Skip to main content

वंदे गुरु परंपरा

वंदे गुरु परंपरा

गुरुपौर्णिमा अर्थात ज्ञानाच्या परंपरांचे पाईक होण्याचा दिवस

इमं विवस्वते योगं प्रोत्कवानहमव्ययम् ।

विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत । । (४-१)

भगवद् गीतेत देखील श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना ज्ञानाच्या परंपरेचा दाखला दिला आहे. ते म्हणतातमी हा अव्यय ( अविनाशी ) योग सूर्याला सांगितला. सूर्याने मनुला सांगितला व मनूने इक्ष्वाकू  सांगितला.

 भारतीय परंपरेत नवीन ज्ञानतत्वाज्ञाच्या शाखांची मांडणी करताना देखील असा गुरु परंपरेचा वारसा सांगितला जातो. कारण ज्ञानाच्या परंपरेच्या संक्रमणातूनच ज्ञान वृद्धिगत होत जाते.

              ज्ञान प्रबोधिनीने पथकाधिपती म्हणून  समर्थ रामदासस्वामी दयानंदस्वामी विवेकानंद 

आणि योगी अरविंद या चार व्यक्तींचा स्वीकार केला आहे.  त्यापैकी एक म्हणजे समर्थ रामदास! कवि वामन पंडितांनी समर्थांची महती गाताना खालील श्लोकाची रचना केली.

शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे।

वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ।।

कवि वाल्मिकीसारखा मान्य ऐसा 

नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ।।

जयजय रघुवीर समर्थ ।।

              समर्थांचे वर्णन करताना शुकवसिष्ठवाल्मिकी या तीन जणांचा उल्लेख का केला आहे

कोण होते तेत्या तिघांमधील गुणांचा समुच्चय रामदास स्वामींमध्ये झाल्याने त्यांना सद्गुरू ही उपाधी प्राप्त झाली  काअसे अनेक प्रश्न श्लोक म्हणताना आपल्या मनात उमटतात.

कोण होते शुकवसिष्ठवाल्मिकी ?

          शुक हे व्यासांचे पुत्रत्यांना वैरागी असे का म्हटले आहे

आश्रमातील शिक्षण पूर्ण झाल्यावर परीक्षा देण्यासाठी व्यास शुकमुनींना जनक राजाकडे जायला सांगतातशुकमुनी राजा जनकाच्या राजवाड्याच्या पहारेकऱ्याला ते आल्याची सूचना राजापर्यंत पोचवायला सांगतातजनकाच्या राजवाडयातील पहारेकरी शुकांच्या आगमनाची वार्ता जनक राजापर्यंत पोहोचवतातजनकाकडून उत्तर येते,''मी बोलवेपर्यंत त्यांना तेथेच थांबायला सांगा.'' 

राजाच्या आज्ञेप्रमाणे द्वारपालांनी शुकांना निरोप दिलाशुक तिथेच थांबलेकिती वेळघटका गेलीप्रहर गेलादिवस मावळलापुन्हा उगवलापुन्हा मावळला असे लागोपाठ तीन दिवसतीन रात्री गेल्याशुक प्रवेशद्वारावर थांबून होतेत्यांच्या मनात दुःख,रागचीड कोणतीही भावना निर्माण झाली नाहीते शांतपणे राजाच्या निरोपाची वाट पाहत राहिले.

चौथ्या दिवशी वाद्यांच्या गजरात दरबारातील अधिकारीमंत्री अशा लव्याजम्यासकट जनक राजा स्वतः शुकांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारात येतात आणि शुकाला सोन्याच्या पालखीत बसवून मोठया थाटामाटात राजवाडयात घेवून जातात आणि एका स्वतंत्र कक्षात त्यांची निवास व्यवस्था करतातकक्षात सर्व प्रकारच्या सुखसोयीपंचपक्वांन्नाचे भोजनगाद्यागिरद्यानृत्यगायन सगळे काही शुकांच्या दिमतीला तत्पर होतेत्याचा शुकांच्या मनावर काहीही परिणाम झाला नाहीजनक राजाची शुकांच्या वागण्यासवरण्यावर बारीक नजर होती.

