'मिझोराम : दहशतवादाचा उदय अस्त ?'
मिझोराममधील
डोंगररांगांच्या कुशीत वसलेल्या बक्तॉम गावात रात्री मुक्कामी होतो. गावकऱ्यांशी
गप्पा मारताना त्यांनी मिझो संस्कृतीतील एक म्हण सांगितली 'बांबूला जेव्हा फुलं येतात तेव्हा त्या मागोमाग
दुष्काळ, मृत्यू आणि विध्वंस येतो. '
सन
१९५९...... . या म्हणीचा प्रत्यंतर येणार होता. इतिहासाची पुनरावृत्ती मिझो
लोकांएवढी क्वचित कोणी पुन्हा पुन्हा अनुभवली असेल. १८६२,
१८८१, १९१२, १५५९.
ह्यावेळी मिझोरामधील मौतम...... नाव पण मौत…....म् आणि
शिंगतम (मेलिकोना बॅसिफेरा) जातीच्या बांबूला फुलोरा आला. बांबूला फुले आल्यानंतर बांबूचे
आयुष्य संपते. मिझोराममध्ये प्रवास करताना मैलोंमैल प्रवास बांबूबनातून बांबूच्या
जंगलातून होतो. बांबूला आयुष्यात एकदाच फुले येतात. प्रजातीनुसार ४० ते ६०
वर्षांनंतर फुले येतात. फुले येऊन गेल्यावर बांबू नष्ट होतो. पर्यायाने कालांतराने
जंगतालीत जमिन उघडी पडते. त्यामुळे अन्न व पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते.
बांबूच्या फुलोऱ्यापासून तयार झालेले बीज जंगलात पसरते. हे बीज उंदरांचे आवडते
अन्न आहे. बांबूच्या बिया खाल्यावर उंदरांच्या प्रजनन क्षमतेत प्रचंड वाढ होते.
संख्येने बेसुमार वाढलेले उंदीर, जंगलातील अन्न पुरेनासे
झाल्यावर आपला मोर्चा शेतांकडे, गोदामांकडे पर्यायाने मानवी
वस्तीकडे वळवतात आणि मग त्या मागोमाग येते दुष्काळ; रोगराईचे
सावट.
१९५९ साली बांबूला फुले आल्यावर मिझोराममध्ये दुष्काळ पडला. त्याच्याशी सामना करण्यात मिझो युनियनचे स्थानिक सरकार अपूरे पडले. हजारो लोक दुष्काळ, रोगराईने मृत्यूमुखी पडले, स्थलांतरीत झाले. लोकांच्या मदतीसाठी 'मिझो फेमिन फ्रंट'ची स्थापना केली गेली व पुढे पु. लालडेंगाच्या नेतृत्वाखाली त्याचे एका दहशतवादी गटात 'मिझो नॅशनल फ्रंटमध्ये रूपांतर झाले. १९५९ च्या बांबू फुलोऱ्यानंतर सुमारे तीन दशके १९८७ चा शांतता करार होईपर्यंत मिझोराम फुटिरतावाद, दहशतवाद ह्यातून निर्माण झालेल्या अस्थिरतेचा सामना करत होता.
कोणत्या
कारणातून दहशतवादाचे बीजारोपण होऊन त्याचा विस्तार कसा झाला,
त्यावर नियंत्रण मिळवण्यात व शांतता प्रस्थापित करताना घटना कशा घडत
गेल्या, शह प्रतिशह, चर्चेच्या फेऱ्या,
वाटाघाटी कशा घडल्या त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न 'मिझोराम दहशतवादाचा उदय.... अस्त ?' मध्ये केला
आहे. अशा चळवळींचा खरच अस्त होतो का सुप्तावस्थेतील त्याची बीजे शिल्लक असतात हा
प्रश्न मागे उरतो.
Terrorist or extremist movement is an unlawful act of violence to intimidate governments or societies to
achieve political, religious or ideological objectives. |
मिझोराम :
खरंतर
मिजोरम! मिझोराम म्हणजे निसर्गसौंदर्याची मुक्त हस्ते केलेली उधळण. मिझोराम म्हणजे
बांबूनृत्य ! थंड वातावरण, घनदाट हिरवीगार
जंगले, बांबू बनांच्या दुलया पांघरलेल्या लुशाई टेकड्या आणि
ह्या लुशाई टेकड्यात नांदते मिझोराम. मिझोराम; 'मि' म्हणजे माणूस, 'झो' म्हणजे
डोंगर आणि रम म्हणजे भूमी. अर्थात डोंगरात राहणारा माणूस.
