व्हर्चुअल संग्रहालय भेट
लॉकडाऊन सुरू झाला आणि युरोपमधील एक बातमी वाचनात आली की एका संग्रहालयाच्या क्युरेटरने लॉकडाऊन असला तरी माझे संग्रहालय पाहायला अभ्यागत यायलाच हवेत, या इर्षेने रात्रंदिवस खपून संग्रहालयाचे डिजीटायझेशन केले. ही बातमी वाचल्यापासून अशा व्हर्चुअल संग्रहालय भेटीचा सहाध्यायदिन कसा योजता येईल, याबद्दल विचार चालू आहे. या संचारबंदीच्या काळात मी काही व्हर्चुअल संग्रहालयाला भेटी दिल्या.
व्हर्चुअल संग्रहालय भेटीची योजना आखण्यापूर्वी संग्रहालयाचे शैक्षणिक महत्त्व विचारात घेऊया.
संग्रहालय
भेटीची
शैक्षणिक
उद्दिष्टे जाणून
घेतल्यानंतर
आणि संग्रहालयाची
क्षेत्र भेट
कशी
योजायची याबद्दल
विचार केल्या नंतर आता
एका व्हर्चुअल संग्रहालय
भेटीसाठीचा
आराखडा तयार करूया. अलीकडेच पुण्यातील प्रसिद्ध
राजा केळकर संग्रहालायचे त्यांच्या संग्रहालायची व्हर्चुअल ३ D सहल पर्यटकांसाठी
उपलब्ध करून दिली आहे. चला, राजा केळकर संग्रहालयाच्या सहलीचे नियोजन करूया.
राजा केळकर संग्रहालय व्हर्चुअल भेटीसाठी आराखडा |
सहाध्याय भेटीची पूर्व तयारी :
१. दिनकर केळकर यांचे चरित्र कथन करणे
२. एखादी कलाकृती कशी बघायची असते, त्यातील तपशील कसे नोंदवायचे असतात हे शिकवून त्याची कार्यपत्रके सोडवून घेणे
३. महाराष्ट्राच्या इतिहासाची कालरेषा तयार करून घेणे.
४. व्हर्चुअल भेटीच्या वेळी करायच्या नोंदींची नोंदपत्रके तयार करणे.
सहाध्याय भेटीच्या वेळी :
१. खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून राजा दिनकर केळकर
संग्रहालयाच्या वेब साईटला भेट द्या आणि कार्यपत्रिकेत नोंदी करा. ( १५ मि )
https://rajakelkarmuseum.org/
२. पुणे येथील राजा दिनकर केळकर संग्रहालय 3D मध्ये पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि २० मिनिटे संग्रहालयातून फेरपटका मारून या.
https://my.matterport.com/show/?m=VavyUHG166x&help=2&play=1&dh=1&nozoom=1
३. संग्रहालयाची वैशिष्ट्ये नोंदवणारे कार्यपत्रक सोडवा. (२०मि)
४. तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही दोन कलाकृतींबद्दल दिलेल्या आराखड्यानुसार नोंदी करा. (२०मि)
५. चला केळकर संग्रहालयातील खजिना शोधूया, खजिनाशोध खेळ (२०मि)
सहाध्याय भेटी नन्तर :
१. व्हर्चुअल टूर ऑडीओ-व्हीजुव्हल गाईड तयार करा.
२. राजा केळकर संग्रहालय भेटीबद्दल ब्लॉग लिहा / विकिपिडीयावरील माहिती अद्ययावत करा.
एका नमुना कार्यपत्रक : चला कलाकृतीचे निरीक्षण करूया १. कलाकृतीचे नाव : २. खाली दिलेल्या चौकटीत कलाकृतीचे रेखाटन काढा. ३. कलाकृतीचे पाच ओळीत वर्णन करा. ४. कलाकृती कशापासून बनवलेली आहे ? ५. संग्रहालयातील अजून कोणत्या कलाकृती या प्रकारच्या आहेत. ६. याप्रकारची वस्तू तुम्ही आजूबाजूला रोजच्या वापरत बघितली आहे का ? तुम्ही बघितलेली वस्तू आणि कलाकृती यात काय साम्यफरक आहे, तो नोंदवा. ७. कलाकृतीबद्दल माहिती सांगणारा जो तक्ता संग्रहालयाने लावला आहे त्यातील कोणते तपशील महत्त्वाचे वाटतात ? ८. ही कलाकृती तुम्हाला का महत्त्वाची वाटते ?
|
व्हर्चुअल संग्रहालयांच्या भेटीसाठी उपयुक्त लिंक्स : दोन प्रकारच्या भेटी उपलब्ध आहेत - गॅलरी भेट आणि ३D भेटी https://artsandculture.google. https://www.youtube.com/watch? |
चला तर मग लॉकडाऊनमधून बाहेर पडून आपल्या वर्गाला व्हर्चुअल सहलीला नेऊया.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
Interesting 👍
ReplyDeleteअप्रतिम संग्रहालये....
ReplyDeleteधन्यवाद सर ...मी आपले ब्लॉग वाचून अध्पापनाची नवनवीन तंत्रे शिकले...असं वाटतं लौकडाऊनच्या काळात आपण कात टाकलीय...व नव्याने नव्या
अध्यापन पद्धती सोबत...विद्यार्थ्यांपासून दूर असुनही त्यांच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी कशी घ्यावी या जाणीव जाग्रुती सह आता अध्यापन करणार...आनंदाने..
एखादी भेट नक्की करू सर
ReplyDeleteखूप छान सर ल तुमची नवीन तंत्रे फायदेशीर आहेत आम्हा सर्व शिक्षकांसाठी.
ReplyDeleteहा घटक माझ्या साठी नवीन आहे.मला संग्रहालय भेटी ची 3D कल्पना अध्यापनात वापरायला खूप आवडेल.
ReplyDelete3D संग्रहालय बघण्यात खूपच छान वाटलं!या लिंक द्वारे विद्यार्थ्यांना स्वतः प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन संग्रहालय बघितल्या सारखे वाटेल.रोमांचक अनुभव आहे.
नमस्कार सर🙏
ReplyDeleteआपण सुचवलेल्या पद्धतीप्रमाणे लवकरच काही वर्गासाठी सहाध्याय भेटी घेण्याचे ठरवत आहोत👍
3dसंग्रहालय खूप छान आणि मस्तच अनुभव अगदी संग्रहालयात असल्याचा भास झाला .धन्यवाद एक नवीन व छान कल्पना दाखविल्याबद्दल
ReplyDeleteसर,खरंच आपले वाचन आणि त्या मागे असलेल्या कल्पना खरंच शब्दात वर्णन करता येणार नाही अशा नेहमीच असतात..नक्की हा प्रयत्न करून आपल्याला त्याचे प्रतिसाद कळवेन... सर्व संग्रहालये उत्तम आहेत त्यातून क्षेत्रभेट नक्कीच साधता येईल.
ReplyDelete