Skip to main content

गुजरात यात्रा : २०१७

गुजराथ ( अहमदाबाद परिसर) 

दि. २२, २३, २४ ऑक्टोबर २०१७

प्रशांत, प्रतिमा, साकार, प्रवीण, प्रथमेश

दिवस १ 

मुंबईच्या वाहतूक कोंडीत वेळेच्या हिंदोळ्यावर...पोचू का पोचणार नाही ...गाडी मिळणार का सुटणार ....कसेबसे पोचलो आणि एकदाची सहलीला सरूवात झाली ।

    भारत वस्त्रोद्योगात औद्योगिक क्रांतीपूर्वी जगावर राज्य करत होता , निर्यातीत भारत का अग्रेसर होता ?, ढाक्याची मलमल जगभर का निर्यात होत होती ? याची झलक पाहण्यासाठी  कँलिको संग्रहालयाला भेट दिली.

           संग्रहालयात कापडावरील कलमकारी, कच्छी , पाटण पटोला , बांधणी, बाटिक यासारखे भरतकाम , कापडाचे विणकाम यांच्या भारतभरातील असंख्य नमुन्याबरोबर चित्रकला ,धातूचे आेतकाम, लाकडावरील कोरीवकाम व पारंपारीक गुजराथ दर्शन होईल अशा वस्तू आहेत.

           गुजराथ, राजस्थामधील मंदिरांमधील पिछवाईवरील कलमकारी रामायणाचा चित्रपट्ट अमरचित्र कथेचा आद्य नमुना होता.

          चित्रकला असो वा वीणकाम कलाकाराची साधना प्रत्येक नमुन्यातून व्यक्त होत होती. एका पट्टावर मध्याक्षावर एक वृक्ष होता . वृक्षाच्या एका बाजूला त्यावृक्षाकडे पाहणार् या गोपिका व गोधन चित्रित केले होते आणि कठून तरी मुरलीची धून कानावर पडते आणि गोपिका ; गोधन दिशा बदलतात. अक्षाची दुसरी बाजू दिशा बदलाची प्रतिमा होती. मध्यवर्ती वृक्षाच्या खाली पडणार् या पुष्पभारामध्ये श्री कृष्ण दर्शन होते .

         बांधणीच्या गाठी मारताना कलाकाराकडे  माध्यमावरील प्रभुत्व, कल्पकता आणि उच्च अभिव्यक्तीसाठीची उत्कट साधना यांची पेड जमून येते तेव्हा कलाकार असे प्रसंग साकारू शकतो. 

         धागा तयार करण्यापासून वस्त्र निर्मितीचा प्रवास एकच असला तरी उद्दिष्टांनुरूप अभिव्यक्ती स्वतंत्र वेगवेगळी होते किंवा कलाकाराच्या मनात अभिव्यक्ती स्पष्ट असेल तर ज्या माध्यमावर प्रभुत्वा असेल त्या माध्यमातून प्रत्येक जण त्याच स्तरावर अभिव्यक्त होऊ शकतो.
      
           कँलिको संग्रहालयात पूर्व नोंदणाीने मर्यादित जणांना प्रवेश दिला जात असला तरी भारतीय वस्त्रनिर्मितीचा इतिहास व संमृद्धीेचे दर्शन घेण्यासाठी नक्कीच भेट द्या.
 
          दिवसभरात वेळ मिळेल तसे काल पाहिलेल्या सरदार स्मारकाबद्दल व साबरती आश्रम भेटाबद्दल लिहिन.



दिवस १ क्रमशः

22 ऑक्टोबर दुपारी शाही बागेतील सरदार पटेल राष्ट्रीय स्मारक पाहिले. दोन वर्षापूर्वी सोमवारी सुट्टीच्या  दिवशी भेट दिली होती तेव्हा शाही बागेचा आनंद घेतला होता ( टाईम पास केला होता ☺)

शहाजहान कालीन मुघल स्थापत्याचा नमुना असलेल्या या वास्तूने अनेक स्थित्यंतरे.पाहिली आहेत. शाही. निवास, कलेक्टर निवास राजभवन आणि आता सरदार पटेल राष्ट्रीय स्मारक ।

महिना 40,000 रुपयांची वकीली करणारे वल्लभभाई खेडा , बारडोली , झेंडा सत्याग्रहात सहभागी होत सरदार कसे बनले , त्यांनी अखंड  भारत कसा निर्माण केला , लोक सहभागातून सोमनाथची कसे उभारले हे. चित्र प्रदर्शन, चित्रपट आधूनिक ३ डी मिडिया द्वारे पहाण्यात 2-२.5 तास गेले आणि थोडे गडबडीत साबरमती आश्रमात पोचलो. चरखा चालवणाऱ्या ताईंना शोधून सूत कताई पाहिली.

