Skip to main content

तंत्रज्ञान स्नेही अध्यापकत्व : २


तंत्रज्ञान स्नेही अध्यापकत्व : २

                 विषयज्ञान , अध्यापनशास्त्राचे ज्ञान आणि तंत्रज्ञान या तीन विचार आणि कार्यक्षेत्रांचा  एकत्र विचार करणाऱ्या प्रतिमानाचा ( TPCK / TPACK :  Technological Pedagogical Content Knowledge; Mishra & Koehler,२००६ ) वापरून पाठ नियोजन करण्यापूर्वी या प्रतीमानाच्या आधारे अध्यापकाने कसा विचार करावा याबद्दलची मांडणी या भागात केली आहे. 



             हे प्रतिमान वापरून  अध्यापकाने काय पद्धतीने व कोणत्या टप्प्यांनी विचार करत जावे  हे शिकण्यासाठी एक आराखडा देतो आहे. हा आराखडा पाठ नियोजानापूर्वी भरावा. हा आराखडा भरताना अध्यापनाचा आशय, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाचा वापर याबद्दल  जो विचार आणि चिकित्सा अध्यापकाने करणे अपेक्षित आहे ती होऊ शकेल. 


आराखडा
आराखडा
विषय :
इयत्ता :
पाठ्य घटक :
अध्यापनासाठी उपलब्ध तासिका :
अध्यापनाची उद्दिष्टे :
१.
२.
३.
आता खालील आराखड्यात दिलेल्या सूचनांप्रमाणे सारशब्द ( Key words ) लिहा.
१.    खालील चौकटींमध्ये अध्यापनाचा पाठ्यांश विचारात घेऊन सारशब्दांची यादी करा.
विषयाचे ज्ञान
: आशय
शिक्षणशास्त्राचे ज्ञान
: अध्ययन-अध्यापन पद्धती
तंत्रज्ञानाचे ज्ञान






२.    वरच्या चौकटीत लिहिलेले सारशब्द खालील चौकटींमध्ये निकषानुसार जोड्या जुळवून लिहा
शिक्षणशास्त्र आणि विषय ज्ञान सारशब्दांची जोडी

तंत्रज्ञान आणि विषय ज्ञान सारशब्दांची जोडी
तंत्रज्ञान आणि शिक्षणशास्त्र सारशब्दांची जोडी






३.    आपली अध्यापनाची उद्दिष्टे विचारात घेवून वरच्या चौकटीतील शब्दांची त्रिके तयार करा.
विषयज्ञान – शिक्षण शास्त्र – तंत्रज्ञानाची त्रिके





आता सराव करण्यासाठी एक नमुना आराखडा भरुया .
विचार करण्यासाठी चेतक म्हणून आराखड्यात काही शब्द दिले आहेत. त्या प्रकारचे संकल्पनेशी निगडीत शब्द आराखड्यात भरावेत.
आराखडा

आराखडा
विषय : जीवशास्त्र
इयत्ता : आठवी
पाठ्य घटक : मानवी हृदय : रचना व कार्य
अध्यापनासाठी उपलब्ध तासिका :
अध्यापनाची उद्दिष्टे :
१. मानवी हृदयाच्या रचनेचा परिचय होणे.
२. हृदयातील रक्त प्रवाहाच्या अभिसरणाची प्रक्रिया माहित होणे.
३. ................................................................................
४. ................................................................................
आता खालील आराखड्यात दिलेल्या सूचनांप्रमाणे सारशब्द ( Key words ) लिहा.

४.    खालील चौकटींमध्ये अध्यापनाचा पाठ्यांश विचारात घेऊन सारशब्दांची यादी करा.
विषयाचे ज्ञान
: आशय
शिक्षणशास्त्राचे ज्ञान
: अध्ययन-अध्यापन पद्धती
तंत्रज्ञानाचे ज्ञान
हृदयाचे स्थान, आकारहृदयाची  रचना, भागांची नावे
....................................
....................................
व्याख्यान पद्धती, स्पष्टीकरण , व्हिज्युअलायझेशन, चेतक प्रश्न, रेखांकन कौशल्य
....................................
....................................


