Skip to main content

*कन्याकुमारी रोड ट्रिप*



कालावधी : २० मे ते २८ मे २०१७ 
सदस्य : आदित्य, श्रीराम, अवधूत , साकार , प्रशांत

दिवस १ : पुणे - बेळगाव, २० मे

        नवनगर विद्यालय,  ज्ञान प्रबोधिनी, निगडी येथील गुरुकुलाला दोन दशके झाल्या निमित्त गुरुकुलातील विद्यार्थी सायकलने कन्याकुमारीला जाण्याचे ठरले. त्याचे नियोजन करण्यासाठी : पायलट यात्रा. 
        आज संध्याकाळी उशिरा प्रवासाला सुरुवात केली. रात्री बारा वाजता मंगल मावशीकडे मुक्कामी पोचलो. उद्या सकाळी उठून खऱ्या प्रवासाला सुरुवात होईल. अवधूत रात्री पुण्याहून निघाला आहे. पहाटे बेळगावला पोचेल. 


दिवस:२ , २१ मे

         काल संध्याकाळपासून आमच्या या पायलट टूरला सुरुवात झाली, सायकल सहलीची पूर्वतयारी म्हणून निघालोय खरं पण नव्याने दक्षिण भारत एक्सप्लोअर करायची संधी आमच्यापैकी कोणालाच सोडायची नाहीये. काल रात्री बेळगावात मुक्काम झाला. 

            आज पहाटे लवकर अवधूत आम्हाला जॉईन  झाला. आजचा टप्पा बंगळुरू पर्यंतचा होता. तसा अगदी सहज 7 तासात पॊहचलो असतो,पण रस्त्यातल्या मुक्कामाच्या जागा ऐतिहासिक वास्तू बघत रात्री पोहचलो. आजच्या प्रवासात मुख्यतः कित्तूर च्या चन्नम्मा राणीचा राजवाडा बघितला, हरिहर ला हरिहरेश्वराचे साधारण 1000 वर्ष जुने अत्यंत रेखीव कोरीव काम केलेले मंदिर आज बघायला मिळाले. असाच एक वेगळा अनुभव चित्रदुर्गाला चालुक्य व होयसळ राजवटीने बांधलेला जुना भव्य किल्ला बघितला... प्रदेश बदलत गेलो तरी इतिहास आपली भारतीयत्वाची भावना कायम जागवत असतो, हा अनुभव यावेळी देखील आला.

'अतिथी देवो भवं' चा प्रत्यय आज एका मठात अचानक दिलेल्या भेटीत आला. प्रसादाची वेळ संपली असताना देखील, भाषेची अडचण असूनसुद्धा तेथील सेवकांनी आम्हाला प्रसादाचा आग्रह केला आणि आमची दुपारच्या जेवणाची अडचण अगदी सहज दूर झाली.

आजचा बंगळुरूचा मुक्काम एका दादाच्या घरी झालाय. मस्त आमरस पोळी खाऊन उद्याची तयारी करून आता झोपायला तयार आहोत.
शुभ रात्री!!!

दिवस ३ , २२ मे 

           बेंगलोरच्या रस्ता कोंडीचा  चा चांगलाच अनुभव काल घेतल्याने आज सकाळी लवकरच ६.३० ला निघालो. सोमवार सकाळचं electronic city पर्यंतच traffic आणि पुढे होसूरचं Heavy vehicles च traffic पार करित तमिळनाडूत पोहचलो.

            सायकल सहलीचे बेंगलोर पर्यंतचे टप्पे ठरवणं तस सोप्प होत. कारण बेळगाव पर्यंत मागच्या वर्षी गेलो होतो आणि बेंगलोर पर्यंतची माहीती प्रशांत सरांना होतीच.

          आता जरा जास्त लक्ष देऊन planning करावं लागणार होतं. मुक्कामाची ठिकाणं, मधलं अंतर, घाट, चढ-उतार या सगळ्यांची गणित डोक्यात ठेऊन सगळं planning करत होतो. आजचा टप्पा हा बेंगलोर ते मदुरै चा साधारण ४५० कि.मी. चा म्हणजे सायकल सहलीच्या ४ मुक्कामांचा...