२१,००० चौ. किमी क्षेत्रफळ असलेल्या मिझोरामच्या पूर्वेस आणि पश्चिमेस
म्यानमार व बांग्लादेश सीमा आहेत. उत्तरेस आसामचा कचार जिल्हा, वायव्येस त्रिपुरा ईशान्येला मणिपूर आहे. मिझोरामची राजधानी आयझॉल आहे.
मिझोरामची लोकसंख्या सुमारे नऊ लाख आहे. साक्षरतेच्याबाबत मिझोराम देशात दुसऱ्या
क्रमांकावर आहे.
दहशतवादाचे बीजारोपण :
१९५९ साली मिझोराममध्ये पडलेल्या व्यापक दुष्काळात शेकडो लोक मृत्युमुखी पडले, स्थलांतरीत झाले. केंद्र सरकार व स्थानिक मिझो युनियनचे राज्य सरकार त्यांच्यातील समन्वयाच्या अभावाने मिझो जनतेच्या मनात राज्य सरकार व केंद्र सरकार ह्यांच्याबद्दल प्रचंड रोष निर्माण झाला. या रोषाला फुंकर घालून असंतोष निर्माण करण्यासाठी लालडेंगांच्या नेतृत्वाखाली 'मिझो नॅशनल फेमिन फ्रंट' ची स्थापना करण्यात आली. स्थानिक जिल्हा स्तरावर राजकारणात प्रवेश करण्याआधी लालडेंगा एक भूतपूर्व सेनाधिकारी होते. १९६२ साली मिझो फेमिन फ्रंटचे मिझो नॅशनल फ्रंटमध्ये रूपांतर करण्यात आले आणि दुष्काळाशी सामना करण्यासाठी स्थापन झालेल्या एका संघटनेचे रूपांतर फुटिरतावादी स्थानिक विभक्तवादी गटात झाले. १९६३ च्या सार्वत्रिक निवडणूकात मिझो नॅशनल फ्रंट दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आला. १९६५ साली पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींना लिहिलेल्या पत्रात लालडेंगा यांनी मिझो जनतेला त्यांचे भवितव्य ठरवण्याचा अधिकार असल्याची मांडणी केली व मिझो नॅशनल फ्रंटचा मिझो राष्ट्राचा आगूह जाहिरपणे प्रकट होऊ लागला. त्याच काळात लालडेंगांनी ढाक्क्याला गुप्त भेट देऊन पाकिस्तानी गुप्तचर खात्याबरोबर संधान बांधले व मिझो नॅशनल फ्रंटच्या सैनिकी शाखेसाठी सैनिकी प्रशिक्षण व शस्त्रांच्या उपलब्धतेबद्दल बोलणी करण्यास सुरूवात केली. मिझो नॅशनल फ्रंटने मिझो नॅशनल व्हॉलंटियर आणि मिझो नॅशनल आर्मी ह्या सैनिकी गटांची स्थापना केली. सीमापार सहकार्य मिळवून लालडेंगांनी सैनिकी गटांच्या बांधणीला व प्रशिक्षणाला सुरुवात केली.
Stage I : A political/ communal group organizes for an objective v A critical social problem exists that violates widely held values. v The general public is unaware of this problem. Only a few people are
concerned. Movement uses official channels, demonstrations are small and efforts
are taken to demonstrate the failure of power holders. v Office holder’s chief goal is to keep issues off social and political
agenda and maintain routine bureaucratic functioning to stifle opposition. |
दहशतवादाचा पहिला तडाखा :
२८ फेब्रुवारी १९६६ हा दिवस मिझो नॅशनल फ्रंटने तडाखा दिवस (ऑपरेशन झेरिको) म्हणून निश्चित केला. मिझो नॅशनल फ्रंटच्या १००० सैनिकांनी एका मोठ्या दहशतवादी कारवायीला सुरुवात केली. मिझो नॅशनल फ्रंट प्रथम राज्याच्या, राजधानीवर आयझॉलवर नियंत्रण प्रस्थापित केले. आयझॉल मधील सर्व राजकीय व प्रशासकिय यंत्रणावर ताबा मिळवला. राजधानीतील संपर्क व दळणवळण व्यवस्था स्वतःच्या ताब्यात घेतली, राज्याचा देशाशी असलेला संपर्क बंद पाडला. पुढच्या काही तासातच मिझो नॅशनल आर्मीने राज्यातील प्रमुख शहरांचा व दळणवळण मार्गांचा ताबा घेऊन सरकारी कार्यालये, तिजोऱ्या व शस्त्रागारांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. राज्याची राजधानी व महत्वाचे दळणवळणाचे मार्ग मिझो नॅशनल फ्रंट ह्या दहशतवादी गटाच्या नियंत्रणाखाली गेले.
