Skip to main content

Posts

मिझोरम : दहशतवादाचा उदय.......अस्त !!

  ' मिझोराम : दहशतवादाचा उदय अस्त ?' मिझोराममधील डोंगररांगांच्या कुशीत वसलेल्या बक्तॉम गावात रात्री मुक्कामी होतो. गावकऱ्यांशी गप्पा मारताना त्यांनी मिझो संस्कृतीतील एक म्हण सांगितली ' बांबूला जेव्हा फुलं येतात तेव्हा त्या मागोमाग दुष्काळ , मृत्यू आणि विध्वंस येतो. ' सन १९५९...... . या म्हणीचा प्रत्यंतर येणार होता. इतिहासाची पुनरावृत्ती मिझो लोकांएवढी क्वचित कोणी पुन्हा पुन्हा अनुभवली असेल. १८६२ , १८८१ , १९१२ , १५५९. ह्यावेळी मिझोरामधील मौतम...... नाव पण मौत ….... म् आणि शिंगतम (मेलिकोना बॅसिफेरा) जातीच्या बांबूला फुलोरा आला. बांबूला फुले आल्यानंतर बांबूचे आयुष्य संपते. मिझोराममध्ये प्रवास करताना मैलोंमैल प्रवास बांबूबनातून बांबूच्या जंगलातून होतो. बांबूला आयुष्यात एकदाच फुले येतात. प्रजातीनुसार ४० ते ६० वर्षांनंतर फुले येतात. फुले येऊन गेल्यावर बांबू नष्ट होतो. पर्यायाने कालांतराने जंगतालीत जमिन उघडी पडते. त्यामुळे अन्न व पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते. बांबूच्या फुलोऱ्यापासून तयार झालेले बीज जंगलात पसरते. हे बीज उंदरांचे आवडते अन्न आहे. बांबूच्या बिया खाल्यावर उं...

श्री अरविंदाश्रमातील शारीरिक शिक्षण

                 ‘ शरीरम् आद्यम् खलु धर्मसाधनम् ’ शरीर हे धर्माचरणाचे साधन आहे. भारतीय तत्त्वज्ञानात आत्म्याचे वाहन म्हणून शरीराला स्थान दिले आहे. शरीर आत्म्याच्या अभिव्यक्तीचे साधन आहे. मानवी जीवनाच्या सर्व क्रियांचा आविष्कार शरीराच्या माध्यमातून होत असतो. आनंदयुक्त कार्यक्षम दीर्घायुष्य जगायचं असेल तर सतेज शरीर आवश्यक आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत युक्ताहारविहाराला महत्त्व आहे. आधुनिक भारतीय तत्त्वज्ञ - श्री योगी अरविंद शरीर आत्म्याच्या अभिव्यक्तीचे साधन मानतात.  श्री योगी अरविंद म्हणतात." चैत्य पुरुषाचे आरोहण आणि अतिमानवाचे अवतरण घडण्यासाठी व्यक्तीला मोठी तपस्या करावी लागते. अशी तपस्या करण्यासाठी शरीर सुंदर सतेज असले पाहिजे. मन सुदृढ, पवित्र संयमशील असले पाहिजे. बुद्धी तेजस्वी अहंकार रहित, राष्ट्र शरण, मानवता शरण, ईश्वर शरण असली पाहिजे. श्री अरविंदाच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानात शरीर, मन व बुद्धी यांची शुद्धी, सुदृढता आणि सौंदर्य यांच्या विकसनाला मोठे स्थान आहे.  एखाद्या संगीतकाराला आपली रचना उत्कृष्टपणे सादर करायची असेल तर च...

सहपुस्तक चाचणी

  सहपुस्तक चाचणी                मार्च महिन्यात शालांत परीक्षा सुरु झाल्यावर वर्तमानपत्रे ; दूरचित्रवाणीवर दहावी , बारावीच्या परीक्षेत चालू असलेल्या कॉपी पुरवठ्याची छायाचित्रे , बातम्या , चित्रफिती दिसू लागतात. माध्यमात चर्चा सुरु होते आणि आपण कशासाठी शिकवतो ? असा प्रश्न पडतो. त्याला प्रतिसाद म्हणून कॉपी मुक्ती अभियान सुरु केले जाते आणि हळूहळू त्याचाच अभिमान वाटायला लागतो. परीक्षा कशासाठी... ? वर्गात शिक्षक पुस्तकातील पाठ वाचून दाखवतात , स्पष्टीकरण म्हणून वाक्य बोलीभाषेत रुपांतर करून मांडतात , पाठाचा सारांश सांगतात. परीक्षेत पाठाखालील सरावासाठी दिलेलेच प्रश्न विचारतात. पाठाखालच्या सरावातील प्रश्नच विचारायचे असतील तर परीक्षा कशासाठी... ?              माझे एक मित्र वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. गप्पा मारताना ते मला म्हणाले , ' अमुक सालानंतर डॉक्टर झालेल्यांकडून उपचार करून घेऊ नका. ' मी विचारले , का ? काय झाले ? म्हणाले - "त्यावर्षी मला पहिल्या...