           बेंगलोर वरून निघाल्यावर सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे रस्ता कसा आहे हा? तमिळनाडू सुरू झाल्यावरचा Highway हा बेंगलोर Highway पेक्षा जास्त भारी आहे, या टप्प्यावर cycling ला  मजा येणार आहे हे नक्कीच.

            धर्मापुरीला कामाक्षी देविचे दर्शन घेतले. बाहेरुन साध वाटणारं हे मंदिर आतून फारच सुंदर आहे. इथेच archeological museum बघून पुढे निघालो. 

          आजच्या प्रवासाचा बराचसा भाग हा कावेरी नदिच्या खो-याचा असल्याने हिरवळ टिकून होती. त्यामुळे दुपारचा उन्हाचा प्रवास जरा सुसह्य झाला. कावेरी नदिचे पात्र खूप भव्य/ मोठं आहे. पुढे Thodicombo या गावात अजून १ विष्णूचे प्राचिन मंदिर बघायला मिळाले. 

Finally संध्याकाळी मदुरै ला पोहचलो ते direct , lights n sound show पहायला. अर्धा पाऊण तासाचा show बघून मुक्कामी आलोय.
उद्या सकाळी लवकर उठून मिनाक्षी मंदिरात जाणार आणि पुढे निघाणार
*कन्याकुमारीला* 🙏🏻


( दिवस ३ चे वेगळ्या शब्दात शब्दांकन )
                   मुंबई पुणे ची final match बघून नवीन दिवसाच्या प्रवासाला सुरुवात केली. 

             बंगळुरू शहर, भारतातील प्रगत महागडे शहर, नुसतं फिरताना देखील त्याचा काही अंदाज येत होता.. एखाद्या शहराचा विस्तार कसा होत जातो, त्याचा विकास ही त्याच गतीने कसा होतो याचे बंगळुरू हे उत्तम उदाहरण आहे असे वाटले. आजच्या प्रवासात कर्नाटकातून तामिळनाडू मध्ये प्रवेश केला...

              तामिळनाडूतील रस्ते व आजूबाजूचा भाग कर्नाटकपेक्षा अधिक happenig आहे. अनोळखी भागात जाऊन बंगळुरू नंतरच्या सर्व व्यवस्था बघत बघत  संध्याकाळी मदुराईमध्ये पोहचलो. 

            दक्षिण भारत हा मंदिरांचा प्रांत आहे. रस्ता शोधत असताना अशाच दोन मंदिरांना अचानक भेटी झाल्या. उंच गोपुर,काळ्या कभिन्न दगडात कोरलेल्या मूर्ती बघितल्यावर पहिल्या सेकंदाला भीती नंतर मात्र तिच्या सौंदर्याला आपण श्रद्धेने नतमस्तक होतो.

             मिनाक्षीचे मंदिर बघत असताना, दगडाचे बांधकाम, त्यावरील कोरीवकाम सगळंच मनोवेधक.सर सोबत असल्याने आम्ही ही सगळी मंदिरं अनुभवत आहोत.वेळेचे गणित जुळण्यासाठी रांगेत थांबून दर्शन घेण्याचे टाळले. 

            सहलीतले सर्वजण खाद्यसंस्कृतीवर प्रेम करणारे foodie, tyamule प्रवासात वेगवेगळे स्थानिक पदार्थ-पेय try करायचे हे निश्चित होत. 

            कालच्या पूर्ण प्रवासात तीन वेगवेगळ्या ठिकाणी कॉफी प्यायली आणि तिची चव  अनुक्रमे सरस होत गेली.
          आंब्याच्या ६ नवीन जाती बघितल्या आणि त्यातील *मालपोवा* विशेष चवदार होता...
बाकी कर्नाटक ते तामिळनाडू च्या आत्तापर्यंतच्या साधारण ८००किमी च्या प्रवासात तब्बल १४ टोल लागले आहेत.😓😓

       आता कन्याकुमारी चा शेवटचा टप्पा,रस्त्यातील व्यवस्था बघत पूर्ण करू. बाकी मनानी कन्याकुमारीत कधीच पोहचलो आहे... 🙏🏼🙏🏼
एकूण किमी:१२९०.


