तंत्रज्ञान स्नेही अध्यापकत्व : २
विषयज्ञान
, अध्यापनशास्त्राचे ज्ञान आणि तंत्रज्ञान या तीन विचार आणि
कार्यक्षेत्रांचा एकत्र विचार करणाऱ्या
प्रतिमानाचा ( TPCK / TPACK : Technological Pedagogical Content
Knowledge; Mishra & Koehler,२००६ ) वापरून पाठ नियोजन करण्यापूर्वी या
प्रतीमानाच्या आधारे अध्यापकाने कसा विचार करावा याबद्दलची मांडणी या भागात केली आहे.
हे प्रतिमान वापरून अध्यापकाने काय पद्धतीने व कोणत्या टप्प्यांनी विचार करत जावे हे शिकण्यासाठी एक आराखडा देतो आहे. हा आराखडा पाठ नियोजानापूर्वी भरावा. हा आराखडा भरताना अध्यापनाचा आशय, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाचा वापर याबद्दल जो विचार आणि चिकित्सा अध्यापकाने करणे अपेक्षित आहे ती होऊ शकेल.
हे प्रतिमान वापरून अध्यापकाने काय पद्धतीने व कोणत्या टप्प्यांनी विचार करत जावे हे शिकण्यासाठी एक आराखडा देतो आहे. हा आराखडा पाठ नियोजानापूर्वी भरावा. हा आराखडा भरताना अध्यापनाचा आशय, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाचा वापर याबद्दल जो विचार आणि चिकित्सा अध्यापकाने करणे अपेक्षित आहे ती होऊ शकेल.
आराखडा
आराखडा
विषय :
इयत्ता :
पाठ्य घटक :
अध्यापनासाठी उपलब्ध तासिका :
अध्यापनाची उद्दिष्टे :
१.
२.
३.
आता खालील आराखड्यात दिलेल्या सूचनांप्रमाणे सारशब्द ( Key words ) लिहा.
|
आता
सराव करण्यासाठी एक नमुना आराखडा भरुया .
विचार
करण्यासाठी चेतक म्हणून आराखड्यात काही शब्द दिले आहेत. त्या प्रकारचे संकल्पनेशी निगडीत शब्द आराखड्यात भरावेत.
आराखडा
आराखडा
विषय : जीवशास्त्र
इयत्ता : आठवी
पाठ्य घटक : मानवी हृदय : रचना व कार्य
अध्यापनासाठी उपलब्ध तासिका :
अध्यापनाची उद्दिष्टे :
१. मानवी हृदयाच्या रचनेचा परिचय होणे.
२. हृदयातील रक्त प्रवाहाच्या अभिसरणाची प्रक्रिया माहित होणे.
३.
................................................................................
४.
................................................................................
आता खालील आराखड्यात दिलेल्या सूचनांप्रमाणे सारशब्द ( Key words ) लिहा.
|
या प्रमाणे पाठ्य घटकाचे विश्लेषण करून पाठ नियोजनाला सुरवात केल्यास
अध्यापनात योग्य तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करता येईल.
अध्यापन उत्तम होण्यासाठी शैक्षणिक
उद्दिष्टे, आपल्या आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या
क्षमता यांचा विचार करून योग्य तंत्रज्ञानाच्या
साह्याने एखाद्या शैक्षणिक अनुभवाची योजना कशी करता येईल याचा विचार क्रमशः
करू या.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
उदाहरण दिल्यामुळे नेमके समजले. मी एका भाषणात याचा उल्लेख करीन.
ReplyDeleteमात्र अध्यापक होणे खूप अवघड आहे असे वाटायला लागले.
खरंच फक्त उदाहरण आहे म्हणूनच समजले.
ReplyDeleteउदाहरणासह दिल्यामुळे समजणे सोपे झाले... प्रबोधिनीत यायचे समर्थ व्हावया... आता तर प्रबोधिनी आपल्या द्वारी! खरंच आभारी आहोत...
ReplyDeleteछान 👌
ReplyDeleteछान
ReplyDeleteशिक्षक खर्या अर्थाने सम्रुध्द होण्याचा मार्ग. खूप छान
ReplyDeleteKhupach chhan samajawle udaharan gheun .
ReplyDeleteDhanywad
उदाहरण दिल्यामुळे अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा हे अधिक स्पष्ट झाले
ReplyDeleteआज online workshop मध्ये ऐकायला मिळाले आणि समजून घेता आले. खरच उदाहरण दिल्याने सोपे झाले आहे. 🙏
ReplyDeleteसर मी तंत्रज्ञान वापरून नेहमीच अध्यापन करत असते, मी या साठी काही animated video, image video ऑनलाईन quiz,बनवून माझ्या दैनंदिन अध्ययन अध्यापन मधे नेहमीच वापर करत असते.
ReplyDeleteमात्र आता आपण दिलेल्या नोट्स व आराखडा पाहून निश्चितच माझ्या तंत्रज्ञान साहित्य निर्मितीत नाविन्यता व कल्पकता येईल व माझे विद्यार्थी अजून सृजनशील होतील कारण उठावदार व दर्जेदार असे डिजिटल साहित्य द्वारे अध्ययन अनुभव मिळाला तर माझ्या सोबत माझ्या विद्यार्थ्याची पण शैक्षणिक गुणवत्ता नक्कीच वाढेल.
आपलें मना पासून आभार.
उदाहरण दिल्यामुळे समजण्यास सोपे झाले. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची विविध विषयांची आवड वाढण्यास खूप मदत होईल.
ReplyDelete