Skip to main content

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती


                      जुलै महिन्यात झारखंडला जमशेदपूर जवळ घाटशिला गावी शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. पूर्वीसिंघभूम जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्री श्री विदया मंदिर नावाने संथाळ आदिवासी भागात या शाळा चालवल्या जातात. टाटानगर पासून  ३-४ तासाच्या अंतरावर असून देखील विकास नाही. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात या शाळा स्वयंसेवी वृत्तीने चालवल्या जातात. शाळेला सरकारी अनुदान  नाही तरीही  मोफत शिक्षण आणि मोफत पोषक आहार दिला जातो . शाळेत कुपोषित विद्यार्थी नाहीत  आणि जवळपासच्या सरकारी शाळांचा विचार करता श्री श्री विदया मंदिर शाळेत शैक्षणिक गळती ० %. हे गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नातून सध्या झाले आहे. आता या शाळा माध्यमिक टप्प्यापर्यंत पोचल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणाबरोबर तंत्र शिक्षण देऊन गावात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हे शाळेचे पुढचे उद्दिष्ट आहे. ज्ञान प्रबोधिनी त्यांच्या या प्रयत्नात शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करते आहे.

                 प्रशिक्षणादरम्यान शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांबद्दल  आणि अनुभवांबद्दल चर्चा घेत होतो. शाळेचे वैशिष्ट्य म्हणून त्यांनी आमच्या शाळेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी नाहीत. शाळेची सफाई आणि देखभाल विद्यार्थी-अध्यापक-कार्यकर्ते मिळून करतात असे सांगीतले. विद्यार्थ्यांच्यात  शाळेबद्दल आपलेपणा वाढावा  आणि श्रम संस्कार रुजावा म्हणून हि रचना विकसित केल्याचे त्यांनी सांगीतले. चार  दिवस मी रोज सकाळी शाळा भरताना आणि सुटताना पाहत होतो ....विद्यार्थी त्यांना दिलेला नियोजित भाग साफ करत होते शिवाय शाळेची पारस बाग , बागीच्या व शाळेचे आवर स्वतःहून स्वच्छ ठेवत होते. शिबिरासाठी आलेल्या अध्यापकांच्या जेवणानंतर सफाई करता होत.

                 आपण काय करतो ?
याचा मी दोन मुद्यांवर विचार करत होतो,  पहिला आपला शालेय स्वच्छतेतील सहभाग असतो आणि शाळेत कोणत्या गोष्टी आपण नियमित जाणीवपूर्वक करतो .

               आपले काम करताना आपण अस्वच्छता करतो आहोत याचे बरेचदा आपल्याला भानच नसते , सहज पेन्सील वा पेनाने बेंचवर गणित सोडवतो वा नोंदी करतो , कागद बेंचखाली टाकतो. सहज केलेल्या कृतीतून शालेय सौदर्य ; स्वच्छता बिघडते आहे याची जाणीव आपल्याला नसते. काहींच्या हातून तर जाणीवपूर्वक मोडतोड होते .वर्गात आल्यावर सहज पंखे सुरु केले जातात पण त्याच सहजतेने ते वर्गाबाहेर जाताना बंद केले जात नाहीत. अशा सध्या सध्या गोष्टीतून शाळा किती आपली आहे हे प्रतीत होत असते.

                      अजून एक असा प्रसंग आठवतो . १९९९ साली मी , पोंक्षेसर, प्रियव्रतदादा, अजेयदादा असममधील हाफलॉंग गावातील निवासी शाळा पाहण्यासाठी गेलो होतो . आमचा मुक्काम शाळेच्या आवारातील छात्रवासात होता. आम्ही गाडीतून उतरून तिथल्या प्रमुखांना भेटण्यासाठी गेलो , त्यांचाशी बोलून आम्ही आल्याचे त्यांना सांगेपर्यंत छात्रावासातील विद्यार्थ्यानी आमचे सामान गाडीतून उतरवले होते , १५ -२० मिनिटात त्यांनी मच्छरदाणीसह निवासाची व्यवस्था  केली. रात्री विद्यार्थ्यांबरोबर जेवणासाठी पंगतीत बसलो.  भोजन चालू असताना वीज गेली , ४०-५० विद्यार्थी भोजनगृहात असून देखील आरडाओरडा झाला नाही कि कोणी किंचाळले नाही. ज्या विद्यार्थांकडे मेणबत्ती आणि पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी होती फक्त त्यांनीच जागा सोडली आणि  मेणबत्या लावल्या. रात्री आम्ही या प्रसंगाबद्दल आश्चर्य व्यक्त करत आणि आपले विद्यार्थी वीज गेल्यावर कसे वागले असते यावर चर्चा करत झोपी गेलो. सकाळी याबद्दल तिथल्या अध्यापाकांशी आणि कार्यकर्त्यांशी बोललो तेव्हा शाळेतील सर्व कामे छात्रावासातील विद्यार्थी करतात अगदी स्वच्छतेपासून .....स्वयंपाकापर्यंत असे कळले. स्वयंपाक घरात रोज सकाळ संध्याकाळ विद्यार्थी अर्धातास काम करतात . विद्यार्थ्यांच्या वयानुसार धान्य निवडणे , भाजी चिरणे ,पदार्थ चुलीवर शिजवणे अशी कामे वाटून दिली होती .शाळेच्या सर्व कामात विद्यार्थ्यांचा सहभाग होता .विद्यार्थी आणि अध्यापाकांशी याबद्दल बोललो तेव्हा असे काम करण्यातून शाळेबद्दल निर्माण झालेला आपलेपणा , शाळेतील रचना माझ्यासाठी आहेत , त्या स्वच्छ राखणे आणि नीट ठेवणे हि आमची जबाबदारी आहे असे भान त्यांच्यात  निर्माण झाल्याचे  जाणवले.

