Skip to main content

Posts

Showing posts from 2021

Activity-sheet for students on the occasion of Constitution Day

    Constitution of India Activity-sheet for students on the occasion of Constitution Day   We regularly recite the national anthem, pledge, Vandemataram and the Preamble of the Constitution of India during the school assembly. Through this activity sheet, we will introduce the purpose of the Constitution of India, how was it drafted, who drafted it, how the constitution-drafting process was initiated.           We celebrate 26th November as Indian Constitution Day.   Let us introduce the objectives of the Constitution of India by doing the following activities till Constitution Day. Watch this condensed version of Episode 10 of  Samvidhan :  From Preamble to the Final Draft and beyond    before attempting    activities    https://www.youtube.com/watch?v=ClK7wvh7fso Activity 1:  Write the national anthem, pledge, Vandemataram and  the Preamble of the Constitution of India, which we recite daily in school assembly. Recall the word and write without referring to textbooks.  

पुस्तक परिचय : ‘राष्ट्रघडणीसाठी मनुष्यघडण’

पुस्तक परिचय : ‘राष्ट्रघडणीसाठी मनुष्यघडण’ वाच. गिरीश श्री. बापट, संचालक ज्ञान प्रबोधिनी लिखित ‘राष्ट्रघडणीसाठी मनुष्यघडण’ हे पुस्तक ज्ञान प्रबोधिनीच्या औपचारिक शाळा आणि ज्ञान प्रबोधीनिद्वारा संचालित विविध पूरक शिक्षण विस्तार उपक्रमांचे संचित, त्यामागचा विचार आणि या प्रयोगशील उपक्रमांमधून ज्ञान प्रबोधिनीला सापडलेला शिक्षण विचार आपल्यापर्यंत पोचवते. पुस्तकातील अनेक लेखांमधून हा शिक्षण विचार विकसित होण्याच्या प्रवासाचे दर्शन वाचकाला होते. प्रबोधिनी अंतर्गत आणि अन्य व्यासपीठांवर प्रबोधिनीच्या शैक्षणिक प्रयोगांची मांडणी करण्यासाठी मा. गिरीशरावांनी दिलेली भाषणे व त्यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह ‘राष्ट्रघडणीसाठी मनुष्यघडण’ या पुस्तकात केलेला आहे. मनुष्य घडणीसाठी ज्ञान प्रबोधिनीच्या शैक्षणिक रचना आणि प्रयोगांची मांडणी या पुस्तकातील लेखांमध्ये केलेली आहे. ‘ मनुष्य घडणीसाठी शिक्षण ’ असा विचार करताना भूमिका लेखात लेखकाने शिक्षणाचे तीन आयाम सांगितले आहेत १. आशयाचे शिक्षण, २. प्रक्रियांचे शिक्षण, ३. संदर्भ तयार करण्याचे शिक्षण. ज्ञान प्रबोधिनीच्या या त्रिवेणी शिक्षण पद्धतीच्या गोफामध

ओळख एका गर्दभारण्याची...

ओळख एका गर्दभारण्याची...                        वाई गाव आणि गाढवांची विशेष आठवण आहे. हॉही... हॉही.. करत पळणाऱ्या गाढवाची लाथ खायची का गटारात पडायचे  अशा संभ्रमात अनेकदा रस्त्यात गटाराच्याकडेला अंग चोरून उभे राहावे लागायचे. आमचे घर नदीच्या कडेला होते त्यामुळे नदीतून वाळू काढून, ती चाळून मग गाढवांवर लादून गावात घेवून जाणारे वाळूवाले हे तर खिडकीच्या चौकटीतून दिसणारे रोजचेच दृश्य होते. या सगळ्याची आठवण झाली कारण दोन दिवस संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी, जि. नांदेड याच्या ‘डाँकेश्वर’ केंद्रातील अतिथी गृहात निवासाला होतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्या परिसरात गाढवांचे अभयक्षेत्र म्हणून ‘धर्मा गाढवांचे अभयारण्य ( D harma Donkey Santuary ) ’ उपक्रम राबवला जातो.   आजही गावांमध्ये गाढव  शेतमाल , बांधकाम साहित्य इत्यादींच्या वाहतुकीसाठी उपयोगात असलेला प्रमुख प्राणी आहे.  तरी देखील जगात जवळजवळ सर्वत्र , गाढव हा सर्वात दुर्लक्षित प्राणी आहे. गाढव सर्वात उपयुक्त प्राणी असूनही , त्यांचा मालक पाळीव जनावरांप्रमाणे त्यांचा सांभाळ करत नाहीत.  त्यांचा आहार, त्यांचे आरोग्य यांची योग्य काळजी घेवून त्या