार करणाऱ्या
प्रतिमानाची ओळख करून घेण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
लेख २ : आशय, अध्यापन पद्धती आणि तंत्रज्ञानाची पेड गुंफण्यासाठीचा आराखडा
विषयज्ञान
, अध्यापनशास्त्राचे ज्ञान आणि तंत्रज्ञान या तीन विचार आणि
कार्यक्षेत्रांचा सांगड पाठ नियोजन करण्यापूर्वी या लेखातील आराखड्याच्या आधारे चिंतन करूया.
लेख ३ : ब्लूमची डिजिटल वर्गीकरण सारिणी
आभासी दूरस्थ डिजिटल तासिकांचे पाठ नियोजन करताना
अध्ययन उद्दिष्टे, अध्ययन अनुभव आणि अध्ययन निष्पत्ती या तिन्हींचा विचार करताना तंत्रज्ञानाचा आधार घेत उच्च स्तरीय अध्ययन उद्दिष्टे
कशी साध्य होऊ शकतात याचा विचार या लेखात केला आहे.
लेख ४ : अध्ययन चक्र आणि तंत्रज्ञानाच्या प्रकारची सांगड घालताना
आंतरजालावर उपलब्ध डिजिटल अॅप्लिकेशन्सचा शोध घेऊन त्यांची अध्ययनचक्राशी सांगड घालता येणे म्हणजे तंत्रस्नेही
अध्यापकत्व.
लेख ५ : अध्यापनात खेळाची तत्त्वे
संगणकीय खेळ विद्यार्थांना का आकर्षित करतात ? तंत्रस्नेही शिक्षकाने खेळांची तत्त्वे वापरून नवे खेळ शोधून, तयार करून
त्यांची अभ्यासक्रमाशी आणि सरावाशी योग्य सांगड घातली पाहिजे . शिक्षणप्रक्रियेत खेळाची तत्त्वे प्रभावी पद्धतीने कशी वापरता येतील याबद्दलची मांडणी या लेखात केली आहे .
लेख ६ : व्हर्चुअल संग्रहालय भेटीचेआयोजन
आज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जग भरातील प्रसिद्ध संग्रहालये आपल्याला घर बसल्या पाहणे शक्य झाले आहे. संचार बंदीच्या काळात विद्यार्थांसाठी व्हर्चुअल संग्रहालय सहलींचे आयोजन कसे करायचे याबद्दल या लेखात मांडणी केली आहे.
लेख ७ : तंत्रज्ञानाचा स्वीकार
सहा महिने झाले लॉक डाऊन जाहीर होऊन. चला, गेल्या सहा महिन्यातील आपल्या तंत्रस्नेही अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचा आढावा घेवूया. शिक्षणप्रक्रियेत रूपांतर घडवून आणण्याचे सामर्थ्य तंत्रज्ञानात आहे. हे सामर्थ्य स्वीकारायचे कसे याबद्दल दिशादर्शक सॅमर (SAMR) मॉडेलचा परिचय या लेखात करून दिला आहे
लेख ८ : ‘डिजिटल स्वाध्याय-प्रवचन’
आपल्याला विद्यार्थ्याला फक्त साधने वापरायला शिकवायचे नाहीये तर साधने बदलत गेली तरी साधनाच्या सहाय्याने विचार कसा करायचा असतो हे
शिकवायचे आहे.आणि हे शिकवायचे असेल तर त्यासाठी अभ्यासातील स्वावलंबन अर्थात आत्मनिर्भरता अभ्यासक शिकेल यासाठी योजना
आखावी लागेल आणि या योजनेचे सूत्र आहे : ‘डिजिटल स्वाध्याय-प्रवचन’.
https://prashantpd.blogspot.com/2020/12/8.html
तंत्रस्नेही अध्यापकत्व : लेख ९
( छात्र प्रबोधन,सौर आषाढ, शके १९४३, जुलै २०२१,
वर्ष २१ अंक 10 मध्ये
‘तंत्रस्नेही अध्ययन कौशल्ये’ या लेखमालेत प्रकाशित )
मी, यु-ट्यूब आणि माझा अभ्यास (भाग १)
https://prashantpd.blogspot.com/2021/07/blog-post_8.html
तंत्रस्नेही अध्यापकत्व : लेख १०
मी, युट्युब आणि माझा अभ्यास (भाग २)
युट्यूबने आपल्यासाठी माहिती, ज्ञान आणि करमणूक अशा वेगवेगळ्या चित्रफितींचा खजिनाच उपलब्ध करून दिला आहे. काय सापडत नाही युट्यूबवर आपल्याला? मला तर मी शाळेत असताना पाहिलेल्या ब्योमकेश बक्षीसारख्या मालिका, दूरदर्शनवर पाहिलेल्या भारतीय शिल्पकलेवरचे माहितीपट, जुनी व्याख्याने ... काय सांगू अन काय नाही... मी तरी सध्या युट्यूबचा फॅन आहे..........
https://prashantpd.blogspot.com/2021/07/blog-post_31.html
Technology Enhanced Teaching-Learning
Article 1 :📡 Planning Technology Enhanced Teaching📡
Despite increased access to computers, the internet, and related technology for students and teachers, schools are facing challenges. They are experiencing difficulty in effectively integrating these technologies into existing curricula and teaching-learning processes.
https://prashantpd.blogspot.com/2021/06/technology-enhanced-teaching.html
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
Innovative and informative articles. Keep it up..
ReplyDeleteInnovative and informative articles. Keep it up..
ReplyDeleteIn this critical situation
ReplyDeleteThis article useful for teaching and learning.
Many new concept knew to me thank you Prashikshak.
Styta upkram
ReplyDeleteसर खरं खूपच छान माहिती मिळाली .नवीन शिकायला मिळाले .धन्यवाद !
ReplyDeleteवरील सर्व घटक खूपच उपयुक्त व मार्गदर्शन पर आहेत.
ReplyDeleteमला खूप काही नवीन बाबी शिकण्यास मिळाल्या.धन्यवाद सर! आपलें डिजिटल व्याख्यान छान आहे.आपल्या नवीन विषयाचे डिजिटल व्याख्यान लवकरच वाचायला मिळेल अशीच विनंती.
खुप छान माहिती दिली. धन्यवाद सर तुमचे व्याख्यान दोन वेळा ऐकण्याची संधी मिळाली. त्यातील तुम्ही सांगितलेले शैक्षणिक अनुभव छान होते .
ReplyDeleteफारच अप्रतिम,योग्य वेळी सर्वानाच अत्यन्त उपयुक्त 👍
ReplyDeleteतंत्रस्नेही अध्यापक खूप छान माहिती आहे.आणि या माहितीचा उपयोगआमच्या साठी तर खूप महत्त्वाचा आहेच,पण याचा उपयोगअध्ययन आणि अध्यापनासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत या सर्व नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या धन्यवाद .
ReplyDeleteखूप छान माहिती आहे.आणि या माहितीचा उपयोगआमच्या साठी तर खूप महत्त्वाचा आहेच,पण याचा उपयोगअध्ययन आणि अध्यापनासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत या सर्व नवीन गोष्टी शिकायला मिळाले.खूपच उपयोगी आणि मार्गदर्शन पर आहे धन्यवाद .
ReplyDeleteखूप छान माहिती केळकर सर तुमच्याकडून अजून शिकण्याची इच्छा आहे. अंजली गोडसे सातारा.
ReplyDelete