तंत्रस्नेही अध्यापकत्व : ३ अरुणाचल प्रदेशामधील विवेकानंद केंद्राच्या शाळांमधील समाजशास्त्र अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या प्रशिक्षण वर्गासाठी जयरामपूरला गेलो होतो . प्रशिक्षण वर्गाच्या सुरुवातीला प्रशिक्षणार्थींची ओळख व्हावी म्हणून काही खेळ घेत होतो आणि त्या खेळात बाद होईल त्याने ‘ माझ्या लक्षात राहिलेले अध्यापक ’ या विषयावर त्याच्या शिक्षकांचे नाव सांगून ते का लक्षात राहिले हे सांगायचे होते . नव्यानेच विवेकानंद केंद्राच्या शाळेत अध्यापन करण्यास सुरुवात केलेल्या शिक्षिकेने तिच्या एका विज्ञान शिक्षिकेचे नाव सांगितले आणि त्या शिक्षिका का लक्षात राहिल्या तर त्यांनी वर्गात आम्हाला लोणचं खायला दिले होते , असे सांगितले . लोणचं खायला दिलं म्हणून शिक्षक लक्षात राहिले ? त्या शिक्षिकेला थोडे स्पष्टीकरण द्यायला सांगितले तेव्हा त्या म्हणाल्या , प्राथमि...
'अभ्यास देशस्थितीचा समतोल चलो' ज्ञान प्रबोधिनीच्या कामाच्या निमित्ताने झालेल्या प्रवासात शिक्षण विश्वाचे झालेले दर्शन व त्या निमित्ताने झालेला विचार मांडण्यासाठीचे लेखन