तंत्रस्नेही अध्यापकत्व : लेख १० मी, युट्युब आणि माझा अभ्यास ( भाग २) युट्यूबने आपल्यासाठी माहिती , ज्ञान आणि करमणूक अशा वेगवेगळ्या चित्रफितींचा खजिनाच उपलब्ध करून दिला आहे. काय सापडत नाही युट्यूबवर आपल्याला ? मला तर मी शाळेत असताना पाहिलेल्या ब्योमकेश बक्षीसारख्या मालिका , दूरदर्शनवर पाहिलेल्या भारतीय शिल्पकलेवरचे माहितीपट , जुनी व्याख्याने ... काय सांगू अन काय नाही... मी तरी सध्या युट्यूबचा फॅन आहे. युट्यूबची मजा ही आहे ही आहे की एखादी चित्रफित तयार करून प्रकाशित करणे ही फक्त चित्रपट दिग्दर्शक वा निर्मात्याची मक्तेदारी राहिली नाही. आपण आपला चॅनल तयार करून त्यावर आपण तयार केलेल्या चित्रफिती लोकांना बघण्यासाठी ठेवू शकतो. युट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रफिती लोक तयार करून आपल्याला बघण्यासाठी उपलब्ध करून देतात. त्या चित्रफितींचे प्रकार आपण समजावून घेतले तर आपण अभ्यासासाठी कोणत्या प्रकारची चित्रफित शोधायची , पाहायची वा तयार करायची हे ठरवू शकतो. कारण प्रकारानुसार चित्रफिती पाहताना वा तयार करताना...
'अभ्यास देशस्थितीचा समतोल चलो' ज्ञान प्रबोधिनीच्या कामाच्या निमित्ताने झालेल्या प्रवासात शिक्षण विश्वाचे झालेले दर्शन व त्या निमित्ताने झालेला विचार मांडण्यासाठीचे लेखन