दिवस ४ , २३ मे 

             सकाळी लवकर आवरून आम्हि मिनाक्षी मंदिरात गेलो. मंदिर बांधकाम, त्याची वैशिष्ट्ये, त्यामागचा हेतू, मंदिराचे स्थापत्य शास्त्र आणि त्यातील बारकावे या सगळ्याची माहिती प्रशांत सरांनी फार छान सांगितली. मंदिर आणि मंदिराचा परिसर बघून पुढे निघालो कन्याकुमारीला. 

         आजचा टप्पा तसा छोटा होता. मदुरै ते कन्याकुमारी २४० कि.मी. सगळ्या व्यवस्था लावल्या. तिथून निघालो ते थिरुनलवेली येथे Nellaiappar मंदिरातील musical pillars बघायला. मंदिराच्या काही विशिष्ट खांबांवर आघात केल्यावर त्यामधून नाद निर्माण होतो. खांबाच्या रचनेनुसार त्यामधून निघणारा स्वर / आवाजही वेगळा असतो. गोल, चौकोनी, षटकोन, अष्टकोन अशा वेग वेगळ्या आकाराचे खांब येथे आहेत. भारतीय स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमूना म्हणजे हे musical pillars...
थिरुनलवेलीलाच जेवलो. आता ओढ लागली होती ती विवेकानंद शिला स्मारकाच्या दर्शनाची. 

      शेवटच्या टप्प्याचे नियोजन करून दुपारी ३ ला कन्याकुमारीला पोहचलो.

           ४ दिवस १६०० कि.मी. चा प्रवास करून आम्हि आमच्या Dream destination ला पोहचलो होतो. विवेकानंद केंद्रात निवासाची व्यवस्था बघून शिला स्मारकाकडे निघालो.

       "माझ्या देहत्यागा नंतरही जनतेला प्रेरणा देण्याचे काम करित राहीन", असं स्वामिजी म्हणायचे. अनेक मार्गांनी स्वामिजी हे काम करित आहेत, असाच एक न संपणारा उर्जेचा स्त्रोत म्हणजे शिला स्मारक. खरतरं शिला स्मारकाबद्दल काय लिहू हेच कळत नाहीये!!!! हे एक वेगळचं प्रकरण आहे, मला वाटतं प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी  इथे भेट द्यावी. 

      कारण शिला स्मारक ही वाचण्या- एैकण्या पेक्षा स्वत: अनुभवण्याची गोष्ट आहे....🙏🏻

दिवस ५ : २४ मे
 कन्याकुमारी 

दिवस ६ :२५ मे

                काल दिवसभर आमच्या प्रवासाचा वेग हा साधारण ४०-५० किमी. प्रती तास एवढाच होता, रस्ते छोटे, रहदारी अधिक यामुळे कालचा प्रवास थोडा bore  झाला. पण संध्याकाळी निवासाची व्यवस्था छान झाली, Highway पासून ३ किमी आत हे ठिकाण आहे, मन्नारसाला मंदिराच्या lodge वर आम्ही थांबलो होतो. हरिपाद हे गाव कोकणातल्या एखाद्या जून्या गावासारखं आहे. छान नारळाची झाडं , छोटी टुमदार घरं (टुमदार काय असतं माहिती नाही पण सगळे म्हणतात म्हणून मी म्हणलं 😬 ) आणि मुख्य म्हणजे मन्नारसाला मंदिर. प्रशस्त आवार, चारही बाजूंना गर्द झाडी, पारंपारिक वाद्यांसह पूजा असं सगळं मन प्रसन्न करणारं वातावरण होतं. याच गावात सुब्रमन्यम स्वामि मंदिर बघितलं. ही दोनही मंदिरं बघितल्या नंतर फार छान आणि fresh वाटंत होत.

