Skip to main content

भारताचे संविधान : संविधान दिनानिमित्त विद्यार्थांसाठी कार्यपत्रिका

 भारताचे संविधान 

संविधान दिनानिमित्त विद्यार्थांसाठी कार्यपत्रिका 

आपण शाळेत प्रार्थनेच्या वेळी नियमितपणे राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, वंदेमातरम आणि  भारताच्या संविधानाची उद्देशिका याचे पठण करतो. या कार्यपत्रिकेत आपण भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेची  माहिती करून घेताना  हे संविधान कसे तयार झाले, कोणी तयार केले, संविधान  निर्मितीची प्रक्रिया कशी होती याचा परिचय करून घेणार आहोत. 

२६ नोव्हेंबर आपण भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करतो. संविधान दिवसापर्यंत खाली दिलेल्या कृती करत भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचा  परिचय करून घेवू या .

कृती. १ : 

राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, वंदेमातरम आणि  भारताच्या संविधानाची उद्देशिका यापैकी एक ज्याचे रोज  शाळेत रोज ज्याचे पठाण केले जाते  ते पुस्तकात न बघता वहीत लेखन करा.

कृती २ : 

भारतीय स्वातंत्र्य आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना याचे नाते उलगडून सांगणारी ‘ इंडिया : द स्पिरीट ऑफ फ्रिडम’ छोट्या फिल्मची लिंक खाली देत आहे. फिल्म बघून झाल्यावर आवडली तर आपल्या एका मित्राला शेअर करा आणि त्याच्या बरोबर  त्या फिल्ममधील  काय आवडले, काय समजले या बद्दल मित्राशी  व्हॉट्स अॅप, मेसेंजर वर गप्पा मारा आणि तो संवाद शिक्षकांना शेअर करा.

India : The Spirit of Freedom  


 कृती ३ : 

भारताच्या संविधानाची  मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतील उद्देशिका सोबत दिली आहे. त्याचे वाचन करून खाली दिलेला तक्ता पूर्ण करा. ( पहिल्या तीन ओळीत नमुना शब्द दिले आहेत. त्याला समांतर शब्द शोधायचे आहेत. शेवटच्या तीन ओळींसाठी शब्द निवडायचे आहेत )




            

मराठी

हिंदी

इंग्रजी

लोकशाही

लोकतंत्रात्मक

Democratic

सार्वभौम

 

 

 

स्वतंत्रता

 

 

 

Equality

 

 

 

 

 

 

 

 

 

कृती ४ : खालील प्रश्नांची उत्तरे लिहा

  1.  खाली दिलेल्या रकान्यांमध्ये स्वातंत्र्य या शब्दाशी निगडीत असणारे शब्द भरून 

                  तक्ता पूर्ण  करा.


       
          
        2. खालील चित्र भारताच्या संविधानाच्या कोणत्या मूल्याशी निगडीत आहे? या मूल्याबद्दल                  उद्देशिकेमध्ये काय म्हटले आहे?

                              


                3. ही उद्देशिका कोणी कोणाला अर्पित केली आहे ?

                              4.  उद्देशिकेमधील व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता' या दोन घटकांचा कोणत्याही एका                  मूल्यासंदर्भात अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा.  

कृती ५

            राज्यसभेच्या यु-ट्यूब चॅनेलवर २०१४ साली राज्यसभेच्या दूरदर्शन  चॅनेलवर प्रसारित झालेल्या दहा भागांची धारावाही उपलब्ध आहे.  नागरिक शास्त्रातील अनेक संकल्पना, भारतीय घटनेतील अनेक तरतुदी कशा निश्चित केल्या हे दाखवण्यासाठी हे भाग उपयोगी आहेत. संविधान : मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टीट्युशन या मालिकेचे दिग्दर्शन शाम बेनेगल यांनी केले आहे. हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये ही मालिका उपलब्ध आहे. त्यातील दहावा भाग बघताना खालील मुद्यांच्या आधारे नोंदी करा. -  

संविधान : भाग 10

  1.     उद्देशिकेवरील चर्चेत कोणत्या ऐतिहासिक नेत्यांनी सहभाग घेतला?
  2. उद्देशिकेमध्ये कोणकोणते बदल सुचवण्यात आले?
  3. उद्देशिकेमधील कोणकोणत्या शब्दांवर चर्चा झाली? का?
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भाषणाचे सार तुमच्या शब्दात लिहा.

भाग

शीर्षक

1

The First Step: Cabinet Mission To Objectives Resolution

2

Independence: A Divided Legacy

3

Independent India: Righting Fundamental Wrongs with Fundamental Rights 

4

People's Rights, Principles of Governance and Duties

5

Strengthening The Weak: Minority, Women and Backward Rights

6

Whose Land Is It?: Land Reforms And Acquisition

7

Link Language: Hindi Or Hindustani?