छायाचित्र, आकृती, रेखाटन, अॅनिमेशन, चित्रपट्टिका  

....................................
....................................
५.    वरच्या चौकटीत लिहिलेले सारशब्द खालील चौकटींमध्ये निकषानुसार जोड्या जुळवून लिहा
शिक्षणशास्त्र आणि विषय ज्ञान सारशब्दांची जोडी

तंत्रज्ञान आणि विषय ज्ञान सारशब्दांची जोडी
तंत्रज्ञान आणि शिक्षणशास्त्र सारशब्दांची जोडी
रक्ताभिसरण : व्हिज्युअलायझेशन
....................................
....................................
अॅनिमेशन : रक्ताभिसरण

....................................
....................................

अॅनिमेशन : व्हिज्युअलायझेशन
....................................
....................................
६.    आपली अध्यापनाची उद्दिष्टे विचारात घेवून वरच्या चौकटीतील शब्दांची त्रिके तयार करा.
विषयज्ञान – शिक्षण शास्त्र – तंत्रज्ञानाची त्रिके
रक्ताभिसरण : व्हिज्युअलायझेशन : अॅनिमेशन
................................................................................
................................................................................


           या प्रमाणे पाठ्य घटकाचे विश्लेषण करून पाठ नियोजनाला सुरवात केल्यास अध्यापनात योग्य तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करता येईल. 
अध्यापन उत्तम  होण्यासाठी  शैक्षणिक उद्दिष्टेआपल्या आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या क्षमता यांचा विचार करून योग्य  तंत्रज्ञानाच्या साह्याने एखाद्या शैक्षणिक अनुभवाची योजना कशी करता येईल याचा विचार क्रमशः  करू या.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे

Comments

  1. उदाहरण दिल्यामुळे नेमके समजले. मी एका भाषणात याचा उल्लेख करीन.
    मात्र अध्यापक होणे खूप अवघड आहे असे वाटायला लागले.

    ReplyDelete
  2. खरंच फक्त उदाहरण आहे म्हणूनच समजले.

    ReplyDelete
  3. उदाहरणासह दिल्यामुळे समजणे सोपे झाले... प्रबोधिनीत यायचे समर्थ व्हावया... आता तर प्रबोधिनी आपल्या द्वारी! खरंच आभारी आहोत...

    ReplyDelete
  4. शिक्षक खर्या अर्थाने सम्रुध्द होण्याचा मार्ग. खूप छान

    ReplyDelete
  5. Khupach chhan samajawle udaharan gheun .
    Dhanywad

    ReplyDelete
  6. उदाहरण दिल्यामुळे अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा हे अधिक स्पष्ट झाले

    ReplyDelete
  7. आज online workshop मध्ये ऐकायला मिळाले आणि समजून घेता आले. खरच उदाहरण दिल्याने सोपे झाले आहे. 🙏

    ReplyDelete
  8. सर मी तंत्रज्ञान वापरून नेहमीच अध्यापन करत असते, मी या साठी काही animated video, image video ऑनलाईन quiz,बनवून माझ्या दैनंदिन अध्ययन अध्यापन मधे नेहमीच वापर करत असते.
    मात्र आता आपण दिलेल्या नोट्स व आराखडा पाहून निश्चितच माझ्या तंत्रज्ञान साहित्य निर्मितीत नाविन्यता व कल्पकता येईल व माझे विद्यार्थी अजून सृजनशील होतील कारण उठावदार व दर्जेदार असे डिजिटल साहित्य द्वारे अध्ययन अनुभव मिळाला तर माझ्या सोबत माझ्या विद्यार्थ्याची पण शैक्षणिक गुणवत्ता नक्कीच वाढेल.
    आपलें मना पासून आभार.

    ReplyDelete
  9. उदाहरण दिल्यामुळे समजण्यास सोपे झाले. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची विविध विषयांची आवड वाढण्यास खूप मदत होईल.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्व-विकासाचा मार्ग

