Skip to main content

आमची ईशान्य यात्रा

आमची ईशान्य यात्रा : प्रतिमा ,प्राची , वैशाली ( सई )

२३ - ३०  सप्टेंबर २०१८ 

दिवस १

           NE Trip.... बरेच दिवसाची राहिलेली. लग्न झाल्यापासून प्रशांत बरेच वेळा गेला, पण माझा काही योग आला नाही. आता ब्रह्मपुत्रा नदीवर पूल झाला म्हणजे बोटीतून प्रवास करायचा अनुभव परत मिळेल का नाही असा विचार येउन या वर्षी जायचे ठरवलेच. सप्टेंबर महिन्यात जायचे ठरले.  पण साकार ची परीक्षा आहे असे कळल्याने रद्द होणार होते.  पण प्रशांत च्या force मुळे जायचे ठरले. घरच्यांना सोडून एकटे जाणे पचनी पडायला जरा वेळ लागला, पण हो नाही करता करता जायचे ठरलं. मी, वैशाली आणी प्राची तिघीच जणी.  झाले 23 सप्टेंबर तारीख ठरली, booking झाले, व आम्ही तिघी निघालो. प्रशांतचे planning साठी 10 वेळा तरी लोकांना फोन झाले. आमची सर्व सोय घरी बसून झाली.  Pune airport वरून सकाळी 7.30 ला निघालो.  एकटे जाणे काहीतरी वेगळेच वाटत होते.  विमानात गप्पा मारता मारता दिल्ली आले सुद्धा, विमानातून उतरलो आणी चालायला लागलो,  पण नेहमीच्या सवयीने आपण एकटेच पुढे आलो वाटून, नकळत मागे पाहिले.  

          जेवायला उशीर होईल म्हणून खायचे ठरले, कधीनव्हतच menu card च्या उजव्या बाजूचा विचार न करता airport वर खाल्ले.  लगेचच पुढचे दिब्रुगड विमानाचे boarding सुरु झाले.  विमानतळावर एक बाई भेटल्या, फक्त तिघी चालल्याचे ऐकून त्यांनाही खूप आनंद झाला. 

         दिल्लीला थोडा पाऊस होता, विमानाने take off केल्यावर ढगातून जात होतो,  परिकथेतल्या गोष्टीची आठवण झाली.  विमान जरा स्थिरावल्यावर बर्फाचा डोंगरा वरून गेल्या सारखे वाटत होते.  

         भूगोल तज्ञांच्या सांगण्या वरून पुण्यातच डाव्या बाजूच्या सीट बदलून घेतल्या होत्या.  आता आम्ही हिमालय कसा दिसतो याची वाट पाहत होतो.  हवाईसुंदरी चा आवाज आला, हवामान खराब आहे पुन्हा seat belt बांधा. विमान थोडेसे हेलकावे घेउ लागले. आणि थोड्या वेळातच ब्रह्मपुत्रा दिसायला लागली. हिमालय दिसलाच नाही, better luck next time म्हणून आम्ही खाली उतरलो.

          दारात कार दिमतीला उभीच होती. मग आम्ही vkv च्या शाळेत पोचलो. रवी व पूर्वा सावदेकर भेटले. दोन जुळ्या मुलांना घेऊन कसे राहतात हे जाण न्याची उच्चुकता होती.   आता चार तास प्रवास करून Jorhat पोचलो.  VKV शेजारी बिना पानी गोगाई दत्त यांच्या घरी राहिलो. 

पहिला दिवस
23 Sept 18

दिवस २  

                 VKV आलेली माणसे म्हणजे विश्वासू च  असावीत, बिना दीदींनी बंगल्याचा दुसरा मजला आम्हाला देऊन टाकला.   बिना पाणी दिदी च्या घरी आवरून निघालो प्रथेप्रमाणे गामछा देऊन आमची बोळवण केली. गा म्हणजे शरीर मछा म्हणजे पुसणे. 