Stage II :Build capacity for Disruptive & violent strategies of political action v The extremist movement triggers violent events by using firearms and
explosives for reckless change along with demonstrations. v Guerrilla warfare capacity is developed along with propaganda. v Extremists try to trigger distrust about the government's credibility.
v Need of recruits, intelligence and counterintelligence structures
from both sides. |
प्रत्युत्तर :
मिझोराममध्ये
घडत असलेल्या धक्कादायक घटनांची तातडीने दखल घेऊन भारत सरकारने प्रतिकारवायीला
सुरुवात केली. भारतीय सेनेने मिझोराम मुक्त करण्यासाठी 'ऑपरेशन झेरिको'ला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. भारतीय स्थलसेनेने दहशतवाद्यांचा
बिमोड करण्यासाठी भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच वायूसेनेबरोबर संयुक्त मोहिम
राबवली. ऑपरेशन झेरिकोचे प्रमुख आणि प्राथमिक उद्दिष्ट होते, राज्याची राजधानी, प्रमुख शहरे व महामार्गवर
नियंत्रण प्रस्थापित करणे. मार्च अखेरपर्यंत महत्वाची शहरे व महामार्गांवर
नियंत्रण प्रस्थापित करण्यात भारतीय सैन्याला यश मिळाले. परंतु अद्याप अनेक
गावांवर तसेच दुर्गम डोंगराळ भागातील खेड्यांवर बंडखोरांचे नियंत्रण होते.
२८ फेब्रुवारी १९६६ च्या हल्ल्याने मिझो नॅशनल फ्रंटची राजकीय, संघटनात्मक व भूमिगत सैनिकी गटाची तयारी व रचनाबद्ध मांडणी उजेडात आली. राज्यात भूमिगत समांतर सरकार स्थापन करण्यासाठी मिझो नॅशनल फ्रंटने पद्धतशीर भूमिगत लोकप्रतिनिधींची रचना व सैनिकी रचना बांधली होती. ह्या संघटनेत राज्यातील महाविद्यालयीन युवक तसेच शिक्षण अपूर्ण सोडलेल्या बेकार युवकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता.
मिझो नॅशनल फ्रंटचा मोठा दहशतवादी हल्ला व त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकाने आखलेल्या ऑपरेशन झेरिकोने मिझोराम प्रश्न सोडवण्यासाठी मिझो नॅशनल फ्रंटबरोबरच्या राजकीय चर्चेचा मार्ग बंद झाला. ही एका दीर्घकाळ चालणाऱ्या लढाईची सुरुवात होती.
दीर्घकाळ भूमिगत लढा (१९६६ - ७५) :
राजकीय तडजोडीचे पर्याय मागेपडून एका दीर्घकाळ चालणाऱ्या छुप्या युद्धाची सुरुवात झाली. आपली ताकद व प्रभाव दाखवता यावा तसेच कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी मिझो नॅशनल फ्रंट व मिझो नॅशनल आर्मीने भूमिगत धोरणांबरोबर हिट आणि रन प्रकारच्या दहशतवादी कारवायांना सुरुवात केली. मिझो नॅशनल फ्रंटने आपली ताकद व आंतरराष्ट्रीय सहानुभूती मिळविण्यासाठी आपले शेजारी पाकिस्तान, म्यानमार ह्या ठिकाणी आपले छुपे संपर्क वाढवण्यास सुरुवात केली. १९६६ - ७५ ह्या काळात राजकीय पर्यायापेक्षा सैनिकी पर्यायांचा वापर मिझो नॅशनल फ्रंट व भारत सरकार ह्या दोन्ही बाजूंनी केला गेला. ह्या काळातील प्रमुख घटनांचा आढावा घेऊ.
१९६७
साली मिझो नॅशनल आर्मीचा प्रभाव असलेल्या
दुर्गम गावात भारत सरकारने सैन्याच्या मदतीने गावाची पुनर्रचना करण्यास सुरुवात
केली. काही गावांचे स्थलांतर केले, संशयास्पद
व्यक्तींना पोलिस ठाण्यात हजेरी देणे, परवानगी शिवाय गाव न
सोडणे आदी उपाय योजण्यास सुरुवात केली. ह्याचा ह्या सगळ्या गोंधळापासून दूर
असलेल्या सामान्य जनतेला त्रास झाला.
