विश्वकोश परिचय कार्यपत्रक
कार्य : १. मराठी विश्वकोश खंड १ मधील पहिला
शब्द कोणता आहे ?
२. मराठी विश्वकोश खंड १७ मधील पहिला
शब्द व शेवटचा शब्द शोधा .
३. संगणकाबद्दल माहिती मिळवायची असेल
तर मराठी विश्वकोशाचा कोणता खंड पाहावा लागेल ?
४. खैबरखिंड खिंडीबद्दल माहिती मराठी
विश्वकोशाच्या कोणत्या खंडात सापडेल ?
५. ‘सर्कस’ बद्दल माहिती मिळवण्यासाठी सर्कसशिवाय इतर कोणत्या
शब्दांसंबंधी
माहिती
शोधल्यास सर्कसबद्दल पूरक माहिती मिळेल ?
६. मिसिसिपी शब्द विश्वकोशाच्या कोणत्या
खंडात सापडेल ? मिसिसिपी लेखामध्ये कोणत्या प्रमुख शीर्षकाखाली मिसिसिपीबद्दल माहिती
सांगितली आहे ?
७. ‘ऊस’ या बद्दल विश्वकोशात जी माहिती
आहे त्याचे लेखक कोण आहेत ? ही माहिती लिहिण्यासाठी लेखकांनी कोणते संदर्भ वापरले
आहेत ?
८. सातव्या खंडाच्या शेवटी दिलेली
चित्रे पाहा व आवडलेल्या कोणत्याही २ चित्रांची शीर्षके लिहा .
मराठी विश्वकोश
मराठी विश्वकोश
या सर्वविषयसंग्राहक ज्ञानकोशाच्या संपादन व प्रकाशन कार्यासाठी महाराष्ट्र
राज्य
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची स्थापना दि.१.१२.१९८० रोजी करण्यात आली.विश्वकोश
म्हणजे
एन्सायक्लोपीडिया
ब्रिटानिकाच्या धर्तीवर मराठीतील सामान्यातील सामान्य माणसांपर्यंत
ज्ञान
पोहचविण्यासाठी ग्रंथरूपी चळवळ, विश्वातील
सारे शब्द, त्यामागचा
इतिहास, भूगोल, तत्त्वज्ञान, विज्ञान
मराठीतून ज्ञानार्थींना मिळावे हा उद्देश आहे. मराठी
विश्वकोश हे मराठीतील
ज्ञानाचे भांडार. अ ते ज्ञ
पर्यंतच्या विश्वातील
महत्त्वाच्या संज्ञांची मराठीतून ओळख सामान्य माणसाला व्हावी, या हेतूने
हा मराठी एन्सायक्लोपीडिया तयार
केलेला आहे.
तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी या विश्वकोशाचे महत्त्व सांगताना प्रस्तावनेत
लिहितात-
मराठी
विश्वकोशाचे आतापर्यंत १ ते १९ खंड प्रकाशित झाले आहेत. विसावा खंड
परिभाषाकोश आहे.
खंड विभागणी
खंड : २ आतुरनिदान ते एप्स्टाइन, जेकब
खंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान' ते 'किसांगानी'
खंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका
खंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि
खंड : ६ 'चेन, सर एर्न्स्ट बोरिस' ते 'डोळा'
खंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव
खंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’
खंड : ९ पउमचरिउ - पेहलवी साहित्य
खंड : १० 'पैकारा' ते 'बंदरे'
खंड : ११ बंदा ते बुगनविलिया
खंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य
खंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ' ते 'म्हैसूर संस्थान'
खंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट
खंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण
खंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’
खंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ ते ‘वोल्व्हरिन’
खंड : १८ (शेख अमर ते सह्याद्रि)
खंड : १९ सँगर, फ्रेडरिक’ते सृष्टि व मानव
खंड : २०
मराठी विश्वकोशाची अधिक माहिती जाणून
घेण्यासाठी पुढील संकेत स्थळांना भेट द्या .
https://marathivishwakosh.org/
मराठी विश्वकोशाची महती सांगणारे एक गीत यु टूब वर उपलब्ध आहे. पाहण्यासाठी क्लिक करा
मराठी विश्वकोशाचे अभिमान गीत
मराठी विश्वकोश वापरताना कोश कसा
पहायचा हे शिकवणे महत्त्वाचे आहे .
मराठी
विश्वकोश मराठी स्वरमाला व मराठी व्यंजनमाला यानुसार बनविलेला
आहे. मराठी स्वरमाला व व्यंजनमाला खालीलप्रमाणे आहेत.
मराठी स्वरमाला - अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं , अ: अशी आहे.
अं आणि अ: हे आपण जरी लिहीत असलो तरी ते प्रत्यक्षात तसे नसून फक्त अनुस्वार आणि विसर्ग असे आहेत.
मराठी
व्यंजनमाला -
क,ख,ग,घ,ङ
च,छ,ज,झ,ञ
ट,ठ,ड,ढ,ण
त,थ,द,ध,न
प,फ,ब,भ,म
य,र,ल,व,श
ष,स,ह,ळ,क्ष,ज्ञ अशी आहे.
ही व्यंजनमाला लक्षात ठेवण्यासाठी
त्यांच्या आद्याक्षरांनी मिळून केलेला
'कचटतप' हा
क्रम लक्षात ठेवावा व शेवटी 'यरलवशषसहळक्षज्ञ' असते हे
ध्यानात
ठेवावे. म्हणजे कोणताही संदर्भ पाहताना काम सोपे होईल.
मराठी विश्वकोश विद्यार्थ्यांना
प्रकल्प करण्यासाठी महत्त्वाचे संदर्भ
साहित्य आहे. ग्रंथालयाच्या तासिकांच्या वेळी विद्यार्थ्यांना कार्यपत्रके देऊन
विश्वकोश वापरण्यासाठी प्रवृत्त करता येईल तसेच विश्वकोश कसा वापरायचा याचे
प्रशिक्षण देता येईल. या माहितीपर लेखासोबत असे नमुना कार्यपत्रक दिले आहे .
ग्रंथालय तासिकांसाठी अशा कार्यपत्रकांचा उपयोग केल्यास विश्वकोशाचा परिचय
होऊन विद्यार्थी प्रकल्पकार्यासाठी संदर्भ
शोधण्यासाठी विश्वकोश प्रभावीपणे वापरतील .
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
मराठी विश्वकोश ही तर्कतीर्थानी महाराष्ट्रस नव्हे भारतीयांना दिलेली बौद्धिक मेजवानी होय.आज महाराष्ट्र शासनने सर्व प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक यासह सर्व शैक्षणिक संस्था ,वाचनालय यांना विश्वकोशाच्या सर्व वीस खंडाचे सशुल्क वितरण करण्यात यावे.यामुळे विद्यार्थी,वाचकांचे ज्ञानसंवर्धन होईल.
ReplyDeleteसहमत 👍
Delete