Skip to main content

विश्वकोश परिचय कार्यपत्रक

                                                         विश्वकोश परिचय कार्यपत्रक

कार्य : . मराठी विश्वकोश खंड १ मधील पहिला शब्द कोणता आहे ?

 

 

. मराठी विश्वकोश खंड १७ मधील पहिला शब्द व शेवटचा शब्द शोधा .

 

 

३. संगणकाबद्दल माहिती मिळवायची असेल तर मराठी विश्वकोशाचा कोणता खंड पाहावा लागेल ?

 

 

. खैबरखिंड खिंडीबद्दल माहिती मराठी विश्वकोशाच्या कोणत्या खंडात सापडेल ?

 

 

. ‘सर्कस बद्दल माहिती मिळवण्यासाठी सर्कसशिवाय इतर कोणत्या शब्दांसंबंधी माहिती शोधल्यास सर्कसबद्दल पूरक माहिती मिळेल ?

 

 

. मिसिसिपी शब्द विश्वकोशाच्या कोणत्या खंडात सापडेल ? मिसिसिपी लेखामध्ये कोणत्या प्रमुख शीर्षकाखाली मिसिसिपीबद्दल माहिती सांगितली आहे ?

 

 

. ‘ऊस’ या बद्दल विश्वकोशात जी माहिती आहे त्याचे लेखक कोण आहेत ? ही माहिती लिहिण्यासाठी लेखकांनी कोणते संदर्भ वापरले आहेत ?

 

 

. सातव्या खंडाच्या शेवटी दिलेली चित्रे पाहा व आवडलेल्या कोणत्याही २ चित्रांची शीर्षके लिहा .

 

 

मराठी विश्वकोश

मराठी विश्वकोश या सर्वविषयसंग्राहक ज्ञानकोशाच्या संपादन व प्रकाशन कार्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची स्थापना दि..१२.१९८० रोजी करण्यात आली.विश्वकोश म्हणजे एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या धर्तीवर मराठीतील सामान्यातील सामान्य माणसांपर्यंत ज्ञान पोहचविण्यासाठी ग्रंथरूपी चळवळ, विश्वातील सारे शब्द, त्यामागचा इतिहास, भूगोल, त्त्वज्ञान, विज्ञान मराठीतून ज्ञानार्थींना मिळावे हा उद्देश आहे. मराठी विश्वकोश हे  मराठीतील ज्ञानाचे भांडार. अ ते ज्ञ पर्यंतच्या विश्वातील महत्त्वाच्या संज्ञांची मराठीतून ओळख सामान्य माणसाला व्हावी, या हेतूने हा  मराठी एन्सायक्‍लोपीडिया तयार केलेला आहे.

तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी या विश्वकोशाचे महत्त्व सांगताना प्रस्तावनेत लिहितात-




मराठी विश्वकोशाचे आतापर्यंत १ ते १९ खंड प्रकाशित झाले आहेत. विसावा खंड परिभाषाकोश आहे.

खंड विभागणी

खंड : १ (अंक ते आतुरचिकित्सा)
खंड : २ आतुरनिदान ते एप्स्टाइनजेकब
खंड : ३ एबिंगहाऊसहेरमानते 'किसांगानी'
खंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका
खंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि
खंड : ६ 'चेनसर एर्न्स्ट बोरिसते 'डोळा'
खंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव
खंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’
खंड : ९ पउमचरिउ - पेहलवी साहित्य
खंड : १० 'पैकाराते 'बंदरे'
खंड : ११ बंदा ते बुगनविलिया
खंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य
खंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळते 'म्हैसूर संस्थान'
खंड : १४ यंगएडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट
खंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण
खंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’
खंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ ते ‘वोल्व्हरिन’
खंड : १८ (शेख अमर ते सह्याद्रि)
खंड : १९ सँगरफ्रेडरिक’ते सृष्टि व मानव

खंड : २०

मराठी विश्वकोशाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील संकेत स्थळांना भेट द्या .

https://marathivishwakosh.org/

मराठी विश्वकोशाची महती सांगणारे एक गीत यु टूब वर उपलब्ध आहे. पाहण्यासाठी क्लिक करा

मराठी विश्वकोशाचे अभिमान गीत

मराठी विश्वकोश वापरताना कोश कसा पहायचा हे शिकवणे महत्त्वाचे आहे . मराठी विश्वकोश मराठी स्वरमाला व मराठी व्यंजनमाला यानुसार बनविलेला आहे. मराठी स्वरमाला व व्यंजनमाला खालीलप्रमाणे आहेत.

मराठी स्वरमाला - अ, , , , , , , , , , अं , अ: अशी आहे.

अं आणि अ: हे आपण जरी लिहीत असलो तरी ते प्रत्यक्षात तसे नसून फक्त अनुस्वार आणि विसर्ग असे आहेत. 


मराठी व्यंजनमाला -

,,,, 
,,,, 
,,,, 
,,,, 
,,,, 
,,,, 
,,,,क्ष,ज्ञ अशी आहे.