भारत सरकारच्या ह्या प्रतिसादाला कसा प्रतिसाद द्यावा ह्या बद्दल मिझो नॅशनल फ्रंट व मिझो नॅशनल आर्मी ह्यांच्या विचारात फरक होता. मिझो नॅशनल आर्मीने ह्याला प्रत्युत्तर म्हणून सरकारी इमारती, कार्यालयांवर सशस्त्र हल्ले केले. मिझो नॅशनल फ्रंटमधील एक गट आपली उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी भारत सरकारशी बोलणी करावीत यासाठी तयार झाला. प्रेसबेटेरियन आणि बाबानिस्ट चर्चच्या माध्यामातून बोलणी सुरू झाली. रेव्हरंड झायरेमा (Zarirema) च्या माध्यमातून भारत सरकारने भारत स्वतंत्र मिझोराष्टाची मागणी फेटाळत आहे, भारत आपली भूमी देणार नाही, घटनेच्या चौकटीत राहून मिझो नॅशनल फ्रंट चर्चेला तयार असेल तर भारत सरकार मिझो नॅशनल फ्रंटबरोबर चर्चा करेल असा निरोप लालडेंगा यांना पाठवला.
मिझो
नॅशनल फ्रंट ने या काळात म्यानमारमधील बर्मा हिलस् व बांग्लादेशमधील चितगाव हिलस्
ह्या भागात स्वतःची आश्रयस्थाने निर्माण केली. मिझो नॅशनल आर्मीच्या आक्रमक
दहशतवादी हल्ल्यांची संख्या नियंत्रणात आली. १९६९ मध्ये मिझो नॅशनल आर्मीने ९
मोठ्या दहशतवादी घटना घडवून आणल्या जे प्रमाण १९६८ ते १९६७ च्या १५,
१९६६ चा ५८ घटनांपेक्षा खूपच कमी होते.
१९७१ बांग्लादेश मुक्ती लढा :
बांग्लादेश मुक्ती मिझो विप्लववादाला धक्का
देणारी घटना होती. पू. पाकिस्तानात पाकिस्तानच्या छत्राखाली आश्रय घेतलेल्या
लालडेंगाला बर्मातल्या आराकान टेकड्या व नंतर काही काळ पाकिस्तानमध्ये आश्रय
घ्यावा लागला. बांग्लादेश मुक्तीच्या काळात भारतीय सेनेने चितगाव टेकड्याच्या
परिसरात आश्रय घेतलेल्या मिझो, नागा
बंडखोरांविरुद्ध मोहिम राबविली. १९७२ च्या सिमला करारात दिल्ली आणि ढाक्यादरम्यान
दहशतवाद विरोधी संयुक्त मोहिमा राबवण्याचे निश्चित झाले. भारतीय सैन्य
बांग्लादेशमधून परतल्यानंतर चितगाव टेकड्यांच्या परिसरात दहशतवाद्यांचा वावर वाढू
नये म्हणून भारतीय वायूदलाचा हेलीकॉप्टर तळ अनेक दिवस ठेवण्यात आला. मिझो नॅशनल
आर्मीच्या ब्ल्यू गटाने शस्त्रत्याग करून
शरणागती पत्करली.
ईशान्य
भारतात मिझोराम, नागालँड, आसाममध्ये
घडणाऱ्या घटनांचा विचार करून १९७१ मध्ये ईशान्य भारतात मोठे राजकिय बदल भारत
सरकारने केले. आसाम ह्या मोठ्या प्रांतातून मेघालय, मणिपूर,
त्रिपूरा ह्या राज्यांची निर्मिती केली व अरुणाचल प्रदेश (नेफा ) व
मिझोराम ह्यांना केंद्र शासित प्रदेशांचा दर्जा देण्यात आला. १९७२ मध्ये
मिझोराममध्ये सार्वत्रिक निवडणूका घेण्यात आल्या. मिझो युनियन बहुमतात आली,
तिचे पुढे काँग्रेसपक्षात विलिनीकरण करण्यात आले.
दरम्यानच्या
काळात मिझो नॅशनल आर्मीने ब्ल्यू गटाच्या सदस्यांच्या हत्या घडवून आणल्या व शांतता
प्रक्रियेत सहभागी होणाऱ्यांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चालू ठेवला.
