Skip to main content

तंत्रज्ञानी नवे सहस्रक…

 तंत्रज्ञानी नवे सहस्रक

ज्ञान प्रबोधिनीत अनेक समूहगीते म्हणली जातात. त्यातील एका पद्याचे धृवपद आठवते.

तंत्रज्ञानी नवे सहस्रक केवळ वैभव सांगतसे

अध्यात्मासह विज्ञानाची हाक तुझी परि मनी वसे

मानवाच्या समूह विकसनात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आगीवर नियंत्रण, चाकाचा शोध, लोह खनिजाचा वापर असे या प्रवासातील महत्त्वाचे ठळक टप्पे नोंदवता येतील. या सहस्रकातील गेल्या चार शतकांत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ज्ञानशाखा झपाट्याने विकसित झाल्या आहेत. मानवी समाजाच्या शैक्षणिक रचनांमध्ये तंत्रज्ञानाचे शिक्षण हा गाभाघटक बनला आहे.  

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर औद्योगिक विकासासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे म्हणून  विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यावे यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना  तंत्रज्ञानाच्या अभ्यास शाखांची तोंडओळख व्हावी, आवड निर्माण व्हावी आणि उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाच्या ज्ञान शाखांची निवड करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून कार्यानुभव,  टेक्निकलसारखे विषय अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात आले. आजच्या गरजा लक्षात घेवून अटल टिंकरिंग प्रयोगशाळा, मेकर्स स्पेस, इन्स्पायर पुरस्कार, इग्नाइट पुरस्कार असे अनेक नवीन उपक्रम शिक्षण क्षेत्रात राबवले जात आहेत.  

गेल्या पंच्चाहत्तर  वर्षांतील तंत्र शिक्षणाचा आढावा घेतला तर तंत्रज्ञानाच्या शिक्षणात तीन प्रमुख आयामांचा विचार करणे आवश्यक वाटते. कौशल्य विकसनासाठी हाताने काम करण्याची संधी देणारे कृतीप्रधान शिक्षण,  नवनिर्मिती करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी कल्पकतेलावाव देणाऱ्या शैक्षणिक रचना, फक्त नोकरी मागणारे कामगार तयार न होता संपत्ती निर्माण करणण्याचा दृष्टिकोन विकसित होण्यासाठी उद्योजकता विकासाचे अनुभव या तीन मुद्द्यांचा  विचार केलातर तर वरील काव्यपंक्तीतील  विज्ञान-तंत्रज्ञानाच्या हाकेला आपण ओ/प्रतिसाद देवू शकू.

आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या शैक्षणिक रचनांमधून निर्माण होणारे मनुष्यबळ पाहिल्यावर मानवी स्वभाव वा वृत्तीबद्दलची दोन प्रमुख आव्हाने जाणवतात. एक विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार कसे करायचे आणि दुसरे, असे श्रम करून जे निर्मितीचे काम करतात त्यांच्याबद्दलचा कृतज्ञताभाव विद्यार्थ्यांच्या मनात कसा जागवायचा?

 हे दोन संस्कार करता आले तर तंत्रज्ञानाच्या सहस्त्रकात मानवातील मनुष्यत्व जोपासता येईल, देशात भौतिक संपत्तीच्या जोडीने सद्गुणसंपत्ती निर्माण करता येईल आणि शिक्षण फक्त जेवणदायी न राहता जीवनदायी होईल.

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या शिक्षणातून हे घडावे, यासाठी एक प्रार्थना

