अन् पारिजातक हसला.. ई प्रशिक्षक ऑगस्ट २०२१ संपादकीय सस्नेह नमस्कार , जुलैअखेर एका अनोख्या पुष्पोत्सवाची बातमी आणि निळाईची छायाचित्र पाहायला मिळाली. दर आठ वर्षांनी बहरणाऱ्या कारवी वनस्पतीच्या पुष्पोत्सवाची बातमी होती. बातमी वाचल्यावर वनस्पती अभ्यासक मंदार दातार यांनी एका कार्यक्रमात वाचन केलेली एक कविता आठवली . तोरणगडच्या चढणीवरली निळी कारवी परवा फुलली अशी बहरली साद जणू अम्बरातली खाली आली निळी कारवी जेव्हा फुलते मधमाशांचा सुकाळ होतो मकरंदाचे कुंभ सांडती बहर एवढा अपार येतो। निळी कारवी फुलता फुलता अधिवासाचे चित्र बदलते उतार ऐसे पुलकित होती निलगिरीही सार्थ वाटते कुठे कुरुंजी कुठे वायटी , माळ कारवी आणि टोपली सह्याद्रीच्या बाहुंवरती एकातून उत्क्रांत जाहली । फुलून येते कारवी जेव्हा वर्ष तिच्या ते मरणाचे जीर्ण जीवांना निरोप देऊन नवबिजांनी रुजण्याचे पुढल्यावर्षी याच ठिकाणी नसेल येथे ही निळाई लाखलाख परी नवस्वप्नांना रुजण्याची असेल घाई। ...
'अभ्यास देशस्थितीचा समतोल चलो' ज्ञान प्रबोधिनीच्या कामाच्या निमित्ताने झालेल्या प्रवासात शिक्षण विश्वाचे झालेले दर्शन व त्या निमित्ताने झालेला विचार मांडण्यासाठीचे लेखन