Skip to main content

Posts

Showing posts from December, 2022

संपादकीय : ई-प्रशिक्षक अंक नोव्हेंबर २०२२

संपादकीय : ई-प्रशिक्षक अंक नोव्हेंबर २०२२ सस्नेह नमस्कार , गेला महिनाभर ' पाठयपुस्तकातील कोरी पाने ' हा शिक्षण विश्वात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला मुद्दा राहिला. अनेकांनी या विषयावर आपली मते नोंदवली. ' पुस्तकाचे ओझे ' ते ' पाठ्यपुस्तकाच्या वाढीव पानांच्या खर्चाची तरतूद ' असे अनेक मुद्दे उपस्थित केले गेले. शासनाने यावर शिक्षकांकडून सूचना देखील मागवल्या. खरा प्रश्न या कल्पनेच्या स्वागतार्हतेचा वा उपयुक्ततेबरोबर ही कल्पना स्वीकारण्यासाठी राबवण्याच्या यंत्रणेचा , कार्यवाहीच्या रचनांचा , प्रशिक्षणाचा आणि कार्यवाहीचे अनुसंधान करण्याचा आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी शिक्षणात नवीन प्रयोग करणाऱ्या शिक्षकांच्या एका सादरीकरणात मी ' पाठयपुस्तकातील कोरी पाने ' हा नवोपक्रम पहिल्यांदा ऐकला. एका शिक्षकांनी तो विषय शिक्षकांसाठी राबवला होता तर दुसऱ्यांनी तो विद्यार्थ्यांबरोबर वर्गासाठी राबवला होता. शब्दार्थ , पूरक उदाहरणे [शिक्षक पुस्तकातच   लिहितात. या निरीक्षणावर आधारित अध्यापनासाठीचे संदर्भ शिक्षकांनी पाठ्यपुस्तकात व्यवस्थित नोंदवावेत ; त्यात वेळोवेळी भर घाल...