संस्कृतीच्या प्राणधारा : २ तमसो मा ज्योतिर्गमय ! गेल्या रविवारी २१ जानेवारीला सकाळी बहिणभावंडे , मित्रमंडळी असा गोतावळा अर्धशतीच्या शुभेच्छा देण्यासाठी सकाळी घरी एकत्र जमला होता. औक्षण झाल्यानंतर गोडाचा आणि तिखटाचा केक आणि जीवेत् शरद शतम…. चे गायन झाले. लहानपणी वाढदिवसाच्या दिवशी औक्षण आणि मित्रांबरोबर खाणे-गप्पा हा कार्यक्रम असायचा. मित्रांच्या घरी वाढदिवसाला जायचो तेव्हा केक , केकवर लावलेल्या मेणबत्त्या फुंकणे असा वाढदिवस साजरा केला जायचा. आपली पद्धत नाही म्हणून आमच्याकडे केक , केकवर लावलेल्या मेणबत्त्या फुंकणे हे केले जात नव्हते. गेल्या काही वर्षांमध्ये ज्या वाढदिवस समारंभात सहभागी झालो , त्याचे माझे निरीक्षण : अनेक घरांमध्ये औक्षण - केक - संस्कृत / मराठी गीत हा उपचार रूढ होतो आहे. मेणबत्त्या फुंकणे बंद झालं आहे , टाळलं जातं आहे आणि ज्या घरात आपली पद्धत नाही म्हणून केक , केकवर लावलेल्या मेणबत्त्या फुंकणे हे केले जात नव्हते , त्या घरांमध्ये वाढदिवसाचा गोड पदार्थ म्हणून केकने प्रवेश मिळवला आहे. वाढदिवस असो वा लग्न असो वा बढती , काहीतरी वाढ-प्रगती ...
'अभ्यास देशस्थितीचा समतोल चलो' ज्ञान प्रबोधिनीच्या कामाच्या निमित्ताने झालेल्या प्रवासात शिक्षण विश्वाचे झालेले दर्शन व त्या निमित्ताने झालेला विचार मांडण्यासाठीचे लेखन