                     कामात सहभाग आणि कामातील नियमितता या दोन गोष्टी वरील शाळांतील  विद्यार्थांच्या वृत्ती घडणीत महत्वाच्या  आहेत असे जाणवले .

                        झारखंड वरून परत आल्यावर या दोन प्रसंगावर विचार करत होतो आणि संदर्भ म्हणून विनोबांचे साहित्य चाळत होतो कारण विनोबांनी शिक्षणाची व्यापक भूमिका मंडली आहे  आणि श्रम संस्कारावर बरेच प्रयोग केले आहेत.
                विद्यार्थाचे दोन गोष्टीसाठी शिक्षण व्हावे असे विनोबा म्हणतात पहिली म्हणजे विद्या आणि दुसरी व्रत. विनोबांनी यासाठी ‘ विद्यास्नातक ’ आणि ‘ व्रतस्नातक ’ हे शब्द वापरले आहेत.

                      प्रबोधिनीत आपण विद्यास्नातक होण्यासाठी विषयाध्यन करतो , प्रकल्प करतो , एखाद्या विषयाचा  अभ्यास करून प्रार्थनेच्या वेळी भाषण करतो , विद्या कशी ग्रहण करायची यासाठी स्वयं अध्ययन कौशल्ये आणि अभ्यास तंत्रे शिकतो , व्यक्तिमत्व  विकसनासाठी विविध शिबिरातून गट कार्ये शिकतो , दलावर वेगवेगळे खेळ खेळतो , राखी विक्री करतो ,दिवाळीत फराळ  विकतो , गड किल्ल्यांवर साहस सहलींना जातो अशा अनेकविध गोष्टीतून आपण विद्यास्नातक होण्यासाठीची कौशल्ये आणि पात्रता सध्या करतो.

                     व्रतस्नातक होण्यासाठी आपण काय करतो , वर्षारंभी संकल्प करतो. वैयक्तिक संकल्प करतो तसेच सामूहिक वर्गशः संकल्प करतो . वर्षान्ताला संकल्पातील  किती साध्य झाले; किती नाही, का साध्य झाले का नाही जमले याबद्दल विचार करतो . सहा वर्ष ‘ ठरवायचे आणि प्रयत्न करायचा आणि किती जमले त्याचा आढावा घ्यायचा ’  ही सवय थोडीतरी अंगी मुरते . ही कृती म्हणजे व्रतस्नातक होण्यासाठीचे शिक्षण. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी नियमबद्ध होणे म्हणजे व्रत घेणे.

आपण विद्याव्रत घेतो म्हणजे आपण ‘ विद्यास्नातक ’ आणि ‘ व्रतस्नातक ’ होण्याचे ठरवतो.

                प्रबोधिनीत विद्याव्रताच्यावेळी आपण   विदया  म्हणजे काय ? विद्या कशी मिळवायची ? प्राप्त ज्ञानाचा वापर कसा आणि कशासाठी करायचा याचे अध्यायन करण्यास सुरुवात करतो म्हणजे आपण विद्यार्थी होतो .

                         उत्तम माणूस होण्यासाठी स्वतःला ओळखणे , स्वतः मध्ये बदल घडवण्यासाठी निश्चयपूर्वक प्रयत्न करण्यास सुरुवात करणे म्हणजे आपण व्रतार्थी होणे .

 विद्यार्थी आणि व्रतार्थी होणे म्हणजे विद्याव्रती होणे. 

                    श्री श्री विदया मंदिर आणि हाफलॉंग छात्रावासातील विद्यार्थी एखादे काम उत्तम कसे करायचे हे शिकली म्हणजे विद्यार्थी होण्याचा त्यांनी प्रयत्न केला . शाळेतील कामे नियमित करणे ,  शालेय स्वच्छता आणि सौंदर्य माझी जबाबदारी आहे अशी भावना  या नियमित कृतीतून निर्माण होणे म्हणजे त्यांनी व्रतार्थी होण्याचा प्रयत्न करणे होय.