गांधी प्रदर्शन , निवास पाहून सायं प्रार्थनेला गांधीजींच्या तीन अनुयायां 🙈🙉🙊सोबत उपस्थित राहिलो.



दुसरा दिवस

                 मेहसाना पांचोट  येथे बाहुचरी माता मंदिर पाहिले, या देवीचे कोंबडा वाहन आहे. गाव देवी वर लोकांची श्रद्धा आहे. एक मजेशीर दंतकथा : पूर्वी मुसलमानी आक्रमणे होत होती तेव्हा एकदा आक्रमकांनी गावातील सर्व कोंबडे फस्त केले. कोंबड्याच एक पिल्लू चुकून वाचले . सकाळी नेहमी प्रमाणे पिलाने बंग दिल्यावर सैनिकांच्या पोटातील कोंबड्यांना बांग दिली. देवीने चमत्कार दाखवला म्हणून आक्रमक देऊळ उद्धवस्त न करता परत गेले . तेव्हा पासून देवीला कोंबडा कापला जात नाही.

     नंतर मोढेरा येथे पुष्पावती नदी किनारी जुने सुर्य मंदिर आहे. जवळपास कर्क व्रुत्तावर हे मंदिर आहे. राजा भीमदेवने 1020मध्ये बांधलेल्या मंदिरातील  सर्व मुर्ती आज भंगलेल्या आणि झिजलेल्या आढळतात. येथे  भौमितिक रचनेतील पायऱ्या असलेले मोठे सुर्य कुंड रेखीव सुंदर आहे.

             पाटण येथील राणी की वाव ही भरपूर पायरीची घडीव  विहीर आहे. कोरीव कामात विष्णुचे प्रभुत्व जाणवते. उतरताना प्रत्येक पायरी वरून विष्णुचे दर्शन होते. इतर अनेक मुर्तीचे कोरीव काम आहे. हि विहीर मातीत पूर्ण गाडली गेली होती. 1958 साली उत्खननात पुरातत्व विभागाने पुनरूजीवीत केली. ही वाव राणी उदयमतीने अकराव्या शतकात बांधली. गुजराथी स्थापत्यात विहीर स्थापत्य विशेष आहे. विहिरीत पण सुंदरता आणता येत याचे अनेक नमुने गुजरातभर पाहायला मिळतात.

       एक नक्की सातारा जवळील लिंबाची विहीर गुजराथी माणसाला नक्की दाखवायला नेऊ नका. गुजरात मधील किरकोळ विहिरी छत्रपतींच्या विहारीपेक्षा उत्तम आहेत.☺

        राणीच्या विहिरी जवळ एक संग्रहालय पाहून पटोला हाऊस पहिले.  पाटण येथे पटोला साड्याचे  विणकर राहतात . पुर्वी 70 घराणी साडी विणायचे काम करायची. आता फक्त एकच घर म्हणजे सोळंकी कुटुंब हे काम करते. 3 माणसे मिळून ५ ते ६ महिन्यात फक्त १ साडी विणून होते. त्याची किंमत अडीच लाख व अधिक असते.
Calico Museum मधे सांगितल्या प्रमाणे हि एक विणकराची एक विशेष कल्पक निर्मिती आहे. उभ्या आडव्या  धाग्यांवर प्रथम नक्षी प्रमाणे रंग देऊन नंतर साडी विणली जाते.

नंतर पंतप्रधान मोदींचे गाव असलेल्या वडनगर येथे सुंदर तोरण कमान आहे ती पाहिली.

              परत येताना गांधीनगर येथील NID (National Institute of Design) Gandhi nagar campus पहाण्याचा योग प आला. 2010 च्या तुकडीची निशिगंधा सध्या डिझाईनचे पदव्युत्तर शिक्षण घेते आहे.  17 एकराच्या परिसरातील या संस्थेत वस्त्र , गाड्या , खेळणी, दैनंदिन वापरातील वस्तूच्या डिझाईन निर्मितीचे अभ्यासक्रम शिकवले जातात.

         निशीशी बोलताना या राष्ट्रीय संस्थेत चार महिन्यातील तुझे शिक्षण काय विचारल्यावर तिने दिलेले उत्तरेतील एक महत्वाचे : काही जण इथे आलो आता शिक्षणाची शेवटची 3 वर्षे  या मूड मध्ये असतात तर काही जणांना आता खऱ्या शिक्षणाची सुरूवात झाली असे वाटते .