                साधारण ११ वाजता आम्ही Alleppey ला  पोहचलो. Back water, house boats, छोटे island यासाठी Alleppey प्रसिद्ध आहे. एक छान शिकारा book केली आणि ride साठी निघालो. साधारण २ तास फिरलो. विविध पक्षी , बेटांवरील वस्ती, house boats असं सगळं बघुन गुरुवायुर ला निघालो.

             केरळ सुरु झाल्यामुळे Authentic south Indian dishes खायला मिळतायेत, आणि आम्ही भरपूर खातोय. आजच केळीच्या पानात, रस्सम-भात, भरपूर खोबरं टाकून केलेल्या भाज्या, गव्हाची खीर असं छान जेवण मिळालं. याशिवाय घी रोस्ट, पेपर रोस्ट, कॉफी हे आहेच....  पायाच्या operation नंतर वाढलेल वजन आत्ता कुठं कमी होत होतं, आणि  🙈  असो...

       आज आमचा नियोजित मुक्काम कोझीकोडेला होता पण, अपेक्षेप्रमाणे गती राखता येत नसल्याने कोझीकोडेच्या अलिकडे Kottakkal ला मुक्काम टाकलाय.

        हं, आज सकाळी आदित्य दादा आणि श्रीराम हे, केरळी Traditional wear, लुंगी आणि उपरणे घालूनच हरिपाद मधिल मंदिरांच्या दर्शनाला आले होते. (नंतर श्रीराम ने change केला) जेव्हा आम्ही गुरुवायुर ला दर्शनाला गेलो तेव्हा "लुंगी" नसल्याने आम्हाला बाहेरुनच दर्शन घ्यावे लागले, परंतू सकाळ पासून लुंगी आणि उपरणे घालून फिरणा-या आदित्य दादाला, फलस्वरूप म्हणून दर्शनाचा लाभ घेता आला, यालाच
Destiny म्हणतात कदाचित......


दिवस ७ , २६ मे

          Costal Highway सोडून घाटावर चढायच आणि बेंगलोर-पुणे Highway घ्यायचा हे काल रात्रीच fix केलं. सकाळी त्या दिशेने आगेकूच केली.

           थोडं पुढे आल्यावर निलांबर येथिल "teak museum" ची पाटी दिसली, trip unplanned असल्याने अमुक एका ठिकाणी पोहचायचं tension नव्हतं, त्यामुळे museum बघूयात म्हणलं, आणि थांबलो. आमचा हा निर्णय १००% योग्य ठरला. मुळात एक "वृक्ष" Base घेऊन त्यावर museum करणे ही कल्पनाच भन्नाट आहे. Teak म्हणजे सागवान. या झाडाची वाढ कशी होते, त्याचे प्रकार किती, कुठला प्रकार कोठे आढशतो, कोणती मृदा लागते,  झाडामुळे जमिनीतील घटकांवर होणारा परिणाम, लाकडाच उपयोग, वृक्षाचे वय कसे ओळखावे (प्रत्यक्ष खोडावर) आणि  सुमारे ५०० वर्षांपुर्वीच  सगळ्यात जुनं झाड, असं काय काय बघायला मिळाले. Museum सोबत research center पण बघितलं. प्रशांत सर असल्यामुळे झाडाच्या जातीपासून त्याचा code कसा लिहीतात याची सगळी माहिती अगदी सविस्तर मिळाली.

             इथून पुढे आम्हाला ३ अभयारण्यांमधून जाव लागणार होतं. नदिच्या कडे-कडेने, दुतर्फा झाडी अशा रोड वरून पुढचा प्रवास सुरु झाला, मुदुमलाई reserve forest सुरु झाले आणि, येताना लागलेला खंबाटकी घाट , नंतर  साधारण २२०० किमीच driving  झाल्यावर पहिल्यांदा घाट लागला. घाट माथ्यवर अनेक चहाचे मळे होते, ते बघितले आणि पुढे सुरु झाले बंदीपूर अभयारण्य. हे Tiger reserve forest आहे, ब-याच वेळ आम्हाला माकडं सोडून काहीच दिसंत नव्हतं, रस्ता मात्र अप्रतिम होता, त्याचाच आनंद घेत होतो आणि अचानक एका turn वर हरणांचा कळप दिसला. २०-२५ हरणं शांतपणे मार्गक्रमण करित होते. आमची गाडी आपसूकच बाजूला आली होती. पहिल्यांदाच असं काही live बघत होतो. याच कळपाच्या आसपास एक मोरही फिरत होता. भरपूर वेळ ते सगळं बघत थांबलो.

