Skip to main content

स्व-विकासाचा मार्ग

 स्व-विकासाचा मार्ग

दुकानातून पातळ पोहे आणून त्याचा तयार केलेला चिवडा

आणि तेच पातळ पोहे दोन दिवस उन्हात वाळवून त्याचा केलेला चिवडा

— कोणता चिवडा जास्त आवडतो?
अळूची भाजी खाल्ल्यानंतर तुमच्या घशात कधी खवखवले आहे का?


हे दोन स्वयंपाकघराशी आणि खाण्याशी निगडीत प्रश्न सुरुवातीला का विचारतो आहे, असा प्रश्न मनात आला का?

दुकानातून आणलेले पोहे जरी कोरडे असले तरी पातळ पोहे उन्हात वाळवल्याने त्यातील उरलेसुरले बाष्प निघून जाते, तसेच उन्हात भाजल्याने ते जास्त खरपूस बनतात. कुरकुरीत असलेले पोहे उन्हात वाळवल्याने त्यांच्या कुरकुरीतपणा या गुणात वाढ होते.

अळूच्या पानात, देठात आणि कंदात कॅल्शियम ऑक्झालेटचे स्फटिक असतात, ज्यामुळे घसा खवखवतो. अळू शिजवण्यापूर्वी नीट धुतला आणि शिजवताना त्यात चिंच वा आंबट चुका वापरल्यास ही स्फटिकद्रव्ये कमी होऊन घसा खवखवण्याची शक्यता कमी होते. अळूच्या भाजीत शेंगदाणे–खोबरे ही चव वाढवणारी भर नंतरची, पण आधी चिंच वापरून भाजीतील दोष दूर करावा लागतो.

स्वयंपाक करताना आपण पदार्थावर अनेक क्रिया करत असतो, ज्यामुळे पदार्थातील दोष कमी होतात किंवा निघून जातात, तसेच काही प्रक्रिया अशा असतात की ज्यामुळे पदार्थाच्या अंगभूत गुणांमध्ये वाढ होते. आठवून तर पाहा — आपण खाण्यासाठी काय काय करतो!

आपल्या दैनंदिन जीवनात स्वयंपाकघर हे असे ठिकाण आहे जेथे आपण 

गुणाधान आणि दोषापनयन या प्रक्रिया सतत करत असतो. 

भारतीय ज्ञानपरंपरेत आयुर्वेदात औषधे तयार करताना पदार्थाचे औषधात रूपांतर करण्यासाठी पदार्थाच्या गुणांमध्ये ‘आधान’ म्हणजे वाढ करणे, रुजवणे, प्रदान करणे आणि पदार्थातील दोषांचे ‘अपनयन’ म्हणजे दूर करणे, काढून टाकणे, नष्ट करणे — या दोन प्रकारच्या प्रक्रिया सुचवल्या आहेत. 

व्यक्तिमत्त्वविकसन म्हणजे काय?

तर सद्गुणांची रुजवण म्हणजेच सकारात्मक गुणांची भर घालणे

आणि दोषांचे निरसन करणे म्हणजेच नकारात्मक गुणांचे उच्चाटन करणे.

त्यामुळे व्यक्तिमत्त्वविकसनासाठी शैक्षणिक अनुभवांची योजना करायची असेल तर त्या अनुभवांमुळे गुणाधान वा/आणि दोषापनयन होईल, याची योजकाने काळजी घेतली पाहिजे.

खरेतर योजकाने अशा अनुभवांची योजना करायला हवी की, ज्या अनुभवाद्वारे साधक–विद्यार्थ्याला ही व्यक्तिमत्त्वविकासाची द्विसूत्री — चांगले गुण बाणवणे आणि वाईट सवयी दूर करणे — स्वतः करता येईल.

गुणाधान आणि दोषापनयन या प्रक्रियेची सुरुवात आत्मपरीक्षणाने होते. 

"आपल्याकडे कोणते गुण आधीपासून आहेत?" आणि "कोणते दोष आपल्या प्रगतीस अडथळा ठरत आहेत?" हे दोन प्रश्न विचारून जी यादी तयार होईल, त्यातून सद्यस्थिती समजून घेता येईल. 

त्यानंतर कशात बदल करायचा आहे, त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करून त्यातील बदलांचे उद्दिष्ट मांडणारे संकल्प वर्षारंभी करता येतील. वर्षाअखेरीस मनोगत लेखनात गुणाधान आणि दोषापनयन यांचा आढावा घेता येईल.

एक कल्पना!

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनात

गुणाधान आणि दोषापनयन यावर आधारित एक नोंदपत्रक विद्यार्थ्यांना वर्षाअखेरीस देता येईल का?

किंवा त्यांच्याकडून असे स्वमूल्यमापन पत्रक तयार करून घेता येईल का?