          तिला येथे येऊन चार महिनेच झाले असल्याने तुझे काय हा प्रश्न विचारायाचा टाळला. आजून एक वर्षाने नक्की विचारेन. पाहू विद्याव्रती काय उत्तर देते ?

प्रशांत दिवेकर
23 ऑक्टोबर , अहमदाबाद 

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती                       जुलै महिन्यात झारखंडला जमशेदपूर जवळ घाटशिला गावी शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. पूर्वीसिंघभूम जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्री श्री विदया मंदिर नावाने संथाळ आदिवासी भागात या शाळा चालवल्या जातात. टाटानगर पासून  ३-४ तासाच्या अंतरावर असून देखील विकास नाही. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात या शाळा स्वयंसेवी वृत्तीने चालवल्या जातात. शाळेला सरकारी अनुदान  नाही तरीही  मोफत शिक्षण आणि मोफत पोषक आहार दिला जातो . शाळेत कुपोषित विद्यार्थी नाहीत  आणि जवळपासच्या सरकारी शाळांचा विचार करता श्री श्री विदया मंदिर शाळेत शैक्षणिक गळती ० %. हे गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नातून सध्या झाले आहे. आता या शाळा माध्यमिक टप्प्यापर्यंत पोचल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणाबरोबर तंत्र शिक्षण देऊन गावात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हे शाळेचे पुढचे उद्दिष्ट आहे. ज्ञान प्रबोधिनी त्यांच्या या प्रयत्नात शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करते आहे.     ...

सहपुस्तक चाचणी

  सहपुस्तक चाचणी                मार्च महिन्यात शालांत परीक्षा सुरु झाल्यावर वर्तमानपत्रे ; दूरचित्रवाणीवर दहावी , बारावीच्या परीक्षेत चालू असलेल्या कॉपी पुरवठ्याची छायाचित्रे , बातम्या , चित्रफिती दिसू लागतात. माध्यमात चर्चा सुरु होते आणि आपण कशासाठी शिकवतो ? असा प्रश्न पडतो. त्याला प्रतिसाद म्हणून कॉपी मुक्ती अभियान सुरु केले जाते आणि हळूहळू त्याचाच अभिमान वाटायला लागतो. परीक्षा कशासाठी... ? वर्गात शिक्षक पुस्तकातील पाठ वाचून दाखवतात , स्पष्टीकरण म्हणून वाक्य बोलीभाषेत रुपांतर करून मांडतात , पाठाचा सारांश सांगतात. परीक्षेत पाठाखालील सरावासाठी दिलेलेच प्रश्न विचारतात. पाठाखालच्या सरावातील प्रश्नच विचारायचे असतील तर परीक्षा कशासाठी... ?              माझे एक मित्र वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. गप्पा मारताना ते मला म्हणाले , ' अमुक सालानंतर डॉक्टर झालेल्यांकडून उपचार करून घेऊ नका. ' मी विचारले , का ? काय झाले ? म्हणाले - "त्यावर्षी मला पहिल्या...

सत्यं च स्वाध्यायप्रवचने च।

  सत्यं च स्वाध्यायप्रवचने च। प्रकृति के सानिध्य में रहकर उसके साथ एकत्व का अनुभव करना , स्वाध्याय का प्रथम सूत्र है , जो हमें ब्रह्मांड के निर्माण और उसके रहस्यों को जानने की प्रेरणा देता है। जड़-चेतन धारणाओं से जुड़ी मूलकण , वंशसूत्र , गुणसूत्र जैसी सूक्ष्मतम चीज़ों के अध्ययन से लेकर ब्रह्मांड के विस्तार के अध्ययन तक का व्यापक आयाम हमें प्रकृति के गहनतम रहस्यों में प्रवेश करने का मार्ग प्रदान करता हैं। ब्रह्मांड के विशाल विस्तार और उसकी अनंतता को समझने का प्रयास करने के लिए पहला उपनिषदिक अध्ययन सूत्र है "ऋतं च स्वाध्याय प्रवचने च।" ऋतम् का अध्ययन ब्रह्मांड के नियमों और संरचनात्मक सिद्धांतों को समझने की कुंजी है। ऋतम् का अध्ययन   केवल दार्शनिक धारणा नहीं है , बल्कि यह ब्रह्मांड की रचना और उसके संचालन में निहित नियमों को   वैज्ञानिक दृष्टिकोणद्वारा गहराई से समझना है। यह हमें   सिखाता है कि ब्रह्मांड किस प्रकार संतुलित और सुव्यवस्थित रूप से कार्य करता है। ऋतम् का स्वाध्याय करते समय हम अपने परिवेश को गहराई से समझने लगते हैं। प्रकृति के रहस्यों की खोज और उन...