           मैसुर ला पोहचे पर्यंत संध्याकाळ झाली होती. मैसुर बायपास करून श्रीरंगपट्टणम ला गेलो. श्रीरंगपट्टाचे मंदिर बघितले, झोपलेल्या श्रीकृष्णणाची सुरेख मुर्ती इथे आहे. श्रीरंगपट्टणम वरून पुढे निघालो ते पुणे- बेंगलोर Highway च्या दिशेने. Night driving आम्ही शक्यतो टाळतो, पण Highway पोहचलो की थांबायच असं ठरवून रात्री गाडी चालवली. Highway ला लागलो आणि तुफान पाऊस सुरू झाला, २० फुटांवरच काही दिसंत नव्हतं, जवळच "सिरा" ला lodge बघून मुक्कामी थांबलोय. 

     आज पर्यंतच एक विशेष म्हणजे, आत्ता पर्यंतच पुणे-कन्याकुमारी आणि return च असं सगळंच Driving आदित्य दादानेच केलं आहे , उद्या पण करेन🙏🏻...
उद्या रात्री पुण्यात पोहचू असा अंदाज आहे.

दिवस ६ , ७ वेगळ्या  शब्दात शब्दांकन ( २५, २६ मे )
दिवस ६ आणि ७..
पहिल्या चार दिवसांचं जितकं चांगलं planning होत, तितकेच unpalnned हे शेवटचे चार दिवस आहेत...

हरिपादला सकाळी दोन अत्यंत सुंदर अशी श्री मुर्गन(कार्तिकस्वामी,इथे महिलांना प्रवेश आहे.)व नागदेवतेचे  केरळी मंदिर बघितले,typical केरळी वादनाने नाग देवतेची पूजा अनुभवायला मिळाली. तसा मी खूप मंदिरात, देवाच्या रांगेत रमणारा नाही पण ही सगळी मंदिर बघताना आपण दरवेळी वेगळंच काहीतरी बघत आहोत याचा अनुभव येत होता.. कालच्या दिवसाचा १st half लुंगी मध्ये घालवला, नंतर मात्र ऐन मोक्याच्या वेळी गुरुवायूरच्या मंदिरात लुंगी नाही म्हणून कृष्णदर्शन घेता आले नाही.कोटक्कल या शहरात रात्री 10 ला थांबलो... जेवायला अशक्य अशी पनीर ची भाजी खाल्ली.कॉफीची सोबत होती म्हणून त्याची चव जास्त काळ टिकली नाही.
केरलमधले लोक आखाती देशात जास्त जातात हे ऐकले होते त्याचे काही नमुने शहरातील travell shop वरून लक्षात आले.
जितकं रंजक वर्णन अलेप्पी बद्दल ऐकलं होत तितकं काही ते मनाला भावले नाही.बॅकवॉटर मध्ये शिकाऱ्यातून फिरताना माणसांच्या अधिकच्या वावराने निसर्गाची  हानी झाली आहे.
काल केरळमध्ये authentic केरळी थाळी खायला मिळाली, भातप्रेमी असल्याने खाताना जास्त मजा आली.

