अभ्यासातील स्वावलंबन – भाग १
अभ्यासाची पूर्वतयारी
अभ्यासाला बस ! अभ्यासाला बस !! पालकांचा हा घोषा घराघरामध्ये सतत मुलांमागे
चालू असतो. पण बरेचदा मुलांना माहिती नसते खरंच माझा अभ्यास होईल यासाठी मी काय
केले पाहिजे. यातील मुलांच्या बाजूने दुसरा मुद्दा असतो मी असे काय काय करायला पाहिजे म्हणजे पालकांना
कळेल, की मी अभ्यास केला आहे.
आज लॉकडाऊनच्या काळात मुलं कानाला काहीतरी लावून स्क्रीन
समोर बसलेली दिसतात , पण त्यांचं काय शिक्षण होत आहे याचा अंदाज शिक्षकांबरोबर
पालकांना घेणे अवघड होत चालले आहे. कारण अभ्यास करायचा म्हणजे काय करायचे ?
अभ्यासाचा विचार कोणी करायचा, कसा करायचा ? याची उत्तरे नसतात.
अनेकदा अभ्यासाला बसल्यावर विद्यार्थी पुस्तक उघडून
बसतात; पण त्यांनी अभ्यासाला बसताना मी काय वाचू, का वाचू, कसं वाचू आणि जे वाचले त्यातील
काय नोंदवून याचा विचार अभ्यास अभ्यासाला बसण्यापूर्वी केलेला नसतो. आपल्या
अभ्यासात अनेक अडचणी आहेत, अडथळे आहेत याची जाणीव विद्यार्थ्याला कशी करून द्यायची
आणि अशी जाणीव झाल्यानन्तर; अभ्यासाची इच्छा निर्माण झाल्यावर काय करायचे, कसे
करायचे याचे मार्ग विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना कसे सापडणार ?
यासाठी
कशाचा अभ्यास करायचा याबरोबर अभ्यास का, काय,
केव्हा आणि कसा करायचा या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी विद्यार्थ्याला
प्रवृत्त करायला पाहिजे. असे केले तर विद्यार्थ्याला अभ्यासातील स्वावलंबनाचा
मंत्र सापडेल. अशा स्वावलंबनाच्या
मंत्रांचा परिचय करून देणाऱ्या ‘वेध
यशाचा’ या पुस्तक मालिकेतील पहिले पुस्तक ‘अभ्यासातील
स्वावलंबन – भाग १: अभ्यासाची पूर्वतयारी’
प्रा.
महेंद्र सेठिया आणि प्रा. विवेक पोंक्षे लिखित या पुस्तकाच्या मलपृष्ठावरील
पुस्तकाची ओळख पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित करतो.
अभ्यासाला पर्याय नाही ! खरंय ना ! पण हा अभ्यास
नाईलाजाने करण्यापेक्षा आनंददायी झाला तर... फक्त परीक्षेपुरता आणि गुणांपुरता न
राहता त्या-त्या विषयाची गोडी,
समज वाढवणारा झाला तर... गाईड्स-क्लासेसच्या
कुबड्यांवर विसंबून न राहता स्वावलंबनाने करता आला तर… फक्त अभ्यासातला किडा न बनता,
कमीत कमी वेळात परिणामकारक अभ्यास करून उरलेल्या वेळात वैविध्यपूर्ण अनुभव घेता आले तर… काय शिकायचं यापेक्षा
का आणि कसं शिकायचंय याचं शास्त्र व कला समजली तर… हे
सर्व शक्य आहे असं सांगणाऱ्या आणि त्यासाठी अभ्यासाच्या विविध पद्धती,
तंत्रे, कौशल्ये, सवयी
यांची अनुभवसिद्ध मांडणी करणाऱ्या अभ्यासातील स्वावलंबन' या
पुस्तकांच्या मालिकेतील हे पहिले पुस्तक! अभ्यास
का,
काय, केव्हा आणि कसा करायचा या प्रश्नांची
उत्तरे शोधण्यासाठी हे पुस्तक मदत करेल. उद्दिष्ट का व कसे ठरवायचे, ते गाठण्यासाठी नियोजन कसे करायचे, अभ्यासाच्या
विविध पायऱ्या कोणत्या, अभ्यासातील अडथळे कसे दूर करायचे
आणि अभ्यास परिणामकारक कसा करायचा हे विस्ताराने व उदाहरणांसह या पुस्तकात
सांगितले आहे. त्यातून 'खरा' व
आनंददायी अभ्यास करण्यासाठी छान पूर्वतयारी होईल. शालेय
विदयार्थ्यांसाठी प्रामुख्याने हे पुस्तक लिहिलेले असले तरी सर्व वयोगटातील
विदयार्थ्यांना व विदयार्थ्यांच्या अभ्यासासाठी प्रोत्साहन देणाऱ्या
पालक-शिक्षकांनाही हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल. |
या
पुस्तकांचा वापर करून परीक्षेसाठी उत्तम अभ्यास कसा करायचा असतो याचा
विद्यार्थ्यांना परिचय होईल, त्यामुळे स्मरणावर आधारित पाठांतर, घोकंपट्टी,
रट्टा मारणे यांच्या आधारे परीक्षेत उत्तीर्ण होणे याच्या पलीकडे
जावून विद्यार्थी विषय मुळातून समजून
घ्यायला प्रवृत्त होतील. विद्यार्थ्याचा हा प्रवास घडवून आणायचा असेल, तर प्रत्येक
पालक आणि शिक्षकांनी वाचलेच पाहिजे असे पुस्तक म्हणजे छात्र प्रबोधनद्वारा
प्रकाशित पुस्तक ‘अभ्यासातील स्वावलंबन – भाग १: अभ्यासाची पूर्वतयारी’
याच
मालिकेतील ‘अभ्यास कौशल्य', 'परीक्षा तंत्र' क्रमशः प्रकाशित होणार आहेत. हे पुस्तक वाचून नवीन
पुस्तकांच्या प्रतीक्षेत राहूया.
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
समतोल,
जुलै २०२१, जेष्ठ-भाद्रपद, शके १९४३ मध्ये प्रकाशित
पुस्तक खरेदी
करण्यासाठी खालील लिंकला भेट द्या
‘अभ्यासातील
स्वावलंबन – भाग १: अभ्यासाची पूर्वतयारी’
Comments
Post a Comment