                    आपण प्रबोधिनीत शिक्षण घेत असताना  ‘ विद्यार्थी + व्रतार्थी  = विद्याव्रती ’ होण्यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न केल्यास आपणास ‘ विद्यास्नातक ’आणि ‘व्रतस्नातक ’ होणे शक्य आहे. 

                    उपासना म्हणजे ‘ विद्यास्नातक ’ आणि ‘ व्रतस्नातक ’ होण्यासाठी स्वतःकडे पाहण्याचे साधन आहे. पुढील आठवड्यात चिंतनाच्या वेळी विद्यार्थी आणि व्रतार्थी म्हणून मी कसा आहे , कसे असायला हवे यावर विचार करा असे सुचवतो.

( प्रशांत दिवेकर . १८ ऑगस्ट २०१२ ,ज्ञान प्रबोधिनी , सोलापूर उपासानेनंतरचे प्रगट चिंतन )

Comments

Popular posts from this blog

Talk on Bhartiya Heritage of Educational Practices @ International Conference on Interpreting Cultures and Traditions: Shifting the Lenses

                                                    Talk on Indian Knowledge System : Bhartiya Heritage of Educational Practices   & Relevance in Contemporary Society   @ International Conference on Interpreting Cultures and Traditions:   Shifting the Lenses RIWATCH, Arunachal Pradesh   19-21 December 2025 I feel honoured to speak today as a plenary speaker at this international conference, Interpreting Cultures and Traditions – Shifting the Lenses, on Indian Knowledge Systems, especially traditional modes of knowledge transmission and their relevance in contemporary society. This session on Bharatiya Heritage of Educational Practices is being organised here at the RIWATCH campus. Standing at this podium today, I can recall the journey of RIWATCH—how it has grown ste...

सत्यं च स्वाध्यायप्रवचने च।

  सत्यं च स्वाध्यायप्रवचने च। प्रकृति के सानिध्य में रहकर उसके साथ एकत्व का अनुभव करना , स्वाध्याय का प्रथम सूत्र है , जो हमें ब्रह्मांड के निर्माण और उसके रहस्यों को जानने की प्रेरणा देता है। जड़-चेतन धारणाओं से जुड़ी मूलकण , वंशसूत्र , गुणसूत्र जैसी सूक्ष्मतम चीज़ों के अध्ययन से लेकर ब्रह्मांड के विस्तार के अध्ययन तक का व्यापक आयाम हमें प्रकृति के गहनतम रहस्यों में प्रवेश करने का मार्ग प्रदान करता हैं। ब्रह्मांड के विशाल विस्तार और उसकी अनंतता को समझने का प्रयास करने के लिए पहला उपनिषदिक अध्ययन सूत्र है "ऋतं च स्वाध्याय प्रवचने च।" ऋतम् का अध्ययन ब्रह्मांड के नियमों और संरचनात्मक सिद्धांतों को समझने की कुंजी है। ऋतम् का अध्ययन   केवल दार्शनिक धारणा नहीं है , बल्कि यह ब्रह्मांड की रचना और उसके संचालन में निहित नियमों को   वैज्ञानिक दृष्टिकोणद्वारा गहराई से समझना है। यह हमें   सिखाता है कि ब्रह्मांड किस प्रकार संतुलित और सुव्यवस्थित रूप से कार्य करता है। ऋतम् का स्वाध्याय करते समय हम अपने परिवेश को गहराई से समझने लगते हैं। प्रकृति के रहस्यों की खोज और उन...

महाराष्ट्रधर्म

                                                                                       महाराष्ट्रधर्म १९९९ साली महिनाभराच्या ईशान्य भारत दौऱ्यात गुवाहाटी येथे केशवधाम कार्यालयात पूर्वांचलातील कामांचा परिचय करून घेण्यासाठी गेलो होतो. ज्यांना भेटायचे होते त्यांची वाट पाहत कार्यालयात बसलो होतो. एक आजोबा कार्यालयात डोकावले. बाहेरचे पाहुणे आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी , “ कुठून आलात ? किती दिवस प्रवास आहे ? काय काय पाहिले ?” अशी चौकशी केली. महाराष्ट्रातून आलो आहोत हे कळल्यावर त्यांनी आम्हाला विचारले , “ तुम्ही रायगडावर जाऊन आला आहात का ?” आम्ही “हो , रायगड पाहिला आहे ,” असे सांगितल्यावर त्या आजोबांनी एकदम आम्हाला साष्टांग नमस्कार केला. आम्ही गोंधळलो. “काय झाले ?” म्हणून त्यांना   विचारले. मग आमच्या शेजारी बसत फालूदा   म्...