भारताचे संविधान
संविधान दिनानिमित्त विद्यार्थांसाठी कार्यपत्रिका
आपण शाळेत प्रार्थनेच्या वेळी नियमितपणे राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, वंदेमातरम आणि भारताच्या संविधानाची उद्देशिका याचे पठण करतो. या कार्यपत्रिकेत आपण भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेची माहिती करून घेताना हे संविधान कसे तयार झाले, कोणी तयार केले, संविधान निर्मितीची प्रक्रिया कशी होती याचा परिचय करून घेणार आहोत.
२६ नोव्हेंबर आपण भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करतो. संविधान दिवसापर्यंत खाली दिलेल्या कृती करत भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचा परिचय करून घेवू या .
कृती. १ :
राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, वंदेमातरम आणि भारताच्या संविधानाची उद्देशिका यापैकी एक ज्याचे रोज शाळेत रोज ज्याचे पठाण केले जाते ते पुस्तकात न बघता वहीत लेखन करा.
कृती २ :
भारतीय स्वातंत्र्य आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना याचे नाते उलगडून सांगणारी ‘ इंडिया : द स्पिरीट ऑफ फ्रिडम’ छोट्या फिल्मची लिंक खाली देत आहे. फिल्म बघून झाल्यावर आवडली तर आपल्या एका मित्राला शेअर करा आणि त्याच्या बरोबर त्या फिल्ममधील काय आवडले, काय समजले या बद्दल मित्राशी व्हॉट्स अॅप, मेसेंजर वर गप्पा मारा आणि तो संवाद शिक्षकांना शेअर करा.
भारताच्या संविधानाची मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतील उद्देशिका सोबत दिली आहे. त्याचे वाचन करून खाली दिलेला तक्ता पूर्ण करा. ( पहिल्या तीन ओळीत नमुना शब्द दिले आहेत. त्याला समांतर शब्द शोधायचे आहेत. शेवटच्या तीन ओळींसाठी शब्द निवडायचे आहेत )
मराठी |
हिंदी |
इंग्रजी |
लोकशाही |
लोकतंत्रात्मक |
Democratic |
सार्वभौम |
|
|
|
स्वतंत्रता |
|
|
|
Equality |
|
|
|
|
|
|
|
|
|
कृती ४ : खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
- खाली दिलेल्या रकान्यांमध्ये स्वातंत्र्य या शब्दाशी निगडीत असणारे शब्द भरून
तक्ता पूर्ण करा.
3. ही उद्देशिका कोणी कोणाला अर्पित केली आहे ?
4. उद्देशिकेमधील ‘व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता' या दोन घटकांचा कोणत्याही एका मूल्यासंदर्भात अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा.
कृती ५
राज्यसभेच्या यु-ट्यूब चॅनेलवर २०१४ साली राज्यसभेच्या दूरदर्शन चॅनेलवर प्रसारित झालेल्या दहा भागांची धारावाही उपलब्ध आहे. नागरिक शास्त्रातील अनेक संकल्पना, भारतीय घटनेतील अनेक तरतुदी कशा निश्चित केल्या हे दाखवण्यासाठी हे भाग उपयोगी आहेत. ‘संविधान : मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टीट्युशन’ या मालिकेचे दिग्दर्शन शाम बेनेगल यांनी केले आहे. हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये ही मालिका उपलब्ध आहे. त्यातील दहावा भाग बघताना खालील मुद्यांच्या आधारे नोंदी करा. -
- उद्देशिकेवरील चर्चेत कोणत्या ऐतिहासिक नेत्यांनी सहभाग घेतला?
- उद्देशिकेमध्ये कोणकोणते बदल सुचवण्यात आले?
- उद्देशिकेमधील कोणकोणत्या शब्दांवर चर्चा झाली? का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भाषणाचे सार तुमच्या शब्दात लिहा.
भाग |
शीर्षक |
1 |
|
2 |
|
3 |
Independent
India: Righting Fundamental Wrongs with Fundamental Rights |
4 |
|
5 |
|
6 |
|
7 |
|
8 |
|
9 |
|
10 |
शिक्षकांसाठी : आठवीच्या पुस्तकाचे शीर्षक ‘इतिहास व नागरिकशास्त्र’ आहे आणि दहावीच्या पुस्तकाचे शीर्षक ‘इतिहास व राज्यशास्त्र’ असे का आहे?
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
खूप छान प्रकारे विद्यार्थ्यांना माहिती मिळेल. वाचन, चर्चा घडून येईल.
ReplyDeleteVery interesting
ReplyDeleteVery apt precisely explained,👍👌
ReplyDeleteसर,खूपच स्तुत्य उपक्रम.
ReplyDeleteA well thought exercise,Sir!
ReplyDeleteThank you Sir.. very thoughtful activities for children and a thought provoking question for teachers.
ReplyDeleteप्रशांत सर, खूपच उपयुक्त कृतिपत्रक
ReplyDeleteछान उपक्रम
ReplyDeleteखऱ्या अर्थाने विचार प्रक्रियेला संधी अन् विचार पोहचवण्याचा मार्ग.
ReplyDeleteसर, फारच उपयुक्त आणि परिणामकारक
ReplyDeleteGood indeed. Pranam
ReplyDeleteGood very nice 👍
ReplyDelete