श्री विद्यालक्ष्मी
लहानपणापासून अनेकदा ऐकत; वाचत आलो आहे, लक्ष्मी ही धनाची देवता आणि
सरस्वती ही विद्येची देवता ! सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाहीत !!......... जेथे सरस्वती असते तेथे
लक्ष्मीचा निवास क्वचितच असतो !!!..........
काही दिवसांपूर्वी चेन्नईच्या द्वारकादास
गोवर्धनदास वैष्णव कॉलेजमध्ये अतिथी निवासात मुक्कामी होतो. सकाळी महाविद्यालाच्या
आवारात फिरायला गेलो असताना एक पंचायतन :
‘ श्री
विद्यालक्ष्मी, श्री विद्यावल्लभ महागणपती,
श्री सरस्वती, श्री
कार्यसिद्धी भक्त आञ्जनेय , श्री
गोपालकृष्ण’ दिसले.
कॉलेजच्या आवारात देवळे, सकाळी पूजा , ठरलेल्या वेळी
प्रार्थना हे विशेषच होते. या पंचायतनात एका देवीचे नाव विशेष होते; कदाचित पहिल्यांदाच वाचत होतो ‘श्री विद्यालक्ष्मी’.
देवीची धनलक्ष्मी, गजलक्ष्मी , श्रीदेवी , भूदेवी
आदी रूपे माहिती होती. पण श्री विद्यालक्ष्मी’ नवीनच होते. थोडी माहिती मिळवल्यावर,
विचार केल्यावर या नवीन पंचायतनाचा अर्थ उलगडत गेला.
भारतीय परंपरेत ऋग्वेद एक मंत्र
आहे "एकम सद विप्रा बहुधा
वदन्ति" या मंत्राचा अर्थ आहे: सत्य एकच आहे, परंतु ज्ञानी लोक त्याला विविध नावांनी पुकारतात. म्हणजेचे
आपल्याला काय
साध्य करायचे आहे,
त्यासाठी
कोणती शक्ती आवश्यक आहे
आणि त्यासाठी
कोणती उपासना (कृती) करावी लागेल
यानुसार भारतीय परंपरेत त्या सत्याचे प्रगटीकरण विविध
देवतांच्या रुपात करण्याचे स्वातंत्र साधकाला आहे.
आज लक्ष्मी पूजन! लक्ष्मी देवी हे भारतीय धर्मात संपत्ती, वैभव, समृद्धीचे प्रतीक मानले जाते. देवी लक्ष्मी भगवान विष्णूंची
पत्नी आहे. भगवान
विष्णू ,जे त्रिदेवांपैकी एक आहेत आणि ज्यांच्याकडे सृष्टीचे संचालन, संरक्षण आणि संतुलन राखणे आहे. हे कार्य त्यांच्याकडून
सिद्धीस जावे यासाठी त्यांच्या दोन बाजूंना श्रीदेवी
(धन) आणि भूदेवी (धान्य) च्या प्रतिमा
असतात. आज
आपण श्रीलक्ष्मीच्या कृपेने संपत्ती आणि समृद्धी मिळावी यासाठी प्रार्थना करतात.
श्रीलक्ष्मीची आठ प्रमुख रूपे आहेत. ‘अष्टलक्ष्मी’ : आदि
लक्ष्मी: (सृष्टीची मूल/उगम शक्ती), धन
लक्ष्मी (संपत्ती, वैभव), धान्य लक्ष्मी (धनधान्य, पोषण), गज लक्ष्मी (ऐश्वर्य, सत्ता), संतान लक्ष्मी (
पुत्रप्रपौत्र ), विजय लक्ष्मी (यश, कीर्ती, विजय), विद्या लक्ष्मी(
ज्ञान ), धैर्य लक्ष्मी (शौर्य, आत्मबल ).
पंचायतनात श्री विद्यावल्लभ महागणपतीच्या दोन बाजूंना श्री
विद्यालक्ष्मी, श्री सरस्वतीची मंदिरे
आहेत.
विद्यार्जनाच्या प्रक्रियेत श्री गणपती ही
ज्ञान आणि बुद्दीमत्ता विकसनासाठी उपासनीय देवता मानली जाते.