नागादहशतवादी
गट व भारत सरकारच्यात १९७५ मध्ये शिमला करार झाला. हा करार मिझो नॅशनल फ्रंटसाठी
मोठा धक्का होता. नागा बंडखोर भारत सरकार बरोबर लढण्यात मिझो नॅशनल आर्मीचे
मार्गदर्शक, मित्र, शस्त्र
पुरवठादार होते.
Stage III : Wide spread & organized
armed violence v Violent actions at key times and places are continues along with
ambush, kidnapping and assassination. v They try to broaden cross border coalitions to build piercing
capacity, and to establish outfits to mobilize additional resources. v Official channels used for limited dialogue. v Many subgroups immerge to achieve sub goals. Government tries to
initiate talks for political settlement. |
चर्चा वाटाघाटी :
१९७१ ते ७५ ह्या काळातील बांग्लादेश मुक्ती लढा, मिझो नॅशनल फ्रंटच्या काही गटांची चर्चा - शरणगतीची तयारी तसेच शिमला कराराने मिझो नॅशनल फुंटला मोठा धक्का बसला.
दरम्यानच्या काळात लालडेंगाने बांग्लादेशातून युरोपात पलायन केले होते व आसरा घेतला होता. ऑगस्ट १९७५ च्या मध्यास लालडेंगाने जिनिव्हातील रॉच्या अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधून भारत सरकार चर्चेस किती उत्सुक आहे याची चाचपणी केली. भारत सरकारबरोबर घटनेच्या चौकटीत चर्चा करण्याचे मान्य करून जानेवारी १९६६ मध्ये लालडेंगाचे युरोपमधून नवी दिल्लीत आगमन झाले. १९७६ ते १९७९ या कालावधीत आधी शस्त्रसंन्यास नंतर मागण्यांवरती विचार अशी भारत सरकारने चर्चेमध्ये भूमिका घेतली. लालडेंगा मिझो नॅशनल आर्मी संपूर्ण शस्त्रसंधी करण्यास तयार होईल ह्याबद्दल साशंक होते व भारत सरकारला शस्त्रसंन्यासाचे कोणतेही आश्वासन देऊ शकत नव्हते. त्यामुळे चर्चा पुढे सरकत नव्हती. १९७८ मध्ये मिझोराममध्ये सार्वत्रिक निवडणूका होऊन ब्रिगेडीयर सियालो यांच्या पिपल्स् कॉन्फरन्सचे सरकार राज्यावर आले. लालडेंगांना मिझो नॅशनल फ्रंट आणि मिझो नॅशनल आर्मीला बरोबर घेऊन तडजोडीला अपयश येण्यास मिझो नॅशनल फ्रंटमधील उग्रवादी गटाचा विरोध कारणीभूत होता.
भारत
सरकारने जुलै १९७९ मध्ये लालडेंगांना अकट केली. मिझो नॅशनल फ्रंट मधील उग्रवादी
गटाने १९७९ मध्ये मिझोराममधील अमिझो मुख्यतः बंगाली नागरिक व सरकारी
अधिकाऱ्यांविरुद्ध दहशतवादी कारवायांना सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात पोलिस
ठाण्यावर व व्यापारी केंद्रावर हल्ले केले. हल्ल्यांचे क्षेत्र काही काळातच
त्रिपुरापर्यंत विस्तारले. २ एप्रिल १९८० मध्ये बेलवर लालडेंगांची सुटका करण्यात
आली.
एप्रिल
१९८० मध्ये आपल्या विरोधातील सर्व आरोप रद्द करण्याच्या अटींवर नव्याने सत्तेवर
आलेल्या इंदिरा गांधीबरोबर बोलण्यास व चर्चा करण्यास तयार झाले व दोन्ही बाजूंनी
शस्त्रबंदी / युद्धबंदी करण्याबाबत एकमत झाले. त्या युद्धबंदीच्यासाठी लालडेंगांनी
मिझोराम भारताचा घटक आहे व घटनेच्या चौकटीत राहून बोलणी करण्यास तयारी दर्शवली.
