असती का ऐसे कुणी
गुरूपौर्णिमेच्या दिवशी सकाळी
व्हॉट्सअपवर संदेश यायला सुरुवात झाली. त्यातील काही संदेश गुरूची महती सांगणारे
होते, काही गुरूवंदना
करणारे होते तर काही शुभेच्छा संदेश होते.
यातील शुभेच्छा संदेशांना काय उत्तर
द्यायचे खरंतर प्रश्नच पडतो.
कोणी कोणाला शुभेच्छा
द्यायच्या आणि का द्यायच्या ?
प्रत्येक विशेष
दिनाला फक्त शुभेच्छाच द्याव्यात?
की आपल्याला
विशेषदिनाचा संदेश फक्त शुभेच्छाच देऊन व्यक्त करता येतो !!
असे अनेक प्रश्न मनात घेऊन त्यादिवशी
प्रबोधिनीत आलो. आल्यावर थोड्या वेळाने अग्रणी विद्यार्थी ( इ १० वीतील विद्यार्थी
नेते ) भेटायला आले. त्यांनी सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्गात
गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम योजला होत. त्यासाठी पाहुणा वक्ता म्हणून निमंत्रित
केले.
दुपारी सकाळी पडलेले प्रश्न मनात घेऊनच कार्यक्रमात गेलो.
प्रबोधिनीत प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात पद्याने (गीताने) होते.
गुरूपौर्णिमेच्या कार्यक्रमाची सुरुवात ‘असती का ऐसे कुणी’ या गीताने झाली. या गीताच्या ध्रुवपदात परत परत
एक प्रश्न विचारला आहे
असती का ऐसे कुणी ?
असती का ऐसे कुणी ?
कार्यक्रमाची प्रस्तावना सुरू
असतानाच सकाळच्या प्रश्नांची उत्तरे मिळायला सुरुवात झाली !
खरंतर गुरूपौर्णिमेच्या दिवशी
शिष्याने स्वतःच स्वतःला प्रश्न करायचा आहे ;
असती का ऐसे कुणी ?
जर हा प्रश्न मनात आला तरच
शिकण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता निर्माण होईल.
जर हा प्रश्न मनात आला तरच
ज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक आणि योग्य मार्गदर्शक शोधण्याच्या
प्रक्रियेला सुरुवात होईल.
जर हा प्रश्न मनात आला तरच
शिकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल.
हे काय आहे, ते काय आहे,..
.. याबद्दलची माहिती सांगू
शकेल असे कोणी असतील का ?
.. याचा अर्थ सांगू शकतील असे
कोणी असतील का ?
.. याचा अर्थ कसा शोधायचा हे सांगू शकतील असे कोणी असतील का ?
हे कुठे आहे, ते
कुठे आहे,
.. ते दाखवू शकतील असे कोणी असतील का ?
हे कसे करायचे, ते कसे करायचे,
.. ते करून दाखवू शकतील असे कोणी असतील का ?
.. ते शिकवू शकतील असे कोणी असतील का ?
हे कशामुळे आहे ते कशामुळे आहे, ..
.. या मागचे सूत्र; .. यामागचे दडलेले तत्त्व सापडले आहे असे कोणी असतील का ?
हे काय आहे, ते काय आहे,
.. त्याचा वेगळा अर्थ शोधण्यासाठी प्रयत्न करणारे;
.. त्याचा वेगळा अर्थ शोधला आहे असे कोणी असतील का ?
.. सापडलेल्या अर्थाचा जगण्यासाठी वापर कसा करायचा हे जमले आहे असे
कोणी असतील का ?
.. त्याचा जगण्यासाठी वापर कसा करायचा हे शिकवू शकतील असे कोणी असतील
का ?
हे काय आहे, ते काय आहे,
.. त्याप्रमाणे जीवन जगणारे कोणी असतील का ?
.. आणि त्याप्रमाणे जीवन कसे जगायचे याचा दृष्टीकोन देणारे कोणी असतील का ?
हे काय आहे,ते काय आहे,
.. ते सांगणारा कुणी भेटला नाही तर परतपरत प्रयत्न करून
.. तुलाच त्याचा शोधायचे आहे
याची जाणीव करून देणारे कोणी असतील का ?
हे काय आहे, ते काय आहे,
हे कुठे आहे, ते
कुठे आहे,
हे का आहे, ते का आहे,
हे कशामुळे आहे, ते कशामुळे आहे,
हे कसे करायचे, ते कसे करायचे,
याची जाणीव करून देणारा दुसरातिसरा कोणी नसून
तो मीच, मीच आहे !!
गुरूपौर्णिमेच्या दिवशी शिष्याने स्वतःच स्वतःला प्रश्न करायचा आहे
असती का ऐसे कुणी ?
भारतीय शिक्षण परंपरेत शिक्षण हे केंद्रस्थानी असून
विद्यार्थी हे ज्ञान परंपरेचे पूर्वरूप तर आचार्य उत्तररूप
मानले आहे.
पूर्वरूपाला उत्तररूपात स्वतःला पूर्णपणे विकसित करायचे असेल, प्रकट करायचे असेल
तर गुरूपौर्णिमेच्या दिवशी स्वतःच स्वतःला असती का ऐसे कुणी ?हा प्रश्न विचारला
तर ती गुरूचा शोध घेण्याची अर्थात ज्ञानपरंपरेचा पाईक होण्याची सुरुवात असेल.
असा गुरु शोधता आला,
त्याच्याकडून ज्ञान मिळवता आले,
ते ज्ञान वापरण्याचे शहाणपण गुरूच्या सानिध्यात स्वतःमध्ये विकसित करता आले
तर आजच्या शिक्षक दिनी शिक्षकांना फक्त शुभेच्छा न देता, शिक्षकांचे फक्त अभिनंदन न करता त्यांनी आपल्याला या ज्ञानपरंपरेचे पाईक बनवले,
यासाठी शिक्षकांबद्दल कृतज्ञ राहूया ! कृतज्ञता व्यक्त करूया !!
प्रशांत दिवेकर, ज्ञान प्रबोधिनी, पुणे
गुरुपौर्णिमा अर्थात ज्ञानाच्या परंपरांचे पाईक होण्याचा दिवस
( वरील लेख वाचण्यासाठी क्लिक करा )
छान.
ReplyDelete👍🏻🙏🏻
ReplyDeleteसमर्पक🙏
ReplyDeleteसमर्पक उद्बोधन
ReplyDeleteचिंतनशील उद् बोधन
ReplyDeleteशिक्षक, विद्यार्थी तथा संस्था चालक यांच्या साठी विचार प्रवर्तक लेख.
ReplyDeleteशिक्षण प्रक्रियेचा कृतिशील आयाम दाखवणारा लेख.
ReplyDeleteछान मांडणी.
सर, नेहमीच विचारप्रवर्तक लेख लिहिता. आत्मपरीक्षण करण्यास उद्युक्त करणारे लेख. धन्यवाद
ReplyDelete'असती का ऐसे कुणी ' असा शोध घेता घेता आपण स्वतः कसे असू चा मार्ग सापडत जाईल
ReplyDeleteखूप छान लेख
ReplyDeleteअध्यापक म्हणून घडताना आपले लेख नेहमीच आत्मपरीक्षण करावयास लावतात. हा लेख सुद्धा असा स्वतःचा शोध घ्यायला लावणारा आहे.
ReplyDeleteअप्रतिम लेख 👌👌
ReplyDelete