हमारा स्कूल हमही चलाते हैं ! टाटानगरपासून जवळच घाटशिला नावाचे छोटेसे गाव आहे. घाटशिलाच्या परिसरात 'आर्ट ऑफ लिव्हिंग' मार्फत स्थानिक आदिवासी जनजातींसाठी शाळा चालवल्या जातात. गेली काही वर्षे ज्ञान प्रबोधिनी या शाळांमधील शिक्षकांसाठी शिक्षक-प्रशिक्षण वर्ग योजते आहे. काही वर्षांपूर्वी या शाळांमधील शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यासाठी घाटशिलाला गेलो होतो. घाटशिलापासून जवळच, साधारण पंधरा किलोमीटर अंतरावरील हिन्दुलजुडी गावातील 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या शाळेत प्रशिक्षण वर्ग होता. याच शाळेच्या आवारात त्यांचे प्रशिक्षण केंद्र पण आहे. शाळेच्या आवाराच्या प्रवेशद्वाराशी शाळेच्या मुख्याध्यापकांनी आमचे स्वागत केले. मुख्याध्यापकांबरोबर त्यांच्या कक्षाकडे जात असताना शाळा बघत होतो. शाळा भरण्याआधी सर्व शाळांमध्ये जे दृश दिसते, त्यापेक्षा वेगळे दृश्य होते. काही विद्यार्थी मैदानाची सफाई करत होते, काही विद्यार्थी शाळेचे खुले सभागृह स्वच्छ करत होते, काही वर्गखोल्यांची स्वच्छता करत होते, काही पिण्याचे पाणी भरत होते. याबद्दल...
'अभ्यास देशस्थितीचा समतोल चलो' ज्ञान प्रबोधिनीच्या कामाच्या निमित्ताने झालेल्या प्रवासात शिक्षण विश्वाचे झालेले दर्शन व त्या निमित्ताने झालेला विचार मांडण्यासाठीचे लेखन