हे चर्चेचे गुऱ्हाळ १९८२ पर्यंत चालू राहिले व तात्पुरती शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला. १९८२ मध्ये नव्या मिझो राज्यात लालडेंगा व मिझो नॅशनल फ्रंटचे स्थान निश्चित होऊ न शकल्याने चर्चा फिसकटल्याव २१ एप्रिल १९८२ रोजी भारत सरकारने लालडेंगांना देश सोडून जाण्यास फर्मावले, लालडेगानी लंडनमध्ये आश्रय घेण्यासाठी योजना आखण्यास सुरुवात केली. लालडेंगांनी चर्चा मोडल्याचा आरोप भारत सरकारवर केला. १९८२ च्या मध्यात नॅशनल फ्रंटवर बंदी जारी करण्यात आली. पुन्हा एकदा राजकीय तडजोड व शांततेचा पर्याय धुसर झाला. सप्टेंबर १९८४ पर्यंत भारत सरकारने मिझोराममधील राष्ट्रपती राजवटीला पुन्हा मुदतवाढ दिली.
Stage IV :Talk fight : settlements, demobilization,
disarmament v Extremists transform for long-term struggle to win public
mandate. They try to create an image of positive alternatives. Efforts
are taken to establish parallel services & administration. v To protect strong holds minor underground violent psyche and logistic operations are
continued. v Growing opposition by extremist outfits forces to bring the problem on
the political agenda. Government shows willingness for socio-economic
development proposals to highlight negotiation or settlement. v Leadership with strong political will with national interest is
required. v Many times extremists split off again to
enter a violent phase in absence of political settlement. |
शांततेच्या दिशेने चर्चा तडजोड करार:
१९६६ पासूनच्या अशांततेने दहशतवादी दमनचकात सामान्य मिझो जनता भरडली जात होती. १९८९ -८२ या काळातील युद्धबंदी शांततनेने मिझो जनता शांततेसाठी अनुकूल झाली होती, मिझो नॅशनल फ्रंटच्या लोकप्रियतेला हळूहळू ओहोटी लागली होती. १९८४ मध्ये मिझोराममध्ये सार्वत्रिक निवडणूकांनंतर पू लालथनहाऊला यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. लालथनहाऊलांनी मिझो नॅशनल फ्रंटच्या सुरुवातीच्या काळात लालडेंगाचे सहकारी म्हणून काम केले होते. लालथनहाऊलांनी ख्रिस्ती धर्माच्या तत्वावर मिझो संस्कृतीचे संरक्षण व संवर्धन करण्याची प्रक्रिया सुरू केली. याचा एक भाग म्हणून त्यांनी घटनेच्या चौकटीत राहून चर्चा करण्यासाठी लालडेंगांना पुन्हा आवाहन केले. भारत सरकारने १९८४ च्या ऑक्टोबर मध्ये ईशान्य भारतातील दहशतवादावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी व बांग्लादेश घुसखोरांचा दबाव नियंत्रणात आणण्यासाठी बांग्लादेश सीमेवरती चौक्या व काटेरी कुंपण उभारण्यास सुरुवात केली.
लालडेंगा ३० ऑक्टोबर १९८४ रोजी विजनवासातून लंडनहून भारतात आले. लालडेंगांनी शांतता करारासाठी मिझो नॅशनल फ्रंटच्या सर्व स्तरातून व गटांतून पाठिंबा मिळवण्यासाठी बोलणी करण्यास सुरुवात केली. दहशतवादी कारवाया संपूर्णपणे थांबवणे, मिझोराम भारताचा भाग आहे आणि घटनेच्या चौकटीत चर्चा करण्यास मिझो नॅशनल फ्रंट तयार असेल तर भारत सरकारने मिझो नॅशनल फ्रंटबरोबर पुन्हा बोलणी करण्याची तरायी सुरू केली व मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यास सुरुवात झाली.
३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची हत्या झाली व त्यानंतर राजीव गांधींनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. २३ नोव्हें. १९८४ रोजी पुन्हा भारत सरकार व मिझो नॅशनल फ्रंटमध्ये शांतता बोलण्यास सुरुवात झाली. ३१ डिसें. १९८४ रोजी राजीव गांधी व लालडेंगा यांची बैठक झाली. शांतता करारावर बोलणी करण्यात आली. दि. ७ एप्रिल १९८५ रोजी लालडेंगा यांनी मिझो विप्लववाद सशस्त्र मार्गाने सुटणार नसण्याचे स्वीकारले व मिझो अतिरेक्यांच्या शस्त्रसंन्यासाच्या प्रक्रियेवर चर्चा सुरू झाली. भारत सरकारने मिझोरामला राज्याचा दर्जा देऊन मिझो संस्कृतीच्या संरक्षणाची हमी देण्याच्या मुघाचा करारात समावेश करण्यावर विचार करण्यास सुरुवात केली.
