तंत्रस्नेही अध्यापक ७ ‘ बदल हा जीवनाचा स्थायी भाव आहे ’, किती सहजपणे उच्चारतो हे वाक्य आपण! आज सहा महिने झाले पहिले लॉकडाऊन जाहीर होऊन. लॉकडाऊन जाहीर झाला आणि २०२०-२१ या नव्या वर्षासाठी केलेले संकल्प गुंडाळून ठेवावे लागले. गेली दोन दशकं तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे शिक्षणरचनेवर जो जो प्रभाव पडत होता , तो आपण आपल्या गतीने , आपल्या गरजेनुसार स्वीकारत होतो. बदल हा जेव्हा सावकाश होतो , आतून होतो तेव्हा आपण त्याला परिवर्तन म्हणतो , पण अनेकवेळा परिस्थिती बदलायला भाग पडते किंवा ती उत्परिवर्तन घडवून आणते. महामारीच्या याकाळात आपल्याला तंत्रस्नेही अध्ययन-अध्यापन प्रकियेचा स्वीकार करून मुले शिकती राहतील यासाठी तंत्रस्नेही शैक्षणिक रचना निर्माण कराव्या लागल्या. आपल्याला तंत्रस्नेही व्हावे लागले! गेल्या सहा महिन्यातील आपल्या तंत्रस्नेही अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचा आढवा घेतला तर आपण या बदलाला चार प्रकारे सामोरे गेलो किंवा आपण हा बदल चार प्रकारे स्वीकारला किंवा आपण हा बदल चार प्रकारे घडवून आणला असे लक्षात येईल. १. पर्याय स्वीकारला (Substitution): ...
'अभ्यास देशस्थितीचा समतोल चलो' ज्ञान प्रबोधिनीच्या कामाच्या निमित्ताने झालेल्या प्रवासात शिक्षण विश्वाचे झालेले दर्शन व त्या निमित्ताने झालेला विचार मांडण्यासाठीचे लेखन