ज्याच्या
कृपेने बौद्धिक विकसनातील स्मरणशक्ती, एकाग्रता आणि
चिंतन क्षमता वाढते.
श्री विद्या लक्ष्मी ही ज्ञानाची
देवता आहे
जी विद्यार्थ्यांला
जिज्ञासा, कौशल्य आणि विचारशक्ती प्रदान करते.
तिच्या
आशीर्वादाने ज्ञानरुपी धन प्राप्त होते,
तसेच
समाजासाठी ज्ञानाचा सकारात्मक उपयोग करण्याची
प्रेरणा मिळते.
श्री सरस्वती ही भारतीय परंपरेत
विद्या, ज्ञान, संगीत, कला, आणि वाणीची देवी मानली जाते.
तिला
शुद्धतेचे आणि सर्जनशीलतेचे प्रतीक मानले जाते.
सरस्वती
देवीच्या हातात वीणा, पुस्तक, आणि माळ असते,
ज्यामुळे
ती संगीत, शिक्षण, आणि साधनेचे प्रतीक बनते.
सरस्वतीच्या
कृपेने विद्यार्थ्यांना विद्या, स्मरणशक्ती, आणि
विवेक प्राप्त होतो,
ज्यामुळे
जीवनात ज्ञानाचे आणि संस्कारित
सांस्कृतिक समृद्धीचे महत्त्व
वाढते.
गणपतीच्या
दोन बाजूंना या दोन देवतांना पाहताना
बौद्धिक विकसन कशासाठी आणि कसे
तर एक कौशल्य
प्राप्तीतून धननिर्मितीची विद्या शिकण्यासाठी
आणि
समृद्ध मनुष्त्वाचे सांस्कृतिक जीवन जगण्याची
विद्या शिकण्यासाठी.
विद्यार्जनाच्या प्रक्रियेत एक जीवन ज्ञानाची दिशा
आहे आणि एक आत्मज्ञानाची दिशा आहे.
विद्याञ्चाविद्याञ्च यस्तद्वेदोभयं सह।
अविद्यया मृत्युं तीर्त्वा
विद्ययाऽमृतमश्नुते ॥
असे
बौध्दिक विकासानातून जीवनज्ञान आणि आत्मज्ञान मिळावयाचे असेल
तर
श्री कार्यसिद्धी भक्त आञ्जनेय अर्थात हनुमंताची याची उपासना करायला हवी
जो कार्यसिद्धीसाठी
आवश्यक अपार शक्ती, निष्ठा, आणि भक्तीचे प्रतीक आहेत.
ज्याच्या पूजनाने कार्यसिद्धीतील अडथळे दूर करण्यासाठी ताकत , मनोबल आणि धैर्य मिळते.
अशा
ज्ञान, कर्म , भक्ती मार्गाने निष्ठेने केलेल्या कार्यात निष्काम यश
प्राप्तीसाठीच्या प्रयत्नांसाठी
भगवान
योगेश्वर गोपालकृष्ण हे आराध्य आहेत.
आज लक्ष्मी
पूजनानिमित्त
श्री विद्यालक्ष्मी, श्री विद्यावल्लभ महागणपती,
श्री सरस्वती,
श्री कार्यसिद्धी आञ्जनेय, श्री
गोपालकृष्ण
या पंचायतनाचे स्मरण करूया.
Chhyan
ReplyDeleteVery appropriate! The essential duties of trimurti Brahma Vishnu Mahesh need 3 qualities of 7 forms of Saraswati, 8 forms of Lakshmi and 9 forms of Shakti.
ReplyDeleteमाहितीपूर्ण लेख
ReplyDeleteउत्तम माहिती.
ReplyDeleteअन्य माहिती होती पण त्या महाविद्यालयात हे पंचायतन आहे हे विशेष वाटले...
ReplyDeleteखूप वेगळी माहिती तुमच्या या लेखामुळे कळाली
ReplyDeleteखूप वेगळी माहिती तुमच्या या लेखा मुळे कळाली
ReplyDelete