              दुसऱ्या दिवशी जनकाने दरबार भरविला आणि त्या दरबारात अनुपम सुंदर अशा नृत्यांगनांचा कार्यक्रम ठेवलानृत्य चालू असताना जनक राजाने दुधाने काठोकाठ भरलेला पेला शुकांच्या हाती दिला आणि म्हणाले,''ह्यातील एकही थेंब दूध जमिनीवर  सांडता ह्या राजवाडयास सात प्रदक्षिणा घाल.'' शुकांनी पेला हाती घेतलात्याच्या काठावर आपली नजर स्थिर केली आणि सावकाश चालत सातही फेरे पूर्ण करुन जनकाने जसा त्याला पेला दिला होता तसाच काठोकाठ भरलेला पेला शुकांनी जनकाकडे सुपूर्द केला

प्रसन्न झालेला जनक शुकांना म्हणाला,''महामुनीमी अनेकप्रकारे तुमची परीक्षा पाहिलीतुम्हाला शिकविण्यासारखे माझ्यापाशी काही नाहीतुमच्या वडिलांची इच्छा होती कीतुम्ही माझ्याकडून काही शिकावे पण मलाच तुमच्याकडून काही शिकण्यासारखे आहे एवढी जाणीव झाली.''

शुकमुनींसारखा आपल्या उद्दिष्टांवर स्थिर असलेला नारायण वयाच्या बाराव्या वर्षी नाशिकात येतोबारा वर्ष स्वयं अध्ययनाने ज्ञान मिळवतो, देशाटन करतोसमाज जाणून घेतो आणि आयुष्यभर धर्म संस्थापनेसाठी

शुकासारखे उद्दिष्टांपासून विचलित  होता

विरागी मार्गक्रमण करणारे समर्थ!

ज्ञानी लोकांच्या सभेचे नेतृत्त्व करणारान्याय सभेत न्यायदान करणारा

आणि  रणकर्कश असणाऱ्या श्रीरामांचे गुरु म्हणजे वसिष्ठ ऋषी.

वसिष्ठ ऋषींसारखे ज्ञानी आणि ज्ञानदान करणारे समर्थ!

ज्यांनी पहिल्या महाकाव्याचीरामायणाची रचना केली त्या वाल्मिकींप्रमाणे

दासबोधमनाचे श्लोककरुणाष्टकआरत्या अशी

वाल्मिकींप्रमाणे विविधांगी काव्य निर्मिती करणारे समर्थ!

           म्हणून कवि वामन पंडितांनी या तिघांचा उल्लेख करून समर्थांचे गुण गायीले आहे.

     समर्थांचे चरित्र बघितले तर त्यांना लहानपणापासून दोन प्रकारचे प्रश्न पडलेले दिसतात

पहिला प्रश्न म्हणजे आपल्या आजुबाजुच्या सृष्टीबद्दल होते आणि दुसरे म्हणजे सृष्टीच्या रचनाकाराबद्दल होतेनाशिक क्षेत्री केलेले अध्ययनदासबोधमनाचे श्लोककरुणाष्टक यांची रचना करत त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आयुष्यभर ज्ञानयोगाचे आचरण केले.

दुसरा प्रश्न म्हणजे आपल्या गावात सुलतानाचे चार शिपुर्डे येतात, हवे ते लुटून नेतात. गाव त्यांना विरोध का करत नाही ? भारत भ्रमणाच्या काळात समाजाच्या गुलामगिरीबद्दल, स्वातंत्राच्या आकांक्षेबद्दलचे हे प्रश्न अधिक दृढ झाले. यांची उत्तरं शोधण्यासाठी, समाजाला बलोपासनेची दीक्षा देण्यासाठी, समाज जागृती करण्यासाठी समर्थांनी आयष्यभर ज्ञानयोगाबरोबरचं कर्मयोगाचे आचारण  केले. देशभर संघटनेचे जाळे विणले.

असे ज्ञानयोग आणि कर्मयोग यांचे आचार करणारे समर्थरामदास शुकवसिष्ठवाल्मिकी या ज्ञानाच्या परंपरेचे प्रतिनिधित्व करतातम्हणून गुरुपौर्णिमेला त्यांना वंदन करायचे.

            गुरु पौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणून ओळखली जातेकोण होते महर्षी व्यास ?

'व्यासं वसिष्ठनप्तारं शक्ते: पौत्रमकल्मषम् 

पराशरात्मजं वन्देशुकतातं तपोनिधिम्।।

अर्थात् जे वसिष्ठ ऋषींचे पणतूशक्ति ऋषींचे नातूपराशर ऋषींचे पुत्र आणि शुक ऋषींचे वडील आहेतत्या तपोनिधी व्यासांना मी नमस्कार करतो.

