विज्ञानाची भाषा चिंचेला इंग्रजीमध्ये टॅमरिंड ( Tamarind) म्हणतात. टॅमरिंड हा शब्द इंग्रजीमध्ये कसा आला हे समजण्यासाठी इतिहासाची थोडी ओळख असावी लागेल. आपल्याला माहीत आहे की भारताचा खुश्कीच्या मार्गाने अरबस्तानातील देशांशी व तेथून पुढे युरोपमधील देशांशी व्यापार चालू होता. पुढे कॉन्स्टंटिनोपल या शहरावरील युरोपचे नियंत्रण कमी झाल्यावर हा व्यापार टिकविण्यासाठी वेगवेगळ्या सागरी मार्गांचा शोध युरोपमधील देशांनी घेतला. तात्पर्य भारतातील वस्तू अरबस्तानामधून युरोपमध्ये पोहोचत. भारतातून चिंच अशीच अरबस्तानात पोहोचली व तेथून युरोपात. अरबी भाषेत खजूराला तमार ( tamar) म्हणतात. चिंच आणि खजुरामध्ये तपकिरी रंग , कोळ काढता येणे , एक बी असणे असे साम्य आहे. त्यामुळे चिंचेला अरबीमध्ये तमार - हिंद ( Tamar-hind) म्हणजेच भारतीय (हिंदी) खजूर ( Date of India) म्हटले जाते. याचाच भ्रंश होत पुढे टॅमरिंड ( tamarind) हा शब्द तयार झाला. मार्कोपोलो टॅमरिंडचे स्पेलिंग ( tamarandi) असे करतो. शब्दाचा उगम शोधणे खरेच मजेचे असते. मराठीमध्ये ' ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये ' अशी म्हण आहे. वरील दोन्हीपैकी नदीचे...
'अभ्यास देशस्थितीचा समतोल चलो' ज्ञान प्रबोधिनीच्या कामाच्या निमित्ताने झालेल्या प्रवासात शिक्षण विश्वाचे झालेले दर्शन व त्या निमित्ताने झालेला विचार मांडण्यासाठीचे लेखन