Skip to main content

Posts

Showing posts from October, 2021

पुस्तक परिचय : ‘राष्ट्रघडणीसाठी मनुष्यघडण’

पुस्तक परिचय : ‘राष्ट्रघडणीसाठी मनुष्यघडण’ वाच. गिरीश श्री. बापट, संचालक ज्ञान प्रबोधिनी लिखित ‘राष्ट्रघडणीसाठी मनुष्यघडण’ हे पुस्तक ज्ञान प्रबोधिनीच्या औपचारिक शाळा आणि ज्ञान प्रबोधीनिद्वारा संचालित विविध पूरक शिक्षण विस्तार उपक्रमांचे संचित, त्यामागचा विचार आणि या प्रयोगशील उपक्रमांमधून ज्ञान प्रबोधिनीला सापडलेला शिक्षण विचार आपल्यापर्यंत पोचवते. पुस्तकातील अनेक लेखांमधून हा शिक्षण विचार विकसित होण्याच्या प्रवासाचे दर्शन वाचकाला होते. प्रबोधिनी अंतर्गत आणि अन्य व्यासपीठांवर प्रबोधिनीच्या शैक्षणिक प्रयोगांची मांडणी करण्यासाठी मा. गिरीशरावांनी दिलेली भाषणे व त्यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह ‘राष्ट्रघडणीसाठी मनुष्यघडण’ या पुस्तकात केलेला आहे. मनुष्य घडणीसाठी ज्ञान प्रबोधिनीच्या शैक्षणिक रचना आणि प्रयोगांची मांडणी या पुस्तकातील लेखांमध्ये केलेली आहे. ‘ मनुष्य घडणीसाठी शिक्षण ’ असा विचार करताना भूमिका लेखात लेखकाने शिक्षणाचे तीन आयाम सांगितले आहेत १. आशयाचे शिक्षण, २. प्रक्रियांचे शिक्षण, ३. संदर्भ तयार करण्याचे शिक्षण. ज्ञान प्रबोधिनीच्या या त्रिवेणी शिक्षण पद्धतीच्या गोफामध...