Skip to main content

Posts

Showing posts from 2022

संपादकीय : ई-प्रशिक्षक अंक नोव्हेंबर २०२२

संपादकीय : ई-प्रशिक्षक अंक नोव्हेंबर २०२२ सस्नेह नमस्कार , गेला महिनाभर ' पाठयपुस्तकातील कोरी पाने ' हा शिक्षण विश्वात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला मुद्दा राहिला. अनेकांनी या विषयावर आपली मते नोंदवली. ' पुस्तकाचे ओझे ' ते ' पाठ्यपुस्तकाच्या वाढीव पानांच्या खर्चाची तरतूद ' असे अनेक मुद्दे उपस्थित केले गेले. शासनाने यावर शिक्षकांकडून सूचना देखील मागवल्या. खरा प्रश्न या कल्पनेच्या स्वागतार्हतेचा वा उपयुक्ततेबरोबर ही कल्पना स्वीकारण्यासाठी राबवण्याच्या यंत्रणेचा , कार्यवाहीच्या रचनांचा , प्रशिक्षणाचा आणि कार्यवाहीचे अनुसंधान करण्याचा आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी शिक्षणात नवीन प्रयोग करणाऱ्या शिक्षकांच्या एका सादरीकरणात मी ' पाठयपुस्तकातील कोरी पाने ' हा नवोपक्रम पहिल्यांदा ऐकला. एका शिक्षकांनी तो विषय शिक्षकांसाठी राबवला होता तर दुसऱ्यांनी तो विद्यार्थ्यांबरोबर वर्गासाठी राबवला होता. शब्दार्थ , पूरक उदाहरणे [शिक्षक पुस्तकातच   लिहितात. या निरीक्षणावर आधारित अध्यापनासाठीचे संदर्भ शिक्षकांनी पाठ्यपुस्तकात व्यवस्थित नोंदवावेत ; त्यात वेळोवेळी भर घाल

प्रेरणा

  हिंडलगा जेलमधील कारावास आणि आप्पासाहेब पटवर्धनांचा सहवास : जेलमध्ये समध्येयी मंडळी एकत्र होती. याळगींचा गट कधी पोवाडे , कधी गाणी-पदावली म्हणून सर्वांची करमणूक करत असे. जेलमध्ये सभा संमेलने चालत , नाटके बसविली जात , कानडी , इंग्रजीचे क्लासेसही चालत. जेलमध्ये सदाशिवराव व मित्रमंडळींनी गांधी टोपी हे नाटक बसविले होते. हुबळीच्या दीक्षित गुरुजींची आध्यात्मिक प्रवचने चालत. तसेच सदुभाऊ जेलच्या पदार्थांना रुचकर कसे करता येईल याबाबत मनोवेधक चर्चाही करत असत. खाण्या-पिण्यात , वागण्यात- विचारात समानता असल्यामुळे जेलचे आयुष्य सुसह्य झाले. प्रेरणा (१) सन १९४४ सालचा फेब्रुवारी महिना असावा. वेंगुर्ला टपाल लुटीच्या खटल्यातून निर्दोष सुटल्याबरोबर सदाशिवरावांना स्थानबद्ध केले गेले व हिंडलगा जेलमध्ये पाठविले गेले. तेथील एका मोठ्या बराकीत शंभर लोकांमध्ये सदाशिवराव एक होते. स्थानबद्ध असल्यामुळे काम काहीच नव्हते. सूत कातणे , थोडे वाचन व चर्चा हाच दिवसाचा कार्यक्रम. दोन वेळ २-२ भाकऱ्या , कधी डाळ तर कधी पाल्याची पातळ भाजी असा खाना मिळे. मग हा पाला कधी शेवग्याचा तर कधी पोपईचाही असे. रविवारी थोडा कांदा व