इतिहासातील भूगोल महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला जशी चौथीत शिवाजी महाराजांची ओळख होते , तशीच शिवचरित्राची ओळख खरंतर मलाही झाली. त्याचवर्षी वाईच्या गंगापुरी घाटावर कृष्णामाईच्या उत्सवात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची कथामाला ऐकायला मिळाली. काय ऐकले ते आज आठवत नाही , पण घाटावरील लोकांची गर्दी , एक फळा आणि फळ्याशेजारी पांढऱ्या कपड्यातील दाढीवाल्या माणसाने काहीतरी भारी सांगितलं होतं एवढंच आठवतयं. पुढे पाचवी - सहावीत राजा शिवछत्रपती आणि श्रीमानयोगी ही दोन भारावून टाकणारी पुस्तके हातात पडली. त्या तीन वर्षांत एक प्रश्न मनात घोळत असलेला आठवतो. तो म्हणजे , राजगडावरून प्रतापगडाला जाताना वाटेत शिरवळ , वाई यासारखी आदिलशाही ठाणी असताना आणि वाईत खासा अफजलखान असताना त्याने महाराजांना रस्त्यातच का पकडलं नाही ? कारण राजगडाहून प्रतापगडला जायचे असेल तर नसरापूरला हायवेला लागायचे , मग शिरवळ-खंबाटकी घाट , जोशी विहीर , वाई , पाचगणी , महाबळेश्वर आणि प्रतापगड हा रस्ता पक्का डोक्यात होता. आणखी एखादा वेगळा रस्ता असू शकेल , हे गावीच नव्हते. पुढे कधीतरी नकाश...
'अभ्यास देशस्थितीचा समतोल चलो' ज्ञान प्रबोधिनीच्या कामाच्या निमित्ताने झालेल्या प्रवासात शिक्षण विश्वाचे झालेले दर्शन व त्या निमित्ताने झालेला विचार मांडण्यासाठीचे लेखन