Skip to main content

Posts

Showing posts from December, 2020

तंत्रस्नेही अध्यापकत्व : लेख 8

  तंत्रस्नेही अध्यापकत्व  लेख 8 :  डिजिटल स्वाध्याय-प्रवचन ज्ञान मिळवण्याच्या दोन पद्धती भारतीय परंपरेत महत्त्वाच्या मानल्या आहेत :   ‘ स्वाध्याय आणि प्रवचन ’   अर्थात शिकणे आणि शिकवणे या दोन पद्धतींनी ज्ञानार्जन करता येते. स्वाध्याय  : स्वाध्यायाचे दोन अर्थ आहेत. स्वतः अध्ययनासाठी प्रवृत्त होऊन अध्ययन करणे आणि स्वतःचा अभ्यास करणे अर्थात स्वतःबद्दल जाणून घेणे.           स्वयंअध्ययनात माझ्या (अर्थात शिकणाऱ्याच्या) इच्छेनुसार , मी ठरवले आहे म्हणून , मला प्रश्न पडला म्हणून , मला सुचले म्हणून विद्यार्थी अध्ययनाला प्रवृत्त होणे अपेक्षित आहे. कोणीतरी सांगितले , बोर्डाचा नियम आहे म्हणून , शाळेने सक्ती केली म्हणून अभ्यास करणे अपेक्षित नाही. अर्थातच त्यामुळे शिकण्याच्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी शिकणारा असतो तर अध्यापक मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतो.   स्वाध्यायाच्या दुसऱ्या अर्थात स्वतःबद्दलचे चिंतन अपेक्षित आहे , अर्थात मी हे का शिकणार आहे , कसे शिकणार आहे , मी हे कसे शिकलो , याचा मी कसा उपयोग करणार , यातून माझ्या...