दरम्यानच्या
काळात ५ मार्च व ५ सप्टेंबर १९८५ ला सहा महिन्यासाठी दोन वेळा राष्ट्रपती राजवटीला
मुदत वाढ देण्यात आली. मिझो विद्यार्थी संघटनेने लवकरात लवकर शांतता प्रक्रिया
पूर्ण व्हावी या मागणसाठी एक दिवसाचा राज्यव्यापी बंद घडवून आणला.
२१
जून १९८६ रोजीमिझो नॅशनल फ्रंट व भारत सरकारमध्ये शांतता कराराचा मसुदा अंतिम
करण्यात आला. दि. २६ जून १९८६ रोजी भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाने शांतता
कराराच्या मसुद्यास अंतिम मान्यता दिली. ३० जून १९८६ रोजी केंद्र सरकारच्या
गृहखात्याचे सचिव आर. डी. प्रधान, मिझो नॅशनल
फ्रंटचे नेते लालडेंगा, मिझोरामचे प्रधान सचिव लालखम
यांच्यात नवी दिल्ली येथे मिझो शांतता करारावर स्वाक्षरी करण्यात आली. देशात
शांतता व स्थैर निर्माण करण्यासाठी पंजाब करार, आसाम करारा
पाठोपाठ मिझो करार हे राजीव गांधी शासनाचे मोठे यश होते. हा करार होताना लोलडेंगा
६० वर्षांचे झाले होते. १९६६ पासून साधारण वीस वर्षांचा काळ त्यांनी तुरुंगात
किंवा विजनवासात काढला होता. करार होताना त्यांनी मिझो नॅशनल आर्मीच्या शस्त्र
गटाला शस्त्रसंन्यास घेऊन शांततामय मार्गाने विकासाच्या आणि मिझो संस्कृतीच्या
संवर्धनाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
मिझो करारातील प्रमुख तरतुदी :
१. मिझो नॅशनल फ्रंट भूमिगत दहशतवादी कारवाया पूर्णपणे थांबवले, शस्त्रमार्गाने व भूमिगत मार्गाने काम करणारे सर्वजण शस्त्र त्याग करून नागरी जीवनात प्रवेश करतील.
२.
मिझो नॅशनल फ्रंट
राज्यात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने मिझो नॅशनल फ्रंट च्या
घटनेत बदल करेल,हिंसा पूर्णपणे थांबवून नागरि
जीवन स्थिर करण्यासाठी मदत करेल.
३.
मिझो नॅशनल फ्रंट त्रिपुरातील त्रिपुरा नॅशनल व्हॅलंटीयर,
मणिपूरमधील पिपल्स लिबरेशन आर्मी तसेच ईशान्य भारतातीलइतर दहशतवादी
गटांना प्रशिक्षण, शस्त्र वा संरक्षण अशा कोणत्याही प्रकारचे
साहाय्य करणार नाही.
४. सरकार शस्त्रसंन्यास घेतलेल्या मिझो नॅशनल फ्रंट सदस्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करेल.
५.
केंद्रिय शासन
मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू करेल.
Stage V :Final settlement v The extremist movement takes on a ‘reform’ role to protect and extend
successes. v The movement attempts to minimize losses due to backlash and sets
itself to the sub-goals and issues. v It defines itself for long-term goals to achieve a paradigm shift. v The government adapts to new policies and conditions by accommodating
movement politically. |
शांतता करारानंतर :
५ ऑगस्ट १९८६ मिझोरामला भारताच्या तेविसाव्या राज्याचा दर्जा देण्यात आला. मिझो संस्कृती व पारंपरिक रूढी, कायदे यांना संरक्षण देण्याचे जाहीर करण्यात आले. २० ऑगस्ट १९८६ रोजी मिझो नॅशनल फ्रंटवरची बंदी उठवण्यात आली. दि. २१ ऑगस्ट १९८६ रोजी लालडेंगा यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. तीन मिझो नॅशनल फ्रंट व ५ काँग्रेस आय चे मंत्री असलेले मंत्रीमंडळ अस्तित्वात आले. फेब्रुवारी १९८७ मध्ये मिझोराम राज्याच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या. या निवडणूकीत मिझो नॅशनल फ्रंटला ४० पैकी २४ जागांवर विजय मिळाला. काँग्रेस आयला १३ तर पिपल्स् कॉन्फरन्सला ३ जागी विजय मिळाला. लालडेंगा यांचे सरकार अस्तित्वात आले.
