जीवो जीवस्य जीवनम् दिल्ली , आग्रा परिसरात हिवाळ्याच्या दिवसात प्रवास केल्यास भरतपूर अभयारण्य हे नक्की भेट द्यायचे ठिकाण आहे. काही वर्षांपूर्वी उत्तर भारतातील या अभयारण्यात एक दिवस राहिलो होतो. हे अभयारण्य पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. हिवाळ्याच्या दिवसात सुमारे साडेतीनशे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी या अभयारण्यात नोंदवले गेले आहेत. भरतपूर अभयारण्यात एक छोटेसे संग्रहालय देखील आहे. अभयारण्यात येणारे वेगवेगळे पक्षी , त्यांची शरीर रचना व वैशिष्ट्ये , त्यांचे स्थलांतर यासारख्या पक्षी निरीक्षणाच्या अनुषंगाने अनेक माहितीपूर्ण गोष्टी या संग्रहालयात मांडल्या आहेत. या संग्रहालयातील एका दालनात ब्रिटिश कालखंडात भारतीय राजेराजवाडे आणि ब्रिटीश अधिकारी यांनी वाघ-चित्ते यांच्या केलेल्या शिकारींची अनेक छायाचित्रे लावलेली आहेत. यातील एका छायाचित्रात एका मोठ्या पायरीसारख्या दिसणाऱ्या ढिगावर ...
'अभ्यास देशस्थितीचा समतोल चलो' ज्ञान प्रबोधिनीच्या कामाच्या निमित्ताने झालेल्या प्रवासात शिक्षण विश्वाचे झालेले दर्शन व त्या निमित्ताने झालेला विचार मांडण्यासाठीचे लेखन