आजच्या प्रवासात तीन राज्य, एक जंगल नाव मात्र तिन्ही राज्यात वेगवेगळी अशी बघता आली. Tiger Reserve असल्याने काहीतरी बघायला मिळेल या आशेनेच गाडीतून बाहेर बघत  होतो, दुतर्फा हिरवीगार झाडे, घाट वाह!!!
हरणांच्या कळपाने आमची गाडी थांबवली... 20 -25 हरणं आपल्यापासून फक्त 30 फूट लांब पहिल्यांदाच बघायला मिळाली. बंदीपूर अभयारण्यात जंगल सफरीचा विचार होता पण वेळेचं गणित जुळून नाही आले...
स्थानिक वनस्पती संपत्तीचे ideal मार्केटिंग, सागवानाचे संग्रहालय बघताना लक्षात आले...
अत्यंत वेगळ्यापद्धतीने हे सागवान लाकडाचे संग्रहालय तयार केले आहे.
आज बंगलोर highway ला लागायचं हे निश्चित केलं होत, आत्ता जेवायला थांबलो असताना धो धो पाऊस सुरु झाला, प्रवासातील हे थ्रिल अनुभवायचे राहिले होते ते पण पूर्ण झाले... रात्री 12 वाजता भरपावसात highway पासून आत एक रूम finally मिळाली... उद्या आता लवकर निघून घरी पोहचायचे वेध लागलेत...

आजच्या प्रवासातील काही विशेष:-
*माझी मनोसोक्त झोप😊😊
*Route बदलायचा घेतलेला योग्य decision
*बऱ्याच दिवसांनी मिळालेले चांगले पंजाबी जेवण.
आडव्या पाहुडलेल्या *रंगनाथस्वामीचे (विष्णूचे)मंदिर.
*अनपेक्षित असलेला हिरवळीने भरून गेलेला घाट व जंगलाचा रस्ता...
*संध्याकाळच्या प्रवासात म्हणलेली पद्य आणि on demand म्हणलेलं ' नाच रे मोरा'...
* फिरायला आवडत असलं तरी फोटोवेडा नसल्याने काही चित्र मनात capture झाली आहेत.

रात्रीचा एक वाजलाय,पाऊस कमी झाला आहे उद्या आता पुण्याचे दर्शन घेणे हेच डोक्यात आहे.
एकूण किमी २२००

दिवस ८, २७ मे

             काल झोपायला उशीर झाल्याने उशिरा उठलो. त्यामुळे निघायला ९ वाजले. गाडी Highway ला लागली. ३-४ दिवस ५०-६० वर असणारा काटा आज १०० च्या खाली येत नव्हता आणि पुणे ७२८ किमी. दाखविणा-या पटीवरील आकडा झपाट्याने कमी होत होता. संध्याकाळी उशिरा सुखरूप घरी पोहचलो.

             ८ दिवसांचा दौरा संपला होता. या आठ दिवसात अनेक नव्या गोष्टी बघायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या. या आधी कन्याकुमारीला दोन वेळेस गेलोय पण ते थेट रेल्वेतून. By road प्रवास करण्याचा हा पहिलाच अनुभव. इतके दिवस कर्नाटक, तमिळनाडू, केरळ या तीन राज्यांची स्वतंत्र  Identity अशी कधी अनुभवली नव्हती. हे सगळं म्हणजे ‘दक्षिण भारत’ असंच वाटायच (जस की आसाम, सिक्किम, अरुणाचल प्रदेश,इ..... या सगळ्यांना आपण ‘North east’ म्हणूनच ओळखतो) भौगोलिकदृष्ट्या जरी ते एकत्र असले तरी, त्यांची संस्कृती, आचार-विचार, पोषाख, खाद्य संस्कृती, जीवनमान यात बराच फरक आहे. आणि अर्थातच, तिथे जाऊन बघितल्याशिवाय हे सगळ कळणार नाही.

              या प्रवासात काही गोष्टी Planned होत्या तर काही न ठरवता घडल्या, त्यापैकी ब-याचश्या आम्हाला फायद्याच्या ठरल्या. हरीपाद या छोट्याश्या गावात मुक्काम घडला आणि सुंदर अशा पारंपारिक गावाचे, मंदिराचे दर्शन घडले. केरळातून घाटावर येण्यासाठी केलेल्या ‘घाटाची’ निवड ही अशीच एक. मेंगलोर किंवा  कोएम्बतुर हे दोन मोठेघाट सोडून या दोन्हींच्या मधल्या घटने वर आलो. आणि त्यामुळेच आम्हाला Teak Museum, चहाचे मळे, मुदुमलाई अभयारण्यात हरणांचा कळप असं सगळ बघता आला. आमच्या साठी हे surprise package ठरलं.