8

Federalism: Linking The States And The Centre

9

Three Pillars: Executive, Legislature, Judiciary

10

From Preamble to the Final Draft and beyond



शिक्षकांसाठी : आठवीच्या पुस्तकाचे शीर्षक इतिहास व नागरिकशास्त्र आहे आणि दहावीच्या पुस्तकाचे शीर्षक इतिहास व राज्यशास्त्र असे का आहे?  

                 प्रशांत दिवेकर 

            ज्ञान प्रबोधिनी, पुणे 










Comments

  1. खूप छान प्रकारे विद्यार्थ्यांना माहिती मिळेल. वाचन, चर्चा घडून येईल.

    ReplyDelete
  2. Very apt precisely explained,👍👌

    ReplyDelete
  3. सर,खूपच स्तुत्य उपक्रम.

    ReplyDelete
  4. Thank you Sir.. very thoughtful activities for children and a thought provoking question for teachers.

    ReplyDelete
  5. प्रशांत सर, खूपच उपयुक्त कृतिपत्रक

    ReplyDelete
  6. खऱ्या अर्थाने विचार प्रक्रियेला संधी अन् विचार पोहचवण्याचा मार्ग.

    ReplyDelete
  7. सर, फारच उपयुक्त आणि परिणामकारक

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बौद्धिक विकसनासाठी वाचन

  बौद्धिक विकसनासाठी वाचन ‘वाचन कर’ असे सुचवल्यावर काहीजणांना आनंद होतो तर अनेकजणांच्या कपाळावर आठ्या उमटतात. का वाचायचे ! कसे वाचायचे ! कशासाठी वाचायचे ! वाचताना काय करायचे ! वाचून झाल्यावर काय करायचे ! वाचून काय होणारें !!     असे अनेक प्रश्न , प्रतिक्रिया अनेकांच्या मनात डोकावत असतात. त्याची उत्तरे शोधण्याचा जो प्रयत्न करतो त्याला ‘वाचन कर’ सुचवल्यावर आनंद होण्याची शक्यता जास्त असते. वाचकाचा   पहिला सामना होतो तो वाचनाच्या तंत्राशी. अक्षरे, जोडाक्षरे , विरामचिन्हे अशा सांकेतिक लिपीतील चिन्हांशी मैत्री करत वाचक अर्थापर्यंत म्हणजेच शब्दापर्यंत येऊन   पोचतो आणि इथे खरे वाचन सुरू होते. अनेक वाचक या सांकेतिक चित्रांच्या जंजाळातच गुरफटतात. चिन्हांशी मैत्री झाली की अर्थाच्या खोलात डुबी मारण्यासाठी वाचक,   शब्द आणि शब्दांच्या अर्थछटा,   समानार्थी, विरुद्धअर्थी शब्द, वाक्प्रचार, वाक्य अशा टप्प्यात प्रवेश करतो. वाक्याला समजून घेत परिच्छेद, निबंध अशा शब्दसमूहात वाचक प्रवेश करतो. शब्दाच्या, वाक्याच्या अर्थछटा समजून घेत पूर्वज्ञानाशी सांगड घालत आपल्...

From Pages to Naturalists' Insights

                                            From Pages to Naturalists' Insights                                               Learning while Reading:                                                    Cry of the Kalahari I am a voracious reader, always eager to explore different genres of literature across various domains of knowledge. As a Maharashtrian and initially a Marathi medium student, I preferred reading in Marathi but gradually transitioned to reading books in English. Before pursuing natural science for my graduation, I was introduced to the lives and works of naturalists through books like Ashi Manasa Ashi Sahas, Chitre An...

बोलतो मराठी !....वाचतो मराठी !!

  बोलतो मराठी ! ....वाचतो मराठी  !! या महिन्यात तीन वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचनात आली. त्यातील ग्रंथालयात आलेले एक नवीन पुस्तक   ‘मी कधीही माफी मागणार नाही !’ एका व्यक्तीला झालेले ध्येय दर्शन आणि त्या ध्येय दर्शनातून कळलेला जीवन उद्देश साध्य करण्यासाठी , आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर स्वतः समोर ठेवलेली उद्दिष्टे ... मग ती उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी मिळवलेल्या शारीरिक , मानसिक , बौद्धिक क्षमता आणि प्रयत्नांची पराकाष्ठा ! प्रयत्नांच्या यशापयशातून धडपडत पण समाधानाने केलेला जीवन प्रवास !!..            ‘ मी कधीही माफी मागणार नाही!’ हे श्री. पांडुरंग खानखोजे यांचे चरित्र वाचत असताना मनात विचार येत होता की , जीवनाच्या पाठशाळेत अशा ‘स्व’ च्या शोधाचा प्रवास काहींनाच पूर्ण करता येतो. जीवनाच्या पाठशाळेत ‘स्व’च्या शोधाचा मार्ग ज्यांना सापडला त्यांच्या जीवनाचे सार सांगणारी   सूत्रं कोणती ? आणि   कठीण काळात देखील अशा व्यक्तींची इच्छा कशी प्रबळ राहते ?            दुसरे ...