Skip to main content

Posts

Showing posts from September, 2021

ओळख एका गर्दभारण्याची...

ओळख एका गर्दभारण्याची...                        वाई गाव आणि गाढवांची विशेष आठवण आहे. हॉही... हॉही.. करत पळणाऱ्या गाढवाची लाथ खायची का गटारात पडायचे  अशा संभ्रमात अनेकदा रस्त्यात गटाराच्याकडेला अंग चोरून उभे राहावे लागायचे. आमचे घर नदीच्या कडेला होते त्यामुळे नदीतून वाळू काढून, ती चाळून मग गाढवांवर लादून गावात घेवून जाणारे वाळूवाले हे तर खिडकीच्या चौकटीतून दिसणारे रोजचेच दृश्य होते. या सगळ्याची आठवण झाली कारण दोन दिवस संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी, जि. नांदेड याच्या ‘डाँकेश्वर’ केंद्रातील अतिथी गृहात निवासाला होतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्या परिसरात गाढवांचे अभयक्षेत्र म्हणून ‘धर्मा गाढवांचे अभयारण्य ( D harma Donkey Santuary ) ’ उपक्रम राबवला जातो.   आजही गावांमध्ये गाढव  शेतमाल , बांधकाम साहित्य इत्यादींच्या वाहतुकीसाठी उपयोगात असलेला प्रमुख प्राणी आहे.  तरी देखील जगात जवळजवळ सर्वत्र , गाढव हा सर्वात दुर्लक्षित प्राणी आहे. गाढव सर्वात उपयुक्त प्राणी असूनही , त्यांचा मालक पाळीव जनावरांप्र...