संपादकीय : ई-प्रशिक्षक अंक नोव्हेंबर २०२२
सस्नेह
नमस्कार,
गेला
महिनाभर 'पाठयपुस्तकातील कोरी पाने' हा शिक्षण
विश्वात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला मुद्दा राहिला. अनेकांनी या विषयावर आपली
मते नोंदवली. 'पुस्तकाचे ओझे' ते 'पाठ्यपुस्तकाच्या
वाढीव पानांच्या खर्चाची तरतूद' असे अनेक मुद्दे उपस्थित केले गेले. शासनाने यावर
शिक्षकांकडून सूचना देखील मागवल्या.
खरा प्रश्न
या कल्पनेच्या स्वागतार्हतेचा वा उपयुक्ततेबरोबर ही कल्पना स्वीकारण्यासाठी
राबवण्याच्या यंत्रणेचा, कार्यवाहीच्या रचनांचा, प्रशिक्षणाचा
आणि कार्यवाहीचे अनुसंधान करण्याचा आहे.
सुमारे २५
वर्षांपूर्वी शिक्षणात नवीन प्रयोग करणाऱ्या शिक्षकांच्या एका सादरीकरणात मी 'पाठयपुस्तकातील
कोरी पाने' हा नवोपक्रम पहिल्यांदा ऐकला. एका शिक्षकांनी तो विषय
शिक्षकांसाठी राबवला होता तर दुसऱ्यांनी तो विद्यार्थ्यांबरोबर वर्गासाठी राबवला
होता.
शब्दार्थ, पूरक
उदाहरणे [शिक्षक पुस्तकातच लिहितात. या
निरीक्षणावर आधारित अध्यापनासाठीचे संदर्भ शिक्षकांनी पाठ्यपुस्तकात व्यवस्थित
नोंदवावेत; त्यात वेळोवेळी भर घालत जावी ही अपेक्षा होती. त्यासाठी
पुस्तकातील पाने वेगळी करून प्रत्येक पानानंतर एका कोऱ्या पानाची भर घालून त्यांनी
पुस्तकाची पुनर्बांधणी करून घेतली होती.
विद्यार्थ्यांकरिता
हा उपक्रम राबवताना, स्वयंअध्ययनातील महत्त्वाचे कौशल्य म्हंजे वर्गात टिपणे काढणे.
यासाठी महत्त्वाच्या नोंदी करणे- शब्दार्थ, पूरक
उदाहरणे, आकृत्या, पाठासंदर्भात सुचवलेले अवांतर वाचन आणि कृती यांच्या
नोंदी विद्यार्थ्यांनी कराव्यात आणि असे नोंदवलेले संदर्भ अभ्यासाच्या वेळी सहज
उपलब्ध व्हावेत या उद्दिष्टाने हा नवोपक्रम राबवला होता. अशा नोंदी
विद्यार्थ्यांनी करायला शिकावे यासाठी प्रशिक्षणाची त्यांची एक पद्धत होती. वर्गात
अध्यापन करताना चांगला अध्यापक अध्यापनाच्या आशयाचे एक संकल्पना चित्र फलकावर तयार
करत जातो. फळ्यावरील नोंदी म्हणजे त्या तासाच्या अध्यापनाचा सारांशच असतो!
त्यामुळे कोऱ्या पानांवर विद्यार्थ्यांनी.. किमान अध्यापकांनी फळ्यावर नोंदवले
लिहावे असा संकेत वर्गात त्यांनी रूढ केला
होता.
एखाद्या अध्यापकाला, शाळेला नवोपक्रमाची कल्पना कशी सुचते ?
त्याच्या
समोरील आव्हानांवर मात करण्याच्या धडपडीतून किंवा शाळेत त्यांनी निश्चित केलेली
उद्दिष्टे साध्य करण्याच्या हेतूने केलेल्या प्रयत्नातून!!
स्थानिकता
हे नवोपक्रमाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ही स्थानिकता फक्त भौगोलिक नसून, राबवणाऱ्या
शिक्षकांची प्रेरणा, त्यांची धडपड आणि तज्ज्ञता अशा अनेक आयामांची आहे.
कल्पनेच्या
स्थानिकत्वाचे सार्वत्रिकीकरण करायचे असल्यास त्यावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे.
टिश्यू कल्चरमध्ये प्रयोगशाळेतील रोप शेतात रुजवायचे असेल तर 'प्रयोगशाळा
ते शेत' या दरम्यान रोपाला 'हार्डनिंग'च्या
टप्यातून जावेच लागते. शिक्षणातील नवोपक्रम हे प्रयोगशाळेतील रोप आहे. त्याचे
सार्वत्रिकीकरण करायचे असेल तर आधी त्याला हार्डनिंगच्या टप्प्यातून जावे लागेल.
शैक्षणिक रचनांमधील असमानता आणि विविधता विचारात घेऊन
उपक्रमातील आशयाचा गाभा जपणे, विविधता विचारात घेऊन उपक्रमाचे स्थानिक अनुकूलन होणे, उपक्रम
शाश्वत व टिकाऊ होण्यासाठी उपक्रम गटाची तयारी करणे असे सर्व घटक 'हार्डनिंग'साठी
विचारात घ्यावे लागतील. हे सगळे करताना उपक्रमाचे वेगळेपण जपण्यासाठी विचार करून, पथदर्शी
प्रयोग केल्यानंतरच अशा योजना सार्वत्रिक कराव्यात. त्यामुळे शैक्षणिक योजना ह्या
नवोपाक्रमाचा गाभा जपणाऱ्या, वैशिष्ट्यपूर्ण अशा होतील.
सस्नेह,
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
खूपच छान माहिती या श्लोकाचा आणि शिक्षण याचा संबंध आज स्पष्ट झाला
ReplyDelete