अक्षयवट
गेल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातील संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी येथे मुख्याध्यापक प्रशिक्षणासाठी गेलो होतो.
निवासी शाळा, तंत्रशिक्षण शाळा, सैनिकी शाळा, कृषी विज्ञान केंद्र असे विविध
शैक्षणिक आणि ग्राम विकासाचे काम संस्कृती संवर्धन मंडळामार्फत महाराष्ट्र-तेलंगणा
सीमावर्ती तालुक्यात राबवले जातात.
दीड-दोनशे एकरात पसरलेल्या संस्कृती संवर्धन मंडळाच्या आवारात एक वेगळेच सभागृह पाहायला मिळाले ‘वसुंधरा सभागृह’. चार वर्षांपूर्वी या सभागृहात शाळेच्या दहावीच्या तुकडीच्या शुभेच्छा समारंभात सहभागी झालो होतो.
यावेळी या वटवृक्षाचे एक वेगळे पण
लक्षात आले ते म्हणजे एवढा डेरेदार विस्तार असलेल्या या वडाच्या झाडाला पारंब्याच
नाहीत.
सगरोळीतील महावृक्ष पाहिल्यावर २००५
मध्ये कोलकाता येथील वनस्पती उद्यानात पाहिलेला वृक्षराज आठवला.
सुमारे २५० वर्ष आयष्य असलेला ह्या वृक्षराजाचा परीघ ४५० मीटर आहे. त्याला सुमारे
२८८० पारंब्या आहेत. सर्वात उंच शाखा सुमारे 25 मीटर आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे
या वृक्षराजाचे मूळ मुख्य खोड १९२५ सालीच नष्ट झाले. मूळ स्थापक खोड नसले तरी आजही
हा वृक्षराज विस्तारत आहेत. त्याची प्रत्येक पारंबी जोपासून जमिनीपर्यंत पोचेल अशी
काळजी घेतली जाते.
अनेक संस्थाचे आणि संघटनांचे काम वटवृक्षासारखे
विस्तीर्ण असते पण त्याला पारंब्याच नसतात. कालानुरूप नेतृत्व करणाऱ्या संस्थापक
खोडाचे आयुष्य पूर्णत्वाकडे निघाल्यावर महावृक्ष वठत जातो किंवा वादळात हे वृक्ष
उन्मळून पडतात.
काही वडाच्या झाडांना पारंब्या
असतात पण त्या कधीच जमिनीपर्यंत पोचत नाहीत वा पोचून दिल्या जात नाहीत.
नांदुरकीसारखे काही वृक्ष दर्शनी
वडासारखे असतात ते आकाराने मोठे असतात पण त्यांच्या पारंब्या मुळातच खुरट्याच
असतात त्यामुळे ते डेरेदार असले तरी महावृक्ष होऊ शकत नाहीत.
पिंपळ, औदुंबर, आंबा यासारखे देववृक्ष
विस्तीर्ण डेरेदार महावृक्ष असतात पण ते चिरायू नसतात. त्यांच्या आयुष्यात हे
वृक्ष अनेकांसाठी आधारवट ठरतात.
कोलकाता येथील वनस्पती उद्यानातील वृक्षराज
वटवृक्षासारख्या अनेक संघटना भारतभर पसरल्या आहेत. अशा महावृक्षाच्या पारंब्या त्या
संघटनेला अक्षयवट बनवतात.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी,
पुणे
कृपया ब्लॉग शेअर करताना ब्लॉगची लिंक अग्रेषित करावी म्हणजे वाचक त्यांचे प्रतिसाद थेट लेखकापर्यंत पोचवू शकतील.
अक्षयवड , आधरवड ..छान मांडणी
ReplyDeleteसर ,खूप छान वर्णन केले आहे तुम्ही ,असाच एक महाकाय वटवृक्ष संगमनेर नजीक पेमगिरी जवळ आहे.यातून आणखी 1 बोध होतो.खरी संघटना तीच ज्यात पारंब्या व खोड यात फरक सापडत नाही.
ReplyDeleteछान, सोप्या पध्दतीने समजावलेला विषय
ReplyDeleteखूप छान मांडणी!👌👍
ReplyDeleteखूप सुंदर वर्णन केलात सर
ReplyDeleteफारच छान मांडणी.... संकल्पना पण पटली आणि भावली.
ReplyDeleteखूप छान मांडणी👌
ReplyDeleteखूप छान मांडणी.. नेतृत्वाचा प्रवास आधारवड ते अक्षयवड व्हायला हवा... 🙏
ReplyDeleteखूपच छान मांडणी
ReplyDelete