Skip to main content

Posts

Showing posts from 2020

तंत्रस्नेही अध्यापकत्व : लेख 8

  तंत्रस्नेही अध्यापकत्व  लेख 8 :  डिजिटल स्वाध्याय-प्रवचन ज्ञान मिळवण्याच्या दोन पद्धती भारतीय परंपरेत महत्त्वाच्या मानल्या आहेत :   ‘ स्वाध्याय आणि प्रवचन ’   अर्थात शिकणे आणि शिकवणे या दोन पद्धतींनी ज्ञानार्जन करता येते. स्वाध्याय  : स्वाध्यायाचे दोन अर्थ आहेत. स्वतः अध्ययनासाठी प्रवृत्त होऊन अध्ययन करणे आणि स्वतःचा अभ्यास करणे अर्थात स्वतःबद्दल जाणून घेणे.           स्वयंअध्ययनात माझ्या (अर्थात शिकणाऱ्याच्या) इच्छेनुसार , मी ठरवले आहे म्हणून , मला प्रश्न पडला म्हणून , मला सुचले म्हणून विद्यार्थी अध्ययनाला प्रवृत्त होणे अपेक्षित आहे. कोणीतरी सांगितले , बोर्डाचा नियम आहे म्हणून , शाळेने सक्ती केली म्हणून अभ्यास करणे अपेक्षित नाही. अर्थातच त्यामुळे शिकण्याच्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी शिकणारा असतो तर अध्यापक मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतो.   स्वाध्यायाच्या दुसऱ्या अर्थात स्वतःबद्दलचे चिंतन अपेक्षित आहे , अर्थात मी हे का शिकणार आहे , कसे शिकणार आहे , मी हे कसे शिकलो , याचा मी कसा उपयोग करणार , यातून माझ्या...

विज्ञानाची भाषा

विज्ञानाची भाषा चिंचेला इंग्रजीमध्ये टॅमरिंड ( Tamarind) म्हणतात. टॅमरिंड हा शब्द इंग्रजीमध्ये कसा आला हे समजण्यासाठी इतिहासाची थोडी ओळख असावी लागेल. आपल्याला माहीत आहे की भारताचा खुश्कीच्या मार्गाने अरबस्तानातील देशांशी व तेथून पुढे   युरोपमधील देशांशी व्यापार चालू होता. पुढे कॉन्स्टंटिनोपल या शहरावरील युरोपचे नियंत्रण कमी झाल्यावर हा व्यापार टिकविण्यासाठी वेगवेगळ्या सागरी मार्गांचा शोध युरोपमधील देशांनी घेतला. तात्पर्य भारतातील वस्तू अरबस्तानामधून युरोपमध्ये पोहोचत. भारतातून चिंच अशीच अरबस्तानात पोहोचली व तेथून युरोपात. अरबी भाषेत खजूराला तमार ( tamar) म्हणतात. चिंच आणि खजुरामध्ये तपकिरी रंग , कोळ काढता येणे , एक बी असणे असे साम्य आहे. त्यामुळे चिंचेला अरबीमध्ये तमार - हिंद ( Tamar-hind) म्हणजेच भारतीय (हिंदी) खजूर ( Date of India) म्हटले जाते. याचाच भ्रंश होत पुढे टॅमरिंड ( tamarind) हा शब्द तयार झाला. मार्कोपोलो टॅमरिंडचे स्पेलिंग ( tamarandi) असे करतो. शब्दाचा उगम शोधणे खरेच मजेचे असते. मराठीमध्ये ' ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये ' अशी म्हण आहे. वरील दोन्हीपैकी नदीचे...

भारताचे संविधान : संविधान दिनानिमित्त विद्यार्थांसाठी कार्यपत्रिका

  भारताचे संविधान  संविधान दिनानिमित्त विद्यार्थांसाठी कार्यपत्रिका  आपण शाळेत प्रार्थनेच्या वेळी नियमितपणे राष्ट्रगीत , प्रतिज्ञा , वंदेमातरम आणि   भारताच्या संविधानाची उद्देशिका याचे पठण करतो.   या कार्यपत्रिकेत आपण भारताच्या संविधाना च्या उद्देशिकेची  माहिती करून घेताना  हे संविधान कसे तयार झाले , कोणी तयार केले , संविधान  निर्मितीची प्रक्रिया कशी होती याचा परिचय करून घेणार आहोत.  २६ नोव्हेंबर आपण भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करतो. संविधान दिवसापर्यंत खाली दिलेल्या कृती करत भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचा  परिचय करून घेवू या . कृती. १ :   राष्ट्रगीत , प्रतिज्ञा , वंदेमातरम आणि   भारताच्या संविधानाची उद्देशिका  यापैकी एक ज्याचे रोज  शाळेत रोज ज्याचे पठाण केले जाते  ते पुस्तकात न बघता वहीत लेखन करा. कृती २ :   भारतीय स्वातंत्र्य आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना याचे नाते उलगडून सांगणारी ‘ इंडिया : द स्पिरीट ऑफ फ्रिडम’ छोट्या फिल्मची लिंक खाली देत आहे. फिल्म बघून झाल्यावर आवडली तर आपल्या एका मित्रा...