महाभारत, श्रीमत् भागवताचे रचनाकार, सर्व वेदांचे ज्ञानी, वेदाच्या अभ्यासाची पद्धत बसवणारे, वेदांच्या अभ्यासाची परंपरा निर्माण करणारे महर्षी व्यास हे ज्ञानाच्या परंपरेचे प्रतिनिधित्व करतात.

ज्ञानाच्या या व्यास परंपरेचे दर्शन भाषेत देखील प्रकट होते, म्हणूनच वक्ता ज्या स्थानावरून आपले विचार मांडतो त्या स्थानाला व्यासपीठ म्हणतात. अर्थात वक्त्याने या ज्ञानाच्या परंपरेचे प्रतिनिधित्व करणेच समाजाला अपेक्षित आहे.

जगात अशी ज्ञानाची परंपरा जोपासणाऱ्या अभ्यासकांची अनेक कुळे आहेत.

परमाणुशास्त्राच्या क्षेत्रात,

अणूच्या रचनेचा अभ्यास करून अणूचे अंतरंग उलगडणारे

जे. जे. थॉमसन, अर्नेस्ट रदरफोर्ड आणि जेम्स चॅडविक

हे तिघेही कॅम्ब्रिज विद्यापीठातील कॅव्हेंडिश लॅबोरेटरीशी संबंधित होते,

जे भौतिकशास्त्र संशोधनासाठी एक प्राचीन आणि प्रतिष्ठित केंद्र आहे.

त्यांचे क्रांतिकारक संशोधन कार्य—

इलेक्ट्रॉनचा शोध, परमाणूचा नाभिकीय मॉडेल आणि न्यूट्रॉन यांचा शोध—

आधुनिक परमाणु सिद्धांताचा पाया ठरला आहे.

ही गुरुशिष्य साखळी

शास्त्रीय तपासणी आणि वैज्ञानिक शोध

यांच्या अखंड ज्ञानपरंपरेचे  प्रतिनिधित्व करते .

प्राइमेटोलॉजीच्या क्षेत्रात,
पॅलिओअँथ्रोपोलॉजिस्ट लुई लिकी यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले—
जेन गुडॉल (ज्यांनी चिंपांझींचा अभ्यास केला), डायन फोसी (गोरिल्ला),
आणि बिरुते गाल्डिकास (ओरंगुटान)

यांनी प्राइमेट्सच्या अभ्यासात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
त्यांनी निरीक्षणावर आधारित क्षेत्रीय संशोधनाची

एक प्रभावी परंपरा निर्माण केली.
त्यांचे कार्य, जे ‘लीकी स्कूल’ म्हणून ओळखले जाते,
त्याने प्राइमेटचे  वर्तन आणि मानवी उत्क्रांतीबाबत मानवाची समज अधिक व्यापक केली.
लीकी स्कूल ऑफ प्राइमेटोलॉजी’ ही

निरीक्षण, संयम आणि सहानुभूती या मूल्यांवर आधारित
ज्ञानाच्या परंपरेचे प्रतिनिधित्व करते. 

. अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात,

भारतीय द्रष्टे विक्रम साराभाई, सतीश धवन, वसंत गोवरिकार

ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी

ISRO (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) मध्ये

कल्पकता, वैज्ञानिक संशोधन  आणि वैज्ञानिक उत्कृष्टतेची

एक सशक्त ज्ञानपरंपरा स्थापली आणि तिचे जतन केले.

आज ही संस्था भारताच्या

 नवकल्पना आणि अंतराळ अन्वेषणातील आशा-आकांक्षांचे एक प्रतीक आहे,

की जे भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देत आहे.

या अभ्यासकांच्या साखळीमुळेच

आज भारताचा मानबिंदू असेलेली इस्त्रो संस्था 

अंतराळ संशोधनातील ज्ञानाच्या परंपरेचे प्रतिनिधित्व करते.

 गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेकजण  शुभेच्छा संदेश पाठवतात !

हल्ली प्रत्येक सण-उत्सवाला शुभेच्छा संदेश पाठवतातअगदी संक्रांतीला पण!

गुरुपौर्णिमा हा गुरुंप्रती फक्त कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस नाही

तर अधिक नम्रतेने गुरूला अर्थात् गुरुने जी ज्ञानाची परंपरा धारण केली आहे,

त्या ज्ञानाच्या परंपरेला वंदन करून

आपण त्या परंपरांचे पाईक होण्याचा निश्चय करूया,

ही परंपरा जपू, पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवू,

आणि या शाश्वत, अविरत वाहणाऱ्या

ज्ञानगंगेचे जीवनतत्त्व सदैव जिवंत ठेवूया.

प्रशांत दिवेकर 

ज्ञान प्रबोधिनी, पुणे 

  कृपया ब्लॉग शेअर करताना ब्लॉगची लिंक अग्रेषित करावी म्हणजे वाचक त्यांचे प्रतिसाद थेट लेखकापर्यंत पोचवू शकतील. 

 

Comments

  1. भारतीय व पाश्चात्य दोन्ही ज्ञान परंपरा मांडताना त्यातील ज्ञान मार्गाचे महत्त्व सहज ठसवले आहे

    ReplyDelete
  2. अत्यंत सुंदर विवेचन..गुरू पौर्णिमेचे वेगळे महत्त्व अधोरेखित केले. धन्यवाद व अभिनंदन.. आपल्याला शुभेच्छा

    ReplyDelete
  3. गुरू परंपरा खूप छान समजली

    ReplyDelete
  4. खूप छान लेख. श्लोक म्हणत असताना त्यात उल्लेख असलेल्या व्यक्तींबाबत माहिती बरेचदा नसते. शुकांबद्दल माहिती खूप कमी जणांना असते. वाल्मिकी ऋषींची माहिती रामायण महाकाव्यामुळे असते. तुम्ही शुकमुनींची माहिती यानिमित्ताने करून दिली यासाठी धन्यवाद.

    ReplyDelete
  5. There is no depth in education without Art.

    ReplyDelete
  6. खूप छान सुंदर लेखन

    ReplyDelete
  7. गुरुपौर्णिमेच्या दिनाचे महत्व वेगळ्या पद्धतीने खूप छान मांडले....

    ReplyDelete
  8. Khup chan mahiti milali. Vyaspeeth ya shabdacha khara arth atta kalala. Ani khup chan vichar mandala, dnyanachya parampareche paiik honyacha nishchay karne.

    ReplyDelete
  9. अधिक माहितीसाठी खूप खूप धन्यवाद सर.

    ReplyDelete
  10. आवडला लेख. शुक, वसिष्ठ, वाल्मिकी या सर्व विभूति समर्थ रामदासांमध्ये कशा एकरूप आहेत हे ध्यानात आणून दिल्याबद्दल धन्योस्मि. प्रणाम

    ReplyDelete
  11. खूप सुंदर लेख.

    ReplyDelete
  12. Chaitanya deshpandeJuly 12, 2022 at 10:49 PM

    नेमका आणि विविधांगी माहितीपूर्ण लेख. वाचून माहितीत भर पडली . छान

    ReplyDelete
  13. खूपच छान सर

    ReplyDelete
  14. वामन पंडितांच्या श्लोकाचे आणि ज्ञानमार्गाचे मंडन करणारा सुंदर लेख

    ReplyDelete
  15. Amar Patil VKV BaragolaiJuly 18, 2023 at 9:38 AM

    Excellent! Enriched with guru parampara and our tradition. Good work and knowledgeable article.

    ReplyDelete
  16. Profound and Rich Scientific articles. Thank you for the datails 🙏

    ReplyDelete
  17. 🙏प्रशांतदादा .सुप्रभात🌷🌷गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा 🌷🌷अप्रतिम लेख , माहिती 🤝

    ReplyDelete
  18. कविता मोकाशी , ठाणे केंद्रJuly 10, 2025 at 1:49 AM

    🙏प्रशांतदादा सुप्रभात 🌷🌷अप्रतिम माहिती पूर्ण लेख 🤝गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा 🙏

    ReplyDelete
  19. अप्रतीम खूप सुंदर लिहलंय आम्हाला वाचायची साधी मिळाली धन्यवाद

    ReplyDelete
  20. गुरुपौर्णिमेच महत्त्व अधोरेखित झाले
    व्यापक अर्थ समजला

    ReplyDelete
  21. अप्रतिम अभ्यासपूर्ण लेख, ज्ञानाची परंपरा जोपासणाऱ्या अभ्यासकाच्या अनेक कुळांचे स्मरण झाले.👌

    ReplyDelete
  22. फारच छान

    ReplyDelete
  23. स्वत:च्या गुरूंना वंदन तर करतोच. पण ही प्रेरणा, हा शरणागती ज्या गुरू परंपरेने आपल्याला दिला ती परंपरा, त्या व्यक्ती यांच छान कार्य सांगितले आहे. खूप अत्यावश्यक आणि उद्बोधक आहे.
    वंदे गुरूपरंपरा. कोटी कोटी वंदन

    ReplyDelete
  24. श्रीगुरुं चरणसारोज ।
    आपुला केला माज ।
    आनंदाचा निर्धारु ।
    सुखाचिया सागरीं ॥

    🙏गुरू पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सर🙏

    ReplyDelete
  25. खूप सुंदर विचार gurun बद्दल वाचायला मिळाले. अभ्यासपूर्ण लेख. गुरूंना आणि तुम्हाला सादर वंदन.

    ReplyDelete
  26. नमस्कार
    ज्ञानाची परंपरा निर्माण करणारे ऋषी आणि ती परंपरा जपणारी आधुनिक काळातील अभ्यासकांची कुळे अशी छान अभ्यासपूर्ण मांडणी या लेखामध्ये केलेली दिसून आली ..गुरुपौर्णिमेला ज्ञानाची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची खरोखरच गरज आहे . या लेखाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏

    ReplyDelete
  27. लेख अतिशय सुंदर शब्दबद्ध झाला आहे.

    ReplyDelete
  28. अभ्यासपूर्ण संतुलित गुरू महात्म्य आज गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने समजले. आपणास गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा...🌹💝👍🏻

    ReplyDelete
  29. खूप सुंदर विवेचन. आपल्या संस्कृतीत गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व का आहे याची महती आजच्या निमित्ताने अनेकांपर्यंत पोहचली🙏

    ReplyDelete
  30. खूप छान सर 🙏

    ReplyDelete
  31. खूप छान लेख..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Reconstructing the Dockyard of Lothal

Activity: Reconstructing the Dockyard of Lothal               Lothal was one of the important cities of the Indus Valley Civilization, known for its remarkable dockyard, one of the earliest in the world. It shows how people of that time planned and built structures with great skill and understanding of their surroundings.               In this activity, you will observe the pictures of the Lothal Dockyard and imagine yourself as a planner responsible for its construction. You will think about the kind of information and decisions needed to build such a dockyard successfully. Through this, you will gain insight about abilities of ancient Indians.   Student Worksheet: Picture Analysis – The Dockyard of Lothal Learning Objective: To explore how ancient Indians combined knowledge from various fields and used researc...

बौद्धिक विकसनासाठी वाचन

  बौद्धिक विकसनासाठी वाचन ‘वाचन कर’ असे सुचवल्यावर काहीजणांना आनंद होतो तर अनेकजणांच्या कपाळावर आठ्या उमटतात. का वाचायचे ! कसे वाचायचे ! कशासाठी वाचायचे ! वाचताना काय करायचे ! वाचून झाल्यावर काय करायचे ! वाचून काय होणारें !!     असे अनेक प्रश्न , प्रतिक्रिया अनेकांच्या मनात डोकावत असतात. त्याची उत्तरे शोधण्याचा जो प्रयत्न करतो त्याला ‘वाचन कर’ सुचवल्यावर आनंद होण्याची शक्यता जास्त असते. वाचकाचा   पहिला सामना होतो तो वाचनाच्या तंत्राशी. अक्षरे, जोडाक्षरे , विरामचिन्हे अशा सांकेतिक लिपीतील चिन्हांशी मैत्री करत वाचक अर्थापर्यंत म्हणजेच शब्दापर्यंत येऊन   पोचतो आणि इथे खरे वाचन सुरू होते. अनेक वाचक या सांकेतिक चित्रांच्या जंजाळातच गुरफटतात. चिन्हांशी मैत्री झाली की अर्थाच्या खोलात डुबी मारण्यासाठी वाचक,   शब्द आणि शब्दांच्या अर्थछटा,   समानार्थी, विरुद्धअर्थी शब्द, वाक्प्रचार, वाक्य अशा टप्प्यात प्रवेश करतो. वाक्याला समजून घेत परिच्छेद, निबंध अशा शब्दसमूहात वाचक प्रवेश करतो. शब्दाच्या, वाक्याच्या अर्थछटा समजून घेत पूर्वज्ञानाशी सांगड घालत आपल्...

From Pages to Naturalists' Insights

                                            From Pages to Naturalists' Insights                                               Learning while Reading:                                                    Cry of the Kalahari I am a voracious reader, always eager to explore different genres of literature across various domains of knowledge. As a Maharashtrian and initially a Marathi medium student, I preferred reading in Marathi but gradually transitioned to reading books in English. Before pursuing natural science for my graduation, I was introduced to the lives and works of naturalists through books like Ashi Manasa Ashi Sahas, Chitre An...