आज ब्रह्मपुत्रावरून चालत गेलो .........
धौला ते सदिया जाण्यासाठी ब्रह्मपुत्रा ओलांडावी लागते. गेल्या वर्षीपर्यंत हा प्रवास करायचा असेल तर बसने घाटापर्यंत यायचे बोटीत बसायचे ( आपल्या गाडी , बस , ट्रक सकट ) दोन तास प्रवास करून नदी ओलांडायची आणि सर्व समानासह ( आपल्या गाडी , बस , ट्रक सकट ) उतरून पुढचा प्रवास करायचा.
गेल्या वर्षी धौला ते सदिया जाण्यासाठी ब्रह्मपुत्रा नदीवर पूल बांधून पूर्ण झाला. पुलाची लांबी 9.25 किलो मीटर आहे. आज चालत हा पूल पार केला .दोन तास लागले. विवेकानंद केंद्र विद्यालय अरुणाचल प्रदेशचे एज्युकेशन ऑफिसर उन्नीकृष्णन बरोबर होते.
उन्नीकृष्णन सरांना अरुणाचला येऊन जूनमध्ये 25 वर्ष झाली. त्यांच्या बरोबर दोन तासाच्या पदयात्रेत त्यांचे विवेकानंद केंद्राच्या शाळेतील , पहाडातील प्रवासाचे अनुभव ऐकण्यात विवेकानंद केंद्र कार्यकर्त्यांनी राष्ट्र निर्माणासाठी उभ्या केल्या मनुष्य निर्माणाच्या प्रयोगाचे दर्शन झाले. तिरुपती दर्शन अंबाबाई दर्शनशिवाय पूर्ण होत नाही असा संकेत आहे. कन्याकुमारीच्या स्वामी विवेकानंद शिलास्मारकाची दर्शन यात्रा या कार्यदर्शनाशिवाय पूर्ण होणे नाही .
प्रशांत दिवेकर
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
५ जुलै २०१८

Comments
Post a Comment