इतिहास शिकता-शिकवताना : ५ माहितीच्या कल्पनाचित्रणातून इतिहासाचा वेध घेऊया इतिहास शिकवताना मी विद्यार्थ्यांना अनेकदा एक गटकार्य दिले आहे. हे गटकार्य देताना विद्यार्थ्यांना मी प्रथम त्या काळच्या परिस्थितीत घेऊन जातो. “ कल्पना करा , तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील गुप्तहेर खात्यात काम करत आहात. बहिर्जी नाईक यांनी तुम्हाला सुरतेच्या मोहिमेपूर्वी तेथील परिस्थितीची माहिती गोळा करण्याची जबाबदारी दिली आहे. मोहिमेचे उद्दिष्ट स्पष्ट आहे—कमीत कमी वेळेत सुरतेपर्यंत पोहोचणे , तेथील परिस्थितीचा अचूक अंदाज घेणे आणि मोहिमेसाठी आवश्यक माहिती मिळवून सुरक्षितपणे परत येणे. ही मोहीम मुघल साम्राज्याच्या आतल्या भागातील एका महत्त्वाच्या व्यापारी पेठेशी संबंधित आहे. त्यामुळे मोहिमेपूर्वी शक्य तितकी अचूक आणि विविध प्रकारची माहिती मिळवणे आवश्यक आहे. आता तुम्ही गुप्तहेर म्हणून टेहळणीसाठी निघाला आहात. तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची माहिती मिळवावी लागेल ? ती कोणाकडून मिळू शकेल ? कोणत्या मार्गाने मिळवता येईल ? मिळालेली माहिती खरी आणि विश्वासार्ह आहे , हे कसे ठरवाल ? वेगवेगळ्या व्...
'अभ्यास देशस्थितीचा समतोल चलो' ज्ञान प्रबोधिनीच्या कामाच्या निमित्ताने झालेल्या प्रवासात शिक्षण विश्वाचे झालेले दर्शन व त्या निमित्ताने झालेला विचार मांडण्यासाठीचे लेखन