मिझो आंदोलनातून काय साध्य झाले ? :
सकारात्मकदृष्टा मिझो जनजातींतील अनेक गट एका मोठ्या मिझो राष्ट्रीयत्वाच्या नावाखाली एकत्र आले पण व्यापक राष्ट्रीयत्व निर्माण करू शकले नाहीत. हा संकूचित राष्ट्रवाद मिझोराममधील हामर, रियांग, चकमा आदी जनजातींसाठी असुरक्षितता निर्माण करणारा ठरला. रियांग जनजाती मोठ्या प्रमाणात मिझोराममधून स्थलांतरीत झाली.
मिझो करार यशस्वी होण्यात भारत सरकारने मिझो नॅशनल फ्रंटच्या सर्व गटांचा शांतता बोलण्यात सहभाग असण्यासाठी केलेले प्रयत्न व त्यासाठी आवश्यक तेवढा वेळ वाट पाहण्याची दर्शविलेली तयारी.
एखाद्या छोट्या प्रश्नातून राष्ट्रातील छोट्या प्रादेशिक लोक समुहात सामाजिक, राजकिय, आर्थिक किंवा सांस्कृतिक असुरक्षिततेची भावना निर्माण झाली तर त्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारने करावयाचे प्रयत्न व व्यापक राष्ट्रीयत्वाची भूमिका महत्वाची आहे हे मिझोराम दहशतवादाचा उदय.... अस्त ?' च्या अभ्यासाने शक्य आहे.
भारताच्या अनेक प्रांतांत अशा प्रकारच्या फुटिरतावादी, विप्लववादी गटांची संख्या वाढत असताना मिझोरामचा हा प्रवास प्रादेशिक विकास व व्यापक राष्ट्रीयत्वाची धोरणे ठरवण्यासाठी मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. मिझो नॅशनल फ्रंटसारख्या चळवळींचा खरच अस्त होतो का सुप्तावस्थेतील तिची बिजे शिल्लक असतात या प्रश्नासाठी काळ हेच उत्तर शिल्लक राहाते.
अशी बीजे सुप्तावस्थेत राहण्यासाठी शांतता, बोलण्यात प्रत्येकाची दखल व प्रत्येकाला समान संधी मिळेल असे व्यापक राष्ट्रीय धोरण आखणे आवश्यक आहे. आज मिझोराम ईशान्य भारतातील सर्वात शांत व स्थिर राजवट असलेले राज्य आहे. २००५-०६ साली मिझोराममध्ये बांबूला परत फुलोरा येऊन एक ऋतुचकू पूर्ण झाले आहे. या काळात सरकारला मिझो राष्ट्राचा पुरस्कार करणारे गट डोकेवर काढतील अशी भिती वाटत होती. पण विघटनाची बीजे सुप्तावस्थेतच राहिली.
पण राष्ट्रीय एकात्मतेसाठी अजून बरेच करावे लागेल.
एक
घटना सांगतो आणि या लेखाचा समारोप करतो.
'मिझोराममधील
एक उंच शिखर 'रियाक पिक'ला
मी एक दिवस ट्रेकिंगसाठी गेलो होतो. वाटेत मिझो युवकांचा गट भेटला. त्यातील काहीजण
आम्हाला पाहिल्यावर 'आईवा' 'डरवार'
अशा आरोळ्या द्यायला लागले. स्थानिक मिझो वाटाड्याने त्याचा अर्थ 'परदेशी भारतीय' असा सांगितला. माझ्यासाठी ही घटना
अनपेक्षित होती, मिझोरामची भारताशी नाळ जोडण्यासाठी अजून
भरपूर प्रयत्न करण्याची असलेली गरज याची जाण करून देणारी होती. एकात्म भारताचे
स्वप्न अजून दूर क्षितिजावर उभे आहे.'
संदर्भ :
Insurgent
crossfire: Subir Bhaumik
Mizo:
Chronology / Timeline: SATP
The
fearful State: S. M. Ali Mizo insurgancy phases
Maga, Mizo, Meitei insurgencies: Sajal Nag
Making of Mizoram: Suhas Chatterjee
प्रशांत
दिवेकर
ज्ञान
प्रबोधिनी,पुणे
अत्यंत तपशीलात लिहिलेला माहितीप्रद लेख
ReplyDelete