संस्कृतीच्या प्राणधारा : १ दोन दिवसांपूर्वी त्रिपुरी पौर्णिमेच्या आसपास अनके घरांमध्ये तुळशीचे लग्न लावले जात होते. तुळशीचे लग्न बघताना काही महिन्यांपूर्वी एका प्रशिक्षणासाठी गोव्याला फोंडा परिसरात झालेला प्रवास आठवला. कळव्याला शांतादुर्गा देवस्थानाच्या जवळ मुक्कामी होतो. गेली अनेक वर्षे दिवाळीच्या आधी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेच्या अभ्यासवर्गाच्या निमित्ताने दिवाळीच्या आधी फोंड्यात जाणे होते. दिवसभर प्रशिक्षण सत्र झाल्यावर संध्याकाळी मंदिरांना भेटी , ज्या मंदिरात परवानगी असेल तेथील पुष्करणीत पोहणे हा ठरलेला कार्यक्रम. संध्याकाळी गावात फिरत असताना अनेक घरांसमोर बांधलेली आकर्षक तुळशी वृंदावने पाहायला मिळाली. सुंदर घडवलेली वृंदावने हे गोव्याचे एक वैशिष्ट्य आहे. ही वृंदावने पाहत असताना काही वर्षांपूर्वी पणजीत पाहिलेल्या एका संग्रहालयाची आठवण झाली. गोव्यातील आकर्षक तुळशी वृंदावनांचा व त्यांच्या छायाचित्रांचा संग्रह तेथे होता. संग्रहालयात दोन प्रकारची वृंदावने होती ; एकात तुळस लावली होती तर दुसऱ्या वृंदावनात क्रॉस लावला होता. गोव्यात हिंदू आणि इसाई दोन्ही ...
'अभ्यास देशस्थितीचा समतोल चलो' ज्ञान प्रबोधिनीच्या कामाच्या निमित्ताने झालेल्या प्रवासात शिक्षण विश्वाचे झालेले दर्शन व त्या निमित्ताने झालेला विचार मांडण्यासाठीचे लेखन