पुस्तक परिचय
पुस्तकाचे नाव : टेड टॅाक्स : कोणत्याही स्टेजवर प्रभावी भाषण देण्यासाठी उपयुक्त गाईड
: लेखक : क्रिस अँडरसन
अनुवाद : प्रसाद ढापरे
एखाद्या व्याख्यानाला श्रोते मिळवणे हे आज मिडिया युगात सर्वात अवघड काम आहे. या काळात टेड टॅाक्स, टेड एक्स या व्याख्यानमाला प्रचंड लोकप्रिय आहेत. मर्यादित - साधारण वीस मिनिटांमध्ये कल्पनांच्या आदानप्रदानाचे नवे निकष टेड टॅाक्सने कायम केले आहेत. TED टेक्नोलॉजी, एन्टरटेनमेंट, आणि डिझाईन या तीन विषयांवरील भाषणे आयोजित करण्यासाठी या व्याख्यानमालेची सुरूवात झाली. पण आज मानवी जीवनाच्या प्रत्येक घटकावर प्रकाश टाकण्यासाठी या व्याख्यानमालेचा वापर केला जातो. या व्याख्यानमालेचे प्रवक्ते ‘क्रिस अँडरसन’ यांनी शब्दांमध्ये जग बदलण्याची ताकद असते हे या व्याख्यानामालेच्या लोकप्रियतेने पुन्हा सिद्ध केले आहे. टेड टॅाक्सच्या माध्यमातून सार्वजनिक जाहिर वकृत्वकलेच्या नव्या पर्वाला सुरूवात झाली आहे.
या पुस्तकात टेड टॅाक्ससाठी वक्त्यांची तयारी करून घेताना आणि अनेक वक्त्यांची प्रभावी भाषणे ऐकल्यावर क्रिस अँडरसन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून सार्वजनिक वक्तृत्वाची नवीन परिभाषा तयार केले आहे त्याचे सूत्र या पुस्तकात मांडले आहे.
आजही जे वर्गात विद्यार्थ्यांशी नियमित संवाद करतात अशा शिक्षकांना व्यासपीठावर बोलण्यासाठी बोलावले की ताण येतो. ज्यांना स्वतःला व्यक्ता म्हणून घडवायचे आहे त्यांना भाषणाच्या वेळी काय करायचे आणि काय करायचे नाही याचे मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे.
भाषण तयार करताना भाषणाचे मध्यवर्ती सूत्र कसे बांधायचे, मुख्य संदेश कसा पोहोचवायचा, तो पोहोचवण्यासाठी कथाकथन कसे करायचे, स्पष्टीकरण कसे द्यायचे, भाषणाची सुरूवात आणि शेवट कसा करायचा, आपला आवाज आणि आपला व्यासपीठावरील वावर कसा असावा, तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा याबद्दल अनेक टेड टॅाक्सची उदाहरणे देत मांडणी केली आहे. हे सर्व झाल्यावर पोशाखआदी गोष्टींबद्दल सूचना दिल्या आहेत.
या पुस्तकात टेड टॅाक्स मधील अनेक वक्त्यांच्या मांडणीचा संदर्भ देत त्यांनी त्यांचे भाषण प्रभावी होण्यासाठी श्रोत्यांशी भावनिक जवळीक कशी साधली, त्यांचे मतःपरीवर्तन कसे केले, श्रोत्यांच्या नवचेतना कशा जागृत केल्या हे सोदाहरण सांगितले आहे. हे पुस्तक समजून घ्यायचे असेल तर युट्यूब वरील टेड टॅाक्स शोधून पहिले तर या पुस्तकातील सूत्राचे प्रत्यक्ष दर्शन होईल.
संवाद साधणे ही मानवाची गरज आहे आणि जो प्रभावी संवाद करू शकतो त्याच्या व्यक्तिमत्तावाचा प्रभाव पडतो. जर योग्य पद्धतीने भाषण दिलं तर व्यासपीठावरून संवादाची किमया साधता येते. आपल्यामधील या संवादाच्या जादूचा अत्यंत प्रभावीपणे वापर कसा करायचा हे माहिती करून घ्यायचं असेल तर जरूर क्रिस अँडरसन लिखित या पुस्तकातील सूत्रांच्या आधारे सराव करून स्वतःमधील वक्ता घडवा.

प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
भाषण
ReplyDeleteप्रभावी होण्यासाठी छान व उपयुक्त मुद्दे आहेत
सर🙏🌹🙏🌹🙏 धन्यवाद
Nice...How to get it..Pl
ReplyDelete