    ही व्यंजनमाला लक्षात ठेवण्यासाठी त्यांच्या आद्याक्षरांनी मिळून केलेला 'कचटतप' हा क्रम लक्षात ठेवावा व शेवटी 'यरलवशषसहळक्षज्ञ' असते हे ध्यानात ठेवावे. म्हणजे कोणताही संदर्भ पाहताना काम सोपे होईल.

    मराठी विश्वकोश विद्यार्थ्यांना प्रकल्प करण्यासाठी महत्त्वाचे  संदर्भ साहित्य आहे. ग्रंथालयाच्या तासिकांच्या वेळी विद्यार्थ्यांना कार्यपत्रके देऊन विश्वकोश वापरण्यासाठी प्रवृत्त करता येईल तसेच विश्वकोश कसा वापरायचा याचे प्रशिक्षण देता येईल. या माहितीपर लेखासोबत असे नमुना कार्यपत्रक दिले आहे . ग्रंथालय तासिकांसाठी अशा कार्यपत्रकांचा उपयोग केल्यास विश्वकोशाचा परिचय होऊन  विद्यार्थी प्रकल्पकार्यासाठी संदर्भ शोधण्यासाठी विश्वकोश प्रभावीपणे वापरतील .

 

प्रशांत दिवेकर

ज्ञान प्रबोधिनी, पुणे

Comments

  1. मराठी विश्वकोश ही तर्कतीर्थानी महाराष्ट्रस नव्हे भारतीयांना दिलेली बौद्धिक मेजवानी होय.आज महाराष्ट्र शासनने सर्व प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक यासह सर्व शैक्षणिक संस्था ,वाचनालय यांना विश्वकोशाच्या सर्व वीस खंडाचे सशुल्क वितरण करण्यात यावे.यामुळे विद्यार्थी,वाचकांचे ज्ञानसंवर्धन होईल.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वंदे गुरु परंपरा

वंदे गुरु परंपरा गुरुपौर्णिमा   अर्थात   ज्ञानाच्या   परंपरांचे   पाईक   होण्याचा   दिवस इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१) भगवद् गीतेत देखील श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना ज्ञानाच्या परंपरेचा दाखला दिला आहे. ते म्हणतात ‘ मी हा अव्यय ( अविनाशी ) योग सूर्याला सांगितला. सूर्याने मनुला सांगितला व मनूने  इक्ष्वाकू   सांगितला.  भारतीय परंपरेत नवीन ज्ञानतत्वाज्ञाच्या शाखांची मांडणी करताना देखील असा गुरु परंपरेचा वारसा सांगितला जातो. कारण ज्ञानाच्या परंपरेच्या संक्रमणातूनच ज्ञान वृद्धिगत होत जाते.                ज्ञान   प्रबोधिनीने   पथकाधिपती   म्हणून   समर्थ   रामदास ,  स्वामी   दयानंद ,  स्वामी   विवेकानंद   आणि   योगी   अरविंद या चार व्यक्तींचा स्वीकार केला आहे.   त्यापैकी एक म्हणजे समर्थ रामदास! कवि   वामन   पंडितांनी   समर्थांची ...

Vande Guru Parampara

  Vande Guru Parampara Guru Purnima – Honouring Our Gurus, Upholding the Tradition इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१) In the Bhagavad Gita, while advising Arjuna, Lord Krishna gives an example of the tradition of knowledge. He says, “I imparted this indestructible Yoga to the Sun (Vivasvan), who passed it on to Manu, and Manu, in turn, passed it on to Ikshvaku.” In the Indian tradition, whenever new knowledge or philosophy is presented, the legacy of the Guru's tradition is also acknowledged—because knowledge flourishes only when its lineage is preserved and passed on. Jnana Prabodhini has accepted four great personalities—Samarth Ramdas, Swami Dayananda, Swami Vivekananda, and Yogi Arvind—as its visionaries, and pathfinders who have shaped Jnana Prabodhini ideals and direction. Today, let us learn about Samarth Ramdas. The poet Vaman Pandit praises him with the following verse. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे...

महाराष्ट्रधर्म

                                                                                       महाराष्ट्रधर्म १९९९ साली महिनाभराच्या ईशान्य भारत दौऱ्यात गुवाहाटी येथे केशवधाम कार्यालयात पूर्वांचलातील कामांचा परिचय करून घेण्यासाठी गेलो होतो. ज्यांना भेटायचे होते त्यांची वाट पाहत कार्यालयात बसलो होतो. एक आजोबा कार्यालयात डोकावले. बाहेरचे पाहुणे आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी , “ कुठून आलात ? किती दिवस प्रवास आहे ? काय काय पाहिले ?” अशी चौकशी केली. महाराष्ट्रातून आलो आहोत हे कळल्यावर त्यांनी आम्हाला विचारले , “ तुम्ही रायगडावर जाऊन आला आहात का ?” आम्ही “हो , रायगड पाहिला आहे ,” असे सांगितल्यावर त्या आजोबांनी एकदम आम्हाला साष्टांग नमस्कार केला. आम्ही गोंधळलो. “काय झाले ?” म्हणून त्यांना   विचारले. मग आमच्या शेजारी बसत फालूदा   म्...