  स्व-विकासाचा मार्ग दुकानातून पातळ पोहे आणून त्याचा तयार केलेला चिवडा आणि तेच पातळ पोहे दोन दिवस उन्हात वाळवून त्याचा केलेला चिवडा — कोणता चिवडा जास्त आवडतो ? अळूची भाजी खाल्ल्यानंतर तुमच्या घशात कधी खवखवले आहे का ? हे दोन स्वयंपाकघराशी आणि खाण्याशी निगडीत प्रश्न सुरुवातीला का विचारतो आहे , असा प्रश्न मनात आला का ? दुकानातून आणलेले पोहे जरी कोरडे असले तरी पातळ पोहे उन्हात वाळवल्याने त्यातील उरलेसुरले बाष्प निघून जाते , तसेच उन्हात भाजल्याने ते जास्त खरपूस बनतात. कुरकुरीत असलेले पोहे उन्हात वाळवल्याने त्यांच्या कुरकुरीतपणा या गुणात वाढ होते. अळूच्या पानात , देठात आणि कंदात कॅल्शियम ऑक्झालेटचे स्फटिक असतात , ज्यामुळे घसा खवखवतो. अळू शिजवण्यापूर्वी नीट धुतला आणि शिजवताना त्यात चिंच वा आंबट चुका वापरल्यास ही स्फटिकद्रव्ये कमी होऊन घसा खवखवण्याची शक्यता कमी होते. अळूच्या भाजीत शेंगदाणे–खोबरे ही चव वाढवणारी भर नंतरची , पण आधी चिंच वापरून भाजीतील दोष दूर करावा लागतो. स्वयंपाक करताना आपण पदार्थावर अनेक क्रिया करत असतो , ज्यामुळे पदार्थातील दोष कमी होतात किंवा निघून जातात ,...

Task Instructions for PBL Guide Teachers : Enriching Skills Required for PBL

  Task Instructions for PBL Guide Teachers Thoughts on Enriching Skills Required for PBL Objective: To enrich the understanding of skill enrichment required for Project-Based Learning (PBL) by developing a comprehensive mind map and writing a short note. Steps: 1.     Review Shared Diagram: Begin by reviewing the diagram that lists a few skills required for project work, which has been shared with you along with activity instructions. 2.     Expand the Skill List: Add to the list of skills required for effective project work. 3.     Develop a Mind Map: Create a new mind map that represents the importance and scope of skill enrichment for PBL, Organize the skills into categories and show their relationships and interdependencies. 4.     Write a Short Note: ·        Based on your mind map, write a short note covering the following points: ·      ...

বন্দে গুৰু পৰম্পৰা

বন্দে গুৰু পৰম্পৰা গুৰু পূৰ্ণিমা মানে জ্ঞান পৰম্পৰাৰ বাহক হোৱাৰ দিন । ইয়াম বিৱস্বতে যোগ প্ৰক্তৱনহম্ভায়ম । বিৱস্বণ মনভে প্ৰাহ মনুৰিক্ষৱকভে ব্ৰেৱীত ।। ( ৪ - ১ ) ( এটি অক্ষয় যোগৰ বিষয়ে মই সূৰ্য দেৱতাক বৰ্ণনা কৰিছো । বিৱস্বণে তেতিয়া মনুক সম্বোধন কৰিলে , আৰু মনুৱে ইক্ষৱাকুক সম্বোধন কৰিলে ) ।           ভাগৱত গীতাত   অৰ্জুনক উপদেশ দিওঁতে ভগৱান শ্ৰীকৃষ্ণই জ্ঞানৰ পৰম্পৰাৰ উদাহৰণ দাঙি ধৰিছে । তেওঁ কয় ,” মই এই অবিনাশী যোগ সূৰ্যক ( বিবাস্বণ ) প্ৰদান কৰিলোঁ , যিয়ে ইয়াক মনুলৈ আগবঢ়াই দিলে । “           ভাৰতীয় পৰম্পৰাত যেতিয়াই নতুন জ্ঞান বা দৰ্শন উপস্থাপন কৰা হয় , তেতিয়াই গুৰুৰ পৰম্পৰাৰ উত্তৰাধিকাৰিকো স্বীকৃতি দিয়া হয় , কাৰণ জ্ঞানৰ বংশ সংৰক্ষণ পাৰ হৈ গ ’ লেহে জ্ঞান বিস্তাৰিত হৈ উঠে ।           জ্ঞান প্ৰবোধিনীয়ে চাৰিজন মহান ব্যক্তিত্ব সমৰ্থ ৰামদাস , স্বামী বিবেকানন্দ আৰু যোগী অৰবিন্দক নিজৰ দূৰদৰ্শী হিচাপে ...