वंदे गुरु परंपरा गुरुपौर्णिमा अर्थात ज्ञानाच्या परंपरांचे पाईक होण्याचा दिवस इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१) भगवद् गीतेत देखील श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना ज्ञानाच्या परंपरेचा दाखला दिला आहे. ते म्हणतात ‘ मी हा अव्यय ( अविनाशी ) योग सूर्याला सांगितला. सूर्याने मनुला सांगितला व मनूने इक्ष्वाकू सांगितला. भारतीय परंपरेत नवीन ज्ञानतत्वाज्ञाच्या शाखांची मांडणी करताना देखील असा गुरु परंपरेचा वारसा सांगितला जातो. कारण ज्ञानाच्या परंपरेच्या संक्रमणातूनच ज्ञान वृद्धिगत होत जाते. ज्ञान प्रबोधिनीने पथकाधिपती म्हणून समर्थ रामदास , स्वामी दयानंद , स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद या चार व्यक्तींचा स्वीकार केला आहे. त्यापैकी एक म्हणजे समर्थ रामदास! कवि वामन पंडितांनी समर्थांची ...
'अभ्यास देशस्थितीचा समतोल चलो' ज्ञान प्रबोधिनीच्या कामाच्या निमित्ताने झालेल्या प्रवासात शिक्षण विश्वाचे झालेले दर्शन व त्या निमित्ताने झालेला विचार मांडण्यासाठीचे लेखन
Comments
Post a Comment