Shri Vidyalakshmi Since childhood, I've often heard and read of Lakshmi as the goddess of wealth and Saraswati as the goddess of knowledge ..... It is said that Saraswati and Lakshmi rarely dwell together !.... where Saraswati resides, Lakshmi is seldom present!! A few days ago, I stayed at the guest house of Dwarka Doss Govardhan Doss Vaishnav College in Chennai. During a morning walk around the campus, I came across a Panchayatana with deities: 'Shri Vidyalakshmi , Shri Vidyavallabh Mahaganapati , Shri Saraswati , Shri Karyasiddhi Bhakta Anjaneya , and Shri Gopalakrishna .' The presence of temples, morning prayers, and scheduled worship created a truly unique experience on campus. Among these deities, one name stood out— 'Shri Vidyalakshmi .' Though I was familiar with forms like Dhanalakshmi, Gajalakshmi, Shridevi, and Bhudevi, 'Shri Vidyalakshmi' was new to me. After gathering some information and reflecting, the significance of this Panchay
श्री विद्यालक्ष्मी लहानपणापासून अनेकदा ऐकत ; वाचत आलो आहे , लक्ष्मी ही धनाची देवता आणि सरस्वती ही विद्येची देवता ! सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाहीत !! ......... जेथे सरस्वती असते तेथे लक्ष्मीचा निवास क्वचितच असतो !!! .......... काही दिवसांपूर्वी चेन्नईच्या द्वारकादास गोवर्धनदास वैष्णव कॉलेजमध्ये अतिथी निवासात मुक्कामी होतो. सकाळी महाविद्यालाच्या आवारात फिरायला गेलो असताना एक पंचायतन : ‘ श्री विद्यालक्ष्मी , श्री विद्यावल्लभ महागणपती , श्री सरस्वती , श्री कार्यसिद्धी भक्त आञ्जनेय , श्री गोपालकृष्ण’ दिसले. कॉलेजच्या आवारात देवळे, सकाळी पूजा , ठरलेल्या वेळी प्रार्थना हे विशेषच होते. या पंचायतनात एका देवीचे नाव विशेष होते; कदाचित पहिल्यांदाच वाचत होतो ‘ श्री विद्यालक्ष्मी’ . देवीची धनलक्ष्मी , गजलक्ष्मी , श्रीदेवी , भूदेवी आदी रूपे माहिती होती. पण श्री विद्यालक्ष्मी’ नवीनच होते. थोडी माहिती मिळवल्यावर, विचार केल्यावर या नवीन पंचायतनाचा अर्थ उलगडत गेला. भारतीय परंपरेत ऋग्वेद एक मंत्र आहे " एकम सद विप्रा बहुधा वदन्ति " या मंत्राचा अर्थ आहे: सत्य एक