गुणाधान आणि दोषापनयन : स्व-विकासाचा मार्ग

भारतीय ज्ञान परंपरेतील सूत्रे

प्रशांत दिवेकर

ज्ञान प्रबोधिनी, पुणे

Comments

  1. खूप छान 👍

    ReplyDelete
  2. उत्तम आह़े ही प्रक्रिया

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती                       जुलै महिन्यात झारखंडला जमशेदपूर जवळ घाटशिला गावी शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. पूर्वीसिंघभूम जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्री श्री विदया मंदिर नावाने संथाळ आदिवासी भागात या शाळा चालवल्या जातात. टाटानगर पासून  ३-४ तासाच्या अंतरावर असून देखील विकास नाही. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात या शाळा स्वयंसेवी वृत्तीने चालवल्या जातात. शाळेला सरकारी अनुदान  नाही तरीही  मोफत शिक्षण आणि मोफत पोषक आहार दिला जातो . शाळेत कुपोषित विद्यार्थी नाहीत  आणि जवळपासच्या सरकारी शाळांचा विचार करता श्री श्री विदया मंदिर शाळेत शैक्षणिक गळती ० %. हे गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नातून सध्या झाले आहे. आता या शाळा माध्यमिक टप्प्यापर्यंत पोचल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणाबरोबर तंत्र शिक्षण देऊन गावात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हे शाळेचे पुढचे उद्दिष्ट आहे. ज्ञान प्रबोधिनी त्यांच्या या प्रयत्नात शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करते आहे.     ...

सहपुस्तक चाचणी

  सहपुस्तक चाचणी                मार्च महिन्यात शालांत परीक्षा सुरु झाल्यावर वर्तमानपत्रे ; दूरचित्रवाणीवर दहावी , बारावीच्या परीक्षेत चालू असलेल्या कॉपी पुरवठ्याची छायाचित्रे , बातम्या , चित्रफिती दिसू लागतात. माध्यमात चर्चा सुरु होते आणि आपण कशासाठी शिकवतो ? असा प्रश्न पडतो. त्याला प्रतिसाद म्हणून कॉपी मुक्ती अभियान सुरु केले जाते आणि हळूहळू त्याचाच अभिमान वाटायला लागतो. परीक्षा कशासाठी... ? वर्गात शिक्षक पुस्तकातील पाठ वाचून दाखवतात , स्पष्टीकरण म्हणून वाक्य बोलीभाषेत रुपांतर करून मांडतात , पाठाचा सारांश सांगतात. परीक्षेत पाठाखालील सरावासाठी दिलेलेच प्रश्न विचारतात. पाठाखालच्या सरावातील प्रश्नच विचारायचे असतील तर परीक्षा कशासाठी... ?              माझे एक मित्र वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. गप्पा मारताना ते मला म्हणाले , ' अमुक सालानंतर डॉक्टर झालेल्यांकडून उपचार करून घेऊ नका. ' मी विचारले , का ? काय झाले ? म्हणाले - "त्यावर्षी मला पहिल्या...

सत्यं च स्वाध्यायप्रवचने च।

  सत्यं च स्वाध्यायप्रवचने च। प्रकृति के सानिध्य में रहकर उसके साथ एकत्व का अनुभव करना , स्वाध्याय का प्रथम सूत्र है , जो हमें ब्रह्मांड के निर्माण और उसके रहस्यों को जानने की प्रेरणा देता है। जड़-चेतन धारणाओं से जुड़ी मूलकण , वंशसूत्र , गुणसूत्र जैसी सूक्ष्मतम चीज़ों के अध्ययन से लेकर ब्रह्मांड के विस्तार के अध्ययन तक का व्यापक आयाम हमें प्रकृति के गहनतम रहस्यों में प्रवेश करने का मार्ग प्रदान करता हैं। ब्रह्मांड के विशाल विस्तार और उसकी अनंतता को समझने का प्रयास करने के लिए पहला उपनिषदिक अध्ययन सूत्र है "ऋतं च स्वाध्याय प्रवचने च।" ऋतम् का अध्ययन ब्रह्मांड के नियमों और संरचनात्मक सिद्धांतों को समझने की कुंजी है। ऋतम् का अध्ययन   केवल दार्शनिक धारणा नहीं है , बल्कि यह ब्रह्मांड की रचना और उसके संचालन में निहित नियमों को   वैज्ञानिक दृष्टिकोणद्वारा गहराई से समझना है। यह हमें   सिखाता है कि ब्रह्मांड किस प्रकार संतुलित और सुव्यवस्थित रूप से कार्य करता है। ऋतम् का स्वाध्याय करते समय हम अपने परिवेश को गहराई से समझने लगते हैं। प्रकृति के रहस्यों की खोज और उन...