Skip to main content

Posts

Showing posts from June, 2026

ज्ञान वारशाचा पुनर्शोध आणि भारताचे आत्मभान

ज्ञान वारशाचा पुनर्शोध आणि भारताचे आत्मभान काही महिन्यांपूर्वी वाचनात आलेल्या एका शिक्षकाची प्रेरणादायी कथा शेअर करण्यासाठी आज लिहित आहे. त्यांच्या वर्गातील एका साध्या प्रसंगाला त्यांनी ज्या संवेदनशीलतेने प्रतिसाद दिला , त्या एका घटनेमुळे त्यांच्या पुढील आयुष्याने एका विलक्षण बौद्धिक प्रवासाचे रूप घेतले. ही कथा फ्रान्समधील गणित शिक्षक आणि इतिहासकार जॉर्ज इफ्रा यांची आहे. त्यांचे कार्य आपल्याला शिक्षण , जिज्ञासा आणि संशोधनाच्या खऱ्या भावनेची जाणीव करून देते. १९७० च्या दशकात जॉर्ज इफ्रा फ्रान्समध्ये एका प्राथमिक शाळेत   गणित शिकवत होते. अनेक संवेदनशील शिक्षकांप्रमाणेच त्यांनाही वाटत होते की , विद्यार्थ्यांनी भीती , संकोच किंवा लाज न बाळगता प्रश्न विचारले पाहिजेत. त्यांचा विश्वास होता की कोणताही प्रश्न छोटा नसतो. एकदा वर्गातील चर्चेदरम्यान एका विद्यार्थ्याने त्यांना साधासा प्रश्न विचारला— “ संख्या कुठून आल्या ? त्यांचा शोध कोणी लावला ? आपण त्या अशाच प्रकारे का लिहितो ?” यानंतर इतर विद्यार्थ्यांनीही अनेक प्रश्न विचारले— १ , २ आणि ३ सारखे अंक असेच का लिहिले जातात ? प्राचीन संस्कृत...