वदनि कवळ घेता नाम घ्या मातृभूचे

सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे

कृषीवल कृषीकर्मी राबती दिवसरात्र

श्रमिक श्रम करोनी वस्तू या निर्मितात

स्मरणकरुनी त्यांचे अन्नसेवा खुशाल

उदरभरण व्हावे चित्त होण्या विशाल

प्रशांत दिवेकर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती

विद्यार्थी + व्रतार्थी = विद्याव्रती                       जुलै महिन्यात झारखंडला जमशेदपूर जवळ घाटशिला गावी शिक्षक प्रशिक्षणासाठी गेलो होतो. पूर्वीसिंघभूम जिल्हयात आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्री श्री विदया मंदिर नावाने संथाळ आदिवासी भागात या शाळा चालवल्या जातात. टाटानगर पासून  ३-४ तासाच्या अंतरावर असून देखील विकास नाही. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात या शाळा स्वयंसेवी वृत्तीने चालवल्या जातात. शाळेला सरकारी अनुदान  नाही तरीही  मोफत शिक्षण आणि मोफत पोषक आहार दिला जातो . शाळेत कुपोषित विद्यार्थी नाहीत  आणि जवळपासच्या सरकारी शाळांचा विचार करता श्री श्री विदया मंदिर शाळेत शैक्षणिक गळती ० %. हे गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नातून सध्या झाले आहे. आता या शाळा माध्यमिक टप्प्यापर्यंत पोचल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणाबरोबर तंत्र शिक्षण देऊन गावात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हे शाळेचे पुढचे उद्दिष्ट आहे. ज्ञान प्रबोधिनी त्यांच्या या प्रयत्नात शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करते आहे.     ...

पाठ्यपुस्तक लेखनाची पायाभूत तत्त्वे — भारतीय ज्ञानपरंपरेतील मार्गदर्शक सिद्धांत

  पाठ्यपुस्तक लेखनाची पायाभूत तत्त्वे — भारतीय ज्ञानपरंपरे तील मार्गदर्शक सिद्धांत अनुबन्ध चतुष्टय — ग्रंथलेखनाची चार पायाभूत तत्त्वे गेल्या आठवड्यात एका शिबिरासाठी सज्जनगड येथे जाण्याचा योग आला.   श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या कार्य आणि साधनेशी निगडित हे एक पवित्र स्थान आहे. तेथे विद्याव्रत संस्कार या विद्यार्थ्यांच्या संस्कार कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेमार्फत आयोजित अभ्यास शिबिरात   सहभागी झालो होतो. ( विद्याव्रत संस्कार हा ज्ञान प्रबोधिनीद्वारा    विद्यार्थ्यांमध्ये “विद्यार्थीत्वाचे” गुण जागवण्यासाठी केला जाणारा शैक्षणिक संस्कार आहे. व्यक्ति विकासाच्या आयामांचा परिचय करून घेणे व विद्यार्थी जीवन काळात व्यक्तिमत्त्व विकसनासाठी आवश्यक अशा व्रतांचा परिचय करून घेवून   विद्या अध्ययनचा संकल्प करणे हे या शैक्षणिक संस्काराचे सूत्र आहे.   ) सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. सकाळच्या काकड्यापासून शेज आरतीपर्यंत एक निश्चित दिनक्रम तेथे आचाराला जातो. या दैनंदिन कार्यक्रमात प्रार्थना , अभिषेक–पूजन , महाप्रसाद , भजन आण...

सत्यं च स्वाध्यायप्रवचने च।

  सत्यं च स्वाध्यायप्रवचने च। प्रकृति के सानिध्य में रहकर उसके साथ एकत्व का अनुभव करना , स्वाध्याय का प्रथम सूत्र है , जो हमें ब्रह्मांड के निर्माण और उसके रहस्यों को जानने की प्रेरणा देता है। जड़-चेतन धारणाओं से जुड़ी मूलकण , वंशसूत्र , गुणसूत्र जैसी सूक्ष्मतम चीज़ों के अध्ययन से लेकर ब्रह्मांड के विस्तार के अध्ययन तक का व्यापक आयाम हमें प्रकृति के गहनतम रहस्यों में प्रवेश करने का मार्ग प्रदान करता हैं। ब्रह्मांड के विशाल विस्तार और उसकी अनंतता को समझने का प्रयास करने के लिए पहला उपनिषदिक अध्ययन सूत्र है "ऋतं च स्वाध्याय प्रवचने च।" ऋतम् का अध्ययन ब्रह्मांड के नियमों और संरचनात्मक सिद्धांतों को समझने की कुंजी है। ऋतम् का अध्ययन   केवल दार्शनिक धारणा नहीं है , बल्कि यह ब्रह्मांड की रचना और उसके संचालन में निहित नियमों को   वैज्ञानिक दृष्टिकोणद्वारा गहराई से समझना है। यह हमें   सिखाता है कि ब्रह्मांड किस प्रकार संतुलित और सुव्यवस्थित रूप से कार्य करता है। ऋतम् का स्वाध्याय करते समय हम अपने परिवेश को गहराई से समझने लगते हैं। प्रकृति के रहस्यों की खोज और उन...