                   प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा तरी घरातून बाहेर पडलं पाहिजे. नवीन काही बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी आणि महत्वाच म्हणजे स्वतःची energy refill करण्यासाठी. अशा दौ-यांमधून वर्षभर कामासाठी लागणारी उर्जा मिळत असते. आणि अशीच उर्जा या दौ-यातून मला नक्की मिळाली असे वाटते.

आणि हो,
हा दौरा तर डिसेम्बर- जानेवारी मध्ये जाणा-या सायकल सहलीची पूर्व तयारी होती.....

Picture अभी बाकी है मेरे दोस्त......

समाप्त.



Comments

Popular posts from this blog

वंदे गुरु परंपरा

वंदे गुरु परंपरा गुरुपौर्णिमा   अर्थात   ज्ञानाच्या   परंपरांचे   पाईक   होण्याचा   दिवस इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१) भगवद् गीतेत देखील श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना ज्ञानाच्या परंपरेचा दाखला दिला आहे. ते म्हणतात ‘ मी हा अव्यय ( अविनाशी ) योग सूर्याला सांगितला. सूर्याने मनुला सांगितला व मनूने  इक्ष्वाकू   सांगितला.  भारतीय परंपरेत नवीन ज्ञानतत्वाज्ञाच्या शाखांची मांडणी करताना देखील असा गुरु परंपरेचा वारसा सांगितला जातो. कारण ज्ञानाच्या परंपरेच्या संक्रमणातूनच ज्ञान वृद्धिगत होत जाते.                ज्ञान   प्रबोधिनीने   पथकाधिपती   म्हणून   समर्थ   रामदास ,  स्वामी   दयानंद ,  स्वामी   विवेकानंद   आणि   योगी   अरविंद या चार व्यक्तींचा स्वीकार केला आहे.   त्यापैकी एक म्हणजे समर्थ रामदास! कवि   वामन   पंडितांनी   समर्थांची ...

Vande Guru Parampara

  Vande Guru Parampara Guru Purnima – Honouring Our Gurus, Upholding the Tradition इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् । विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१) In the Bhagavad Gita, while advising Arjuna, Lord Krishna gives an example of the tradition of knowledge. He says, “I imparted this indestructible Yoga to the Sun (Vivasvan), who passed it on to Manu, and Manu, in turn, passed it on to Ikshvaku.” In the Indian tradition, whenever new knowledge or philosophy is presented, the legacy of the Guru's tradition is also acknowledged—because knowledge flourishes only when its lineage is preserved and passed on. Jnana Prabodhini has accepted four great personalities—Samarth Ramdas, Swami Dayananda, Swami Vivekananda, and Yogi Arvind—as its visionaries, and pathfinders who have shaped Jnana Prabodhini ideals and direction. Today, let us learn about Samarth Ramdas. The poet Vaman Pandit praises him with the following verse. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे...

In Search of History

  In Search of History “Forests are encroaching on human settlements…” “The forest swallowed up the city in a few years…” We often read such phrases in novels, but few years back, during my visit to Ross Island in the Andaman and Nicobar Islands, I saw this happening in real life. Ross Island, now called Netaji Subhash Chandra Bose Island , has a fascinating history. Once, it was the administrative capital of the British in the Andaman and Nicobar Islands. Named after Captain Daniel Ross, a marine surveyor, this island was a powerful symbol of British dominance. The British took control of Ross Island in the 1850s and ruled it for almost 80 years. They built luxurious buildings like the Chief Commissioner’s bungalow, a bakery, a church, a tennis court, and more, earning it the title “Paris of the East.” But nature has reclaimed its place. Today, the grand buildings are overrun by roots and vines, swallowed by trees like banyan tress and many varieties of Ficus family membe...