Skip to main content

अक्षयवट

 अक्षयवट

गेल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातील संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी येथे मुख्याध्यापक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. निवासी शाळा, तंत्रशिक्षण शाळा, सैनिकी शाळा, कृषी विज्ञान केंद्र असे विविध शैक्षणिक आणि ग्राम विकासाचे काम संस्कृती संवर्धन मंडळामार्फत महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती तालुक्यात राबवले जातात.

दीड-दोनशे एकरात पसरलेल्या संस्कृती संवर्धन मंडळाच्या आवारात एक वेगळेच सभागृह पाहायला मिळाले ‘वसुंधरा सभागृह’. चार वर्षांपूर्वी या सभागृहात शाळेच्या दहावीच्या तुकडीच्या शुभेच्छा समारंभात सहभागी झालो होतो.

यावेळी या वटवृक्षाचे एक वेगळे पण लक्षात आले ते म्हणजे एवढा डेरेदार विस्तार असलेल्या या वडाच्या झाडाला पारंब्याच नाहीत.

 



सगरोळीतील महावृक्ष पाहिल्यावर २००५ मध्ये कोलकाता येथील वनस्पती उद्यानात पाहिलेला वृक्षराज आठवला. सुमारे २५० वर्ष आयष्य असलेला ह्या वृक्षराजाचा परीघ ४५० मीटर आहे. त्याला सुमारे २८८० पारंब्या आहेत. सर्वात उंच शाखा सुमारे 25 मीटर आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वृक्षराजाचे मूळ मुख्य खोड १९२५ सालीच नष्ट झाले. मूळ स्थापक खोड नसले तरी आजही हा वृक्षराज विस्तारत आहेत. त्याची प्रत्येक पारंबी जोपासून जमिनीपर्यंत पोचेल अशी काळजी घेतली जाते.

  

अनेक संस्थाचे आणि संघटनांचे काम वटवृक्षासारखे विस्तीर्ण असते पण त्याला पारंब्याच नसतात. कालानुरूप नेतृत्व करणाऱ्या संस्थापक खोडाचे आयुष्य पूर्णत्वाकडे निघाल्यावर महावृक्ष वठत जातो किंवा वादळात हे वृक्ष उन्मळून पडतात.

काही वडाच्या झाडांना पारंब्या असतात पण त्या कधीच जमिनीपर्यंत पोचत नाहीत वा पोचून दिल्या जात नाहीत.

नांदुरकीसारखे काही वृक्ष दर्शनी वडासारखे असतात ते आकाराने मोठे असतात पण त्यांच्या पारंब्या मुळातच खुरट्याच असतात त्यामुळे ते डेरेदार असले तरी महावृक्ष होऊ शकत नाहीत.

पिंपळ, औदुंबर, आंबा यासारखे देववृक्ष विस्तीर्ण डेरेदार महावृक्ष असतात पण ते चिरायू नसतात. त्यांच्या आयुष्यात हे वृक्ष अनेकांसाठी आधारवट ठरतात.

कोलकाता येथील वनस्पती उद्यानातील वृक्षराज वटवृक्षासारख्या अनेक संघटना भारतभर पसरल्या आहेत. अशा महावृक्षाच्या पारंब्या त्या संघटनेला अक्षयवट बनवतात.

प्रशांत दिवेकर

ज्ञान प्रबोधिनी, पुणे

कृपया ब्लॉग शेअर करताना ब्लॉगची लिंक अग्रेषित करावी म्हणजे वाचक त्यांचे प्रतिसाद थेट लेखकापर्यंत पोचवू शकतील. 



Comments

  1. अक्षयवड , आधरवड ..छान मांडणी

    ReplyDelete
  2. सर ,खूप छान वर्णन केले आहे तुम्ही ,असाच एक महाकाय वटवृक्ष संगमनेर नजीक पेमगिरी जवळ आहे.यातून आणखी 1 बोध होतो.खरी संघटना तीच ज्यात पारंब्या व खोड यात फरक सापडत नाही.

    ReplyDelete
  3. छान, सोप्या पध्दतीने समजावलेला विषय

    ReplyDelete
  4. खूप छान मांडणी!👌👍

    ReplyDelete
  5. खूप सुंदर वर्णन केलात सर

    ReplyDelete
  6. फारच छान मांडणी.... संकल्पना पण पटली आणि भावली.

    ReplyDelete
  7. खूप छान मांडणी👌

    ReplyDelete
  8. खूप छान मांडणी.. नेतृत्वाचा प्रवास आधारवड ते अक्षयवड व्हायला हवा... 🙏

    ReplyDelete
  9. खूपच छान मांडणी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती                       जुलै महिन्यात झारखंडला जमशेदपूर जवळ घाटशिला गावी शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. पूर्वीसिंघभूम जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्री श्री विदया मंदिर नावाने संथाळ आदिवासी भागात या शाळा चालवल्या जातात. टाटानगर पासून  ३-४ तासाच्या अंतरावर असून देखील विकास नाही. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात या शाळा स्वयंसेवी वृत्तीने चालवल्या जातात. शाळेला सरकारी अनुदान  नाही तरीही  मोफत शिक्षण आणि मोफत पोषक आहार दिला जातो . शाळेत कुपोषित विद्यार्थी नाहीत  आणि जवळपासच्या सरकारी शाळांचा विचार करता श्री श्री विदया मंदिर शाळेत शैक्षणिक गळती ० %. हे गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नातून सध्या झाले आहे. आता या शाळा माध्यमिक टप्प्यापर्यंत पोचल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणाबरोबर तंत्र शिक्षण देऊन गावात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हे शाळेचे पुढचे उद्दिष्ट आहे. ज्ञान प्रबोधिनी त्यांच्या या प्रयत्नात शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करते आहे.     ...

पाठ्यपुस्तक लेखनाची पायाभूत तत्त्वे — भारतीय ज्ञानपरंपरेतील मार्गदर्शक सिद्धांत

  पाठ्यपुस्तक लेखनाची पायाभूत तत्त्वे — भारतीय ज्ञानपरंपरे तील मार्गदर्शक सिद्धांत अनुबन्ध चतुष्टय — ग्रंथलेखनाची चार पायाभूत तत्त्वे गेल्या आठवड्यात एका शिबिरासाठी सज्जनगड येथे जाण्याचा योग आला.   श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या कार्य आणि साधनेशी निगडित हे एक पवित्र स्थान आहे. तेथे विद्याव्रत संस्कार या विद्यार्थ्यांच्या संस्कार कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेमार्फत आयोजित अभ्यास शिबिरात   सहभागी झालो होतो. ( विद्याव्रत संस्कार हा ज्ञान प्रबोधिनीद्वारा    विद्यार्थ्यांमध्ये “विद्यार्थीत्वाचे” गुण जागवण्यासाठी केला जाणारा शैक्षणिक संस्कार आहे. व्यक्ति विकासाच्या आयामांचा परिचय करून घेणे व विद्यार्थी जीवन काळात व्यक्तिमत्त्व विकसनासाठी आवश्यक अशा व्रतांचा परिचय करून घेवून   विद्या अध्ययनचा संकल्प करणे हे या शैक्षणिक संस्काराचे सूत्र आहे.   ) सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. सकाळच्या काकड्यापासून शेज आरतीपर्यंत एक निश्चित दिनक्रम तेथे आचाराला जातो. या दैनंदिन कार्यक्रमात प्रार्थना , अभिषेक–पूजन , महाप्रसाद , भजन आण...

सत्यं च स्वाध्यायप्रवचने च।

  सत्यं च स्वाध्यायप्रवचने च। प्रकृति के सानिध्य में रहकर उसके साथ एकत्व का अनुभव करना , स्वाध्याय का प्रथम सूत्र है , जो हमें ब्रह्मांड के निर्माण और उसके रहस्यों को जानने की प्रेरणा देता है। जड़-चेतन धारणाओं से जुड़ी मूलकण , वंशसूत्र , गुणसूत्र जैसी सूक्ष्मतम चीज़ों के अध्ययन से लेकर ब्रह्मांड के विस्तार के अध्ययन तक का व्यापक आयाम हमें प्रकृति के गहनतम रहस्यों में प्रवेश करने का मार्ग प्रदान करता हैं। ब्रह्मांड के विशाल विस्तार और उसकी अनंतता को समझने का प्रयास करने के लिए पहला उपनिषदिक अध्ययन सूत्र है "ऋतं च स्वाध्याय प्रवचने च।" ऋतम् का अध्ययन ब्रह्मांड के नियमों और संरचनात्मक सिद्धांतों को समझने की कुंजी है। ऋतम् का अध्ययन   केवल दार्शनिक धारणा नहीं है , बल्कि यह ब्रह्मांड की रचना और उसके संचालन में निहित नियमों को   वैज्ञानिक दृष्टिकोणद्वारा गहराई से समझना है। यह हमें   सिखाता है कि ब्रह्मांड किस प्रकार संतुलित और सुव्यवस्थित रूप से कार्य करता है। ऋतम् का स्वाध्याय करते समय हम अपने परिवेश को गहराई से समझने लगते हैं। प्रकृति के रहस्यों की खोज और उन...