            माजुलीला जाण्यासाठी ब्रह्मपुत्रा तीरावर आलो,  माजुली हे  जवळपास 2 लाख लोकवस्तीचे बेट आहे. बऱ्याच लांब पर्यंत पाणीच पाणी दिसत होते,  पाण्याला बराच वेग आहे हे जाणवत होते. बोटीत बरीच गर्दी होती, त्यामुळे मोठया पात्राची फारशी कल्पना आली नाही कारण जास्त काही दिसत नव्हते.  Daily up down करणारे लोक होते व सोमवारी जास्त असतात.  

          माजुलीला उतरल्यावर सुद्धा गाडी तयार होती.  तिराजवळील सर्व घरे ही जमिनीपासून 5 ते 6 फूट उंच, बांबूची बांधलेली आहेत. पाण्यापासून  व खाली असलेली दलदल  पासून संरक्षण असा हेतू.
Kamala bari चौकात आलो
Kamala means orange, Bari means vadi. नंतर पुन्हा VKV शाळेत,
ATL Lab म्हणजे स्वच्छंदी पणे मुलांना त्यांचे कल्पना विश्व व science यांची सांगड.
Activity based learning हा 1 व 2 री च्या मुलांसाठी चा चांगला उपक्रम आहे.
माजुली आता district place आहे. शंकरदेव यांनी 32 सत्र  स्थापन केली.
Samaguri satra , हे गृहस्थ सत्र आहे. कृष्णाची रासलीला हा इथला मोठा सण आहे. दशावतार नाटक म्हणजे भावना, त्यासाठी लागणारे मुखवटे हि जमात बांबू पासून बनवते.  त्यावर कुंभार माती, व रंग देऊन मुखवटा बनवतात. बनवताना बांबू हळद कडुलिंब च्या पाण्यानं बुडावतात म्हणजे मुखवटा जास्त काळ टिकतो.  घराबाहेर नामघर असते त्यांत भगवत गीता पाठ होतात. हे लोक मूर्ती पूजा करत नाही. नंतर
2            गृहस्थ सत्र
3 अवनियाती सत्र auniati , हे ब्रह्मचर्य सत्र आहे. ओहम राजा ने दिलेल्या अनेक मौल्यवान वस्तू येथे आहेत. 400 वर्ष जुने, उदासीन ,
गरमुर सत्र आहे.  येथे मूर्ती पूजा होते. कृष्णाच्या वेगवेगळ्या रूपातील मूर्ती आहेत.

माजुलीत कोकण च्या काही गोष्टी शी साधर्म्य जाणवते. एकूण समाजात respect जास्त जाणवतो, मुखवटे पाहताना घरातील एक महिला चहा घेऊन आली, जमीन हाताने पुसून त्यावर चहा ठेवला व पाठ न दाखवत मागे सरकत गेली, गोष्ट छोटी होती पण मान दिलेला जाणवत होता. घरातील मुलांशी सुद्धा खूप खालच्या स्वरात बोलतात. 

पावसाने सर्व ठिकाणी दलदल दिसते. पुण्यात राहिल्याने जमीन वाया गेल्या सारखे वाटते. गाई साठी सुद्धा मच्छरदाणी बांधतात.  वर्षतून 2 वेळा भात पीक घेतात, एकूणच खूप छान भाग आहे, हिरव्या रंगाच्या सुद्धा अनेक छटा दिसतात. बांबूचा प्रामुख्याने उपयोग केलेला दिसतो. 

24 sept 18



 दिवस ३ 


         सकाळी जाग आली, पाहिले तर फक्त 5 वाजले होते तरी  उजाडले होते. सकाळी एका घरी चहा व नाश्ता केला, व परत निघालो. 

आज ब्रह्मपुत्रा नदी बघयाचीच होती. बोटीच्या टपावर जाऊन उभे राहिलो. बोट सुरु होऊन पुढे गेल्यावर लांब पर्यंत पाणी दिसत होते. आता नदीच्या पत्राचा अंदाज आला. नदी पार करायला दिड तास लागला. 

             दिब्रुगड कडे जाताना वाटेत ढेकीया कुआ नावाचे सत्र आहे. माधव देव, शंकरदेव यांचे शिष्य यांनी 1450 साली ते सुरु केले. एक  कथा सांगितली जाते कीं, लोक पूजा पाठ करत असताना एक आजी आजोबा आले. ते नंतर तेथेच राहिले, सत्राधिकारांनी आजीला ढेकिया नावाची भाजी व आजोबांना दिहा नदी दिली या सत्रात सतत 520 वर्ष दिवा चालू आहे. ओहम राज्याच्या राजवटीचा हा काळ आहे. त्याने 600 वर्ष राज्य केले होते. 

        शिवसागर हे ओहम राज्याचे दारू गोळा ठेवण्याचे ठिकाण आहे. दारुगोळा ठेवण्याच्या दोन जागांमध्ये भुयारी मार्ग आहे.  एक रंगघर आहे , त्यातून ओहम राजा जनावरांच्या झुन्झी पाहत असे. त्याच भागात शिव मंदिर आहे, शिव लिंग वर नसून दोन फूट खोल खड्डयात आहे. बाजूला देवी व विष्णु ची सुद्धा देवळे आहेत, व मागे मोठा तलाव आहे. म्हणून या भागाला शिवसागर असे नाव पडले.  थोड्या अंतरावर ओहम राज्याच्या वस्तू चे एक प्रदर्शन आहे. 

दिब्रुगड जेवण व तिनसुखिया VKV मुक्काम.
25 Sept 18

 दिवस ४ 


सकाळी लवकऱ 5.30 च्या बसने roing  ला निघालो.  रस्ता खूप छान आहे. आता अरुणाचल प्रदेशात निघालो, परत नदी पार करावी लागते. नवीन 9 km लांबीचा पूल झाला आहे, म्हणून हे अंतर अडिच तासात पार केले, आधी 5 ते 6 तास लागत होते. 

RIWACH  ( Research Institute of World's Ancient Traditional Cultures and Heritage) हे छोटे पण मोठा हेतू असलेले संग्रहालय आहे. श्री विजय स्वामी यांनी मोठे vision ठेऊन त्याची रचना केली आहे. या प्रदेशातील सर्व जातीच्या लोकांचा इतिहास येथे मिळणार आहे. संग्रलयातील वस्तू या लोकांनीच जमा केल्या आहेत.
Local लोकांची भेट व गप्पा झाल्या. Idu mishmi या येथील जातीचे दैनंदिन जीवन व त्यांची संस्कृती जाणून घेण्याचा थोडा प्रयन्त. जवळील देवपाणी नदीवर जाऊन पाण्यात खेळून आलो.


26 Sept 18


 दिवस ५ 

सकाळी जाग आली, पाहिलं तर फक्त 5 वाजले होते. आपण उठायचे नाही म्हणले तरी body clock बहुतेक आपोआप set होते. 

Roing  पासून 4 तास अंतरावर मायोडिया हे थंड हवेचे ठिकाण आहे. हिमालयाच्या रांगा मध्ये मायोडिया ला जाताना फारच सुंदर सृष्टी सौदर्य दिसते. जाताना आमचं luck चांगले असेल त्यामुळेच आमच्या driver ला एक दुसरा ओळखीचा driver भेटला व आम्हाला एक संत्र्याची बाग बघायला मिळाली.  येथील लोकांना फारच अगत्य असल्याने बागेच्या मालकिणीने स्वतः आम्हाला बाग दाखवली, व येथील idu मिश्मी जातीचे पारंपरिक बांबूचे घर सुद्धा दाखवले.  लेमन टी पिऊन, बरोबर बागेतील पेरू व स्टार फ्रुट घेऊन आम्ही पुढे निघालो.  एकबाजूला उंच डोंगर व दुसऱ्या बाजूला दरी, मध्ये अरुंद रस्ता  मनात थोडी भीती सुद्धा वाटत होती. 


रोइंग मधून निघताना पाऊस असल्याने रस्ता बंद असायची भीती पण होती.  5000 फूट उंच असलेल्या मायोडियाला मस्त थंड हवा , समोर हिरव्यागार डोंगररांगा, धुके असे छान वातावरण होते. वेगवेगळे पक्षी, फुले दिसली. , झाडाचा नैसर्गिक वासच इतका सुंदर होता की artificial अत्तराची गरजच भासणार नाही.  कुणालाही परतायची इच्छाच होणार नाही पण अंधार सुद्धा लवकर होत असल्याने आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. 


27 Sept 18 



 दिवस ६ 



रोइंग- तेजू रस्तावर एक गणपती मंदिर आहे. गोष्ट जरा वेगळीच आहे. Sririti lingi, नावाचा माणूस शेत नांगरणी करत असताना नांगर अडकला, खोदून पहिले तर एक गणेश मूर्ती आढळली. हा माणूस नंतर गणपती भक्त झाला, एक छोटे देऊळ बांधले आहे. पुण्यात येऊन तो स्वतः गणपती पूजा, अथर्वशीर्ष शिकून गेला.  दररोज च्या जेवणात non veg खाणाऱ्या माणसाने ते सोडले, घर सोडले. आता फक्त पुजाच करतो, लोक आता Siriti lingi न म्हणता  ganesh lingi म्हणतात. आम्ही जाताना उकडीचे मोदक करून नेले होते, ते पाहून फारच खुश झाले.
पुढे गेल्यावर कुंडी ल नदी लागली, येथे सुद्धा पुरातत्व खात्याने खोदकाम केले होते. ताम्बरेश्वरी देवीची मूर्ती सापडली होती. पण पुराच्या पाण्याने पुन्हा गाडली गेली, किंवा वाहून गेली. परत सापडली नाही.
कदाचित देवाला जेव्हा यायचे तेव्हाच ते येतात. अनेक वेळा नांगरून फक्त गणेश लिंगीला मूर्ती सापडते, व सापडलेली देवीची मूर्ती परत हरवते. 


एका तळ्यात शिवलिंग सुद्धा असेच सापडले आहे. अभ्यास केला असता ओहम राज्याच्या काळातील या सर्व मूर्ती आहेत.
रुख्मिणी स्वयंवरच्या वेळी कृष्णाने तिला येथून भीष्मक नगर मधून पळवले होते, व मालिनी थान लाच ते पहिले थांबले होते, काही अवशेष सापडतात , अभ्यास चालू आहे. 


तेजूला जाताना एकूण 7 नद्या पार कराव्या लागतात, पूर्वी पोचायला 1 दिवस लागत होता. आता पूल झाल्यामुळे 2 तासात जातो.


तेजु पासून वौलॉन्ग रस्त्यावर लोहित view point आहे. 4000  फूट उंचावरून लोहित नदी  सुंदर दिसते. परशुरामाने वध केल्यावर जटा येथे धुतल्या म्हणून पाणी लाल आहे, अशी आख्यायिका सांगतात.  याच नदीला आणखी 16 नद्या मिळून, ब्रह्मपुत्रा तयार होते.  जाताना हिमालयाचे सौदर्य परत पाहायला मिळते. झाडी खूप दाट आहे, त्यामुळे झाडे सूर्य प्रकाशासाठी उंच वाढतात, बुंध्या कडून उंच व वरच्या बाजूलाच फांद्या आहेत.
VKV ची जवळच Tafrogam येथे डोंगरावर एक मुलीची निवासी शाळा आहे, 1979 साली महाराष्ट्र तील 3 मुलींनी हि शाळा सुरु केली. तेव्हा जंगलात राहून शाळा सुरु करणे धाडसाचं काम आहे. 


Teju - roing return

28 Sept 18

  
दिवस ७ 


Roing to Digboi

  दिगबोई जाताना चहाचे मळे लागतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मळे दिसतात, एक चहाची factory सुद्धा पाहिली.
इंग्रज या रस्त्याने जात असताना हत्तीचे पाय तेलकट झाले. नंतर शोध घेतल्यावर येथे तेलाच्या खाणी सापडल्या. भारतातील पहिली तेलाची खाण येथे आहे. 1867 साली पहिल्यांदा तेल काढले. Dig boy dig वरून digboi नाव पडले असावे. 1927 पर्यंत येथे तेल मिळत होते. येथे एक oil mill संग्रहालय आहे, 1867 ते 2001 पर्यंत चा इतिहास पाहायला मिळतो.






Comments

  1. मस्त वर्णन आणि माहिती ����

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती                       जुलै महिन्यात झारखंडला जमशेदपूर जवळ घाटशिला गावी शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. पूर्वीसिंघभूम जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्री श्री विदया मंदिर नावाने संथाळ आदिवासी भागात या शाळा चालवल्या जातात. टाटानगर पासून  ३-४ तासाच्या अंतरावर असून देखील विकास नाही. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात या शाळा स्वयंसेवी वृत्तीने चालवल्या जातात. शाळेला सरकारी अनुदान  नाही तरीही  मोफत शिक्षण आणि मोफत पोषक आहार दिला जातो . शाळेत कुपोषित विद्यार्थी नाहीत  आणि जवळपासच्या सरकारी शाळांचा विचार करता श्री श्री विदया मंदिर शाळेत शैक्षणिक गळती ० %. हे गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नातून सध्या झाले आहे. आता या शाळा माध्यमिक टप्प्यापर्यंत पोचल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणाबरोबर तंत्र शिक्षण देऊन गावात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हे शाळेचे पुढचे उद्दिष्ट आहे. ज्ञान प्रबोधिनी त्यांच्या या प्रयत्नात शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करते आहे.     ...

सहपुस्तक चाचणी

  सहपुस्तक चाचणी                मार्च महिन्यात शालांत परीक्षा सुरु झाल्यावर वर्तमानपत्रे ; दूरचित्रवाणीवर दहावी , बारावीच्या परीक्षेत चालू असलेल्या कॉपी पुरवठ्याची छायाचित्रे , बातम्या , चित्रफिती दिसू लागतात. माध्यमात चर्चा सुरु होते आणि आपण कशासाठी शिकवतो ? असा प्रश्न पडतो. त्याला प्रतिसाद म्हणून कॉपी मुक्ती अभियान सुरु केले जाते आणि हळूहळू त्याचाच अभिमान वाटायला लागतो. परीक्षा कशासाठी... ? वर्गात शिक्षक पुस्तकातील पाठ वाचून दाखवतात , स्पष्टीकरण म्हणून वाक्य बोलीभाषेत रुपांतर करून मांडतात , पाठाचा सारांश सांगतात. परीक्षेत पाठाखालील सरावासाठी दिलेलेच प्रश्न विचारतात. पाठाखालच्या सरावातील प्रश्नच विचारायचे असतील तर परीक्षा कशासाठी... ?              माझे एक मित्र वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. गप्पा मारताना ते मला म्हणाले , ' अमुक सालानंतर डॉक्टर झालेल्यांकडून उपचार करून घेऊ नका. ' मी विचारले , का ? काय झाले ? म्हणाले - "त्यावर्षी मला पहिल्या...

Reconstructing the Dockyard of Lothal

Activity: Reconstructing the Dockyard of Lothal               Lothal was one of the important cities of the Indus Valley Civilization, known for its remarkable dockyard, one of the earliest in the world. It shows how people of that time planned and built structures with great skill and understanding of their surroundings.               In this activity, you will observe the pictures of the Lothal Dockyard and imagine yourself as a planner responsible for its construction. You will think about the kind of information and decisions needed to build such a dockyard successfully. Through this, you will gain insight about abilities of ancient Indians.   Student Worksheet: Picture Analysis – The Dockyard of Lothal Learning Objective: To explore how ancient